नवीन लेखन...

विजेचे दुःख

चमकत लपकत आली कडकडाट करुनी गेली प्रकाशमान केले जगासी दूर केले अंधारासी भयाण होता अंधःकार लख्ख प्रकाश देई आधार घेई सर्वांच्या मनाचा ठाव भिती असूनही प्रसन्न भाव करुनी शक्तीचे भव्य प्रदर्शन निर्माण झाला मनी अभिमान परि दुःखी होते तीचे मन ‘क्षणिक’ लाभले तिला जीवन डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com  

चि. मानसीस

थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने डॉ. […]

आणखी एक बॉम्बस्फोट

आणखी एक बॉम्बस्फोट

शांततेच काळीज चिरून गेला

पुन्हा एकदा निरपराध्यांच रक्त चाखून गेला

आणखी एक बॉम्बस्फोट

सर्वसामान्यांची झोप उडवून गेला

संपूर्ण देशात भयाच सावट पसरवून गेलां

आणखी एक बॉम्बस्फोट

पुन्हा तोच प्रश्न विचारून गेला

ज्याच उत्तर देण्यापूर्वी ईश्वरही झोपी गेला

आणखी एक बॉम्बस्फोट

मानवतेला काळिमा फासून गेला

डोळ्यातील अश्रुनैवजी रक्त गोठवून गेला

आणखी एक बॉम्बस्फोट

डोक बधिर करून गेलां

जीवनात जगण्याची खात्री नाही हे पटवून गेला

कवी – निलेश बामणे
[…]

1 412 413 414 415 416 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..