नवीन लेखन...

आठवणी

आठवणींचा जगण्याशी संबंध सांगणारी कविता
[…]

भेट

अवचीत भेट होती, मृद्गंधापरी तुझी ती अलवार पावसाची मी वाट पाहिली होती निमिषार्ध दर्शनेंही, तडितेपरीच होती घन-घोर संगराची मज आस लाविती ती निःशब्द आठवेंही येती, इंद्रधनू साकारत जाती मनीं उन्हात पावसाचा खेळ मांडुनी जाती मज ओढ शरद् ऋतूची, अनिवार सत्य होती तव पाऊलीं चांदण्यांचे संसार नित्य फुलती — श्री.उदय विनायक भिडे

खेळ

चाले अवखळ । डोंबार्‍याचा खेळ । वदनीं कवळ । पडावया ।। तारेवर कुणी । करी कसरत । प्रयत्न अविरत । समतोलाचे ।। उलट सुलट । उड्या माकडांच्या । लोकांचे रंजन । करावया ।। घ्यावया आनंद । चालल्या खेळाचा । आपुले अस्तित्व । विसरावे ।। गर्दीत मिसळावे । गर्दीचेच व्हावे । अवघे विसरावे । देहभान ।। — […]

तू आलीस तेव्हां ………

घन काजळ रात्री तू आलीस अन् मूर्तिमंत अंधार मी चिंब तुझ्या प्रकाशात न्हालो…. दंव ओल्या पहाटे तू आलीस अन् प्राजक्ताचा सडा पडलेल्या धरित्रीसारखा मी शांत निवांत झालो…… तू आलीस तेव्हां निखळ कोरडा पाषाण मी चिंब तुझ्या प्रेमात भिजलो. — श्री.उदय विनायक भिडे

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..