नवीन लेखन...

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे तळांत होती योजना, तेल सांठवण्याची शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं व्यय टाळून प्रवाही […]

भेट

अवचीत भेट होती, मृद्गंधापरी तुझी ती अलवार पावसाची मी वाट पाहिली होती निमिषार्ध दर्शनेंही, तडितेपरीच होती घन-घोर संगराची मज आस लाविती ती निःशब्द आठवेंही येती, इंद्रधनू साकारत जाती मनीं उन्हात पावसाचा खेळ मांडुनी जाती मज ओढ शरद् ऋतूची, अनिवार सत्य होती तव पाऊलीं चांदण्यांचे संसार नित्य फुलती — श्री.उदय विनायक भिडे

चिंतन

ज्याचे चिंतन आम्ही करतो तोच ‘शिव’ चिंतन करतो स्वानुभवे चिंतन करुनी चिंतनशक्ति दाखवितो जीवनाचे सारे सार्थक लपले असते चिंतनात चिंतन करुनी ईश्वराचे त्यांच्यात एकरुप होण्यात सारे ब्रह्मांड तोच असूनी अंश रुपाने आम्ही असतो जेव्हां विसरे बाह्य जगाला तेव्हांच तयांत सामावतो चिंतन असे निश्चीत मार्ग प्रभूजवळ तो जाण्याचा लय लागूनी ध्यान लागतां ईश्वरमय होण्याचा डॉ. भगवान नागापूरकर […]

1 409 410 411 412 413 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..