कविता-गझल-चारोळी-वात्रटिका
देवकी माता !
काय म्हणू ग तुजला देवकी भाग्यवान की अभागी ईश्वर तुझीया उदरी येवूनी सुख न लाभले तुजलागी // जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला तु तर असता जननी प्रभूची तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला // राज वैभवी वरात निघता कारागृही तुज घेवून गेले अवताराची चाहूल असूनी दुःखी सारे जीवन गेले // कंसाने तव मुले मारीली निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी तु […]
तू आलीस तेव्हां ………
घन काजळ रात्री तू आलीस अन् मूर्तिमंत अंधार मी चिंब तुझ्या प्रकाशात न्हालो…. दंव ओल्या पहाटे तू आलीस अन् प्राजक्ताचा सडा पडलेल्या धरित्रीसारखा मी शांत निवांत झालो…… तू आलीस तेव्हां निखळ कोरडा पाषाण मी चिंब तुझ्या प्रेमात भिजलो. — श्री.उदय विनायक भिडे
सु्र्य-चंद्राचा लपंडाव
बघा बघा तो रवि चालला, अतिशय वेगानें । पूर्व दिशेला चंद्रही येई, त्याच तन्मयतेने ।। युगानु युगें लपंडाव हा, त्यांचा चालला असे । भावांमधली शर्यत बघूनी, गम्मत परी भासे ।। मोठा भाऊ रवि त्याला, पकडण्या धांव घेई । लहान भाऊ चंद्र असूनी, निसटून मात्र जाई ।। संताप येता लाल होऊनी, रवि जाई तापूनी । परि शांत […]
संक्रांत
तीळगूळ घ्या मधूर बोला विनवीत येई संक्रांत परंतु जाई पुन्हा वर्ष ते नियमित ओरड आक्रांत। संक्रांतीच्या आक्रांतीतही काळोखाचा अवशेष पुन्हा पुन्हा संक्रांती देती सौहार्दाचे संदेश ।। — द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य
