नवीन लेखन...

आयुष्य लढा

चोखपणे तू हिशोब राहू दे, आपल्या जीवन कर्माचा कुण्याही क्षणी पाढा वाचणे, भाग बनेल तो नशीबाचा…१ घीरट्या घालीत फिरत राही, आवतीभवती काळ क्षणात टिपून उचलून घेतो, साधूनी घेता अवचित वेळ..२ सदैव तुमच्या देहाभवती, त्या देहाचे कर्मही फिरते आत्मा जाता शरीरही जाई, कर्मवलय परि येथेच घुमते….३ पडसाद उमटती त्या कर्माचे, सभोवतालच्या वातावरणी वेचूनी त्यातील भलेबुरे , मागे […]

स्मरण असू दे

हे जगदंबे ! सदैव होते नाम मुखी गे लोप पावले आज कसे ते तू मज सांगे…..१ लागत नव्हते जेंव्हां कांहीं तूज पासूनी धुंदीमध्ये राही मी तुझ्याच मधूर नामी….२ काही हवेसे वाटू लागले एके दिवशी विचारांत मी डूबू लागलो त्या सरशी….३ आनंदाचे वलय निर्मिले इच्छे भोवती गुंगूनी गेलो पूरता त्यातच दिन राती….४ तगमग करूनी तेच मिळविता आज […]

सर्वस्व अर्पा प्रभुला

केला सुखाचा शोध धनसंपत्ती ठायीं उशीरा झाला बोध ऐष आरामांत ते नाहीं एका गोष्टीची उकलन कळली विचारापोटीं आयुष्य हवे होते वाढवून देह सुखासाठीं परि लागता ध्यान प्रभूचे चरणावरी नको मजसी जीवन हीच भावना उरीं सर्वस्व अर्पा प्रभुला हाच मार्ग सुखाचा तेव्हांच मिळेल सर्वाला आनंद जीवनाचा डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

नाहीं विसरलो देवा

नाहीं रे मी विसरलो देवा तुजलो संसारात अडकलो, वेळ ना मिळाला ।।१।। तूंच गुंतविले, लक्ष्य मोहांत चित्त देण्या सांगितले, तुझ्याच खेळांत ।।२।। तुलाची हवे यश, तुझ्या खेळांतले माझ्या कौशल्यास, तूं मार्गदर्शन केले ।।३।। तुझ्याच साठीं, गुंतविले मन बनोनी सोंगटी, फिरे पटावरी ।।४।। काय दोष माझा, न दिले लक्ष्य मी खेळवण्यातील मजा, आलो तिला कामीं ।।५।। डॉ. […]

गणवेश

आपल्याच आत्म्याचा आहे प्रतिबिंब गणवेश आपला नसतो झाकण्या तो आपल्या शरिराची नग्नता !! धृ !! शिकत असता शाळेत घालायचो मी गणवेश रोजच मिरवायचो दाखवत उडालेली शाई त्यावर !! 1 !! कवी होताच चढला कवीचा गणवेश अंगावर झाला मग वर्षाव फक्‍त कौतुकांचा माझ्यावर !! 2 !! पुर्वी होता गणवेश माझ्याच अंगावर गरिबीचा काढताच तो चढला माज मलाच […]

दुःख विसर बुद्धी

कसे मानू उपकार, देवा तुझे देऊन बुद्धि विसर, करी कल्याण माझे खेळ आहे जेथें, हार जीत आहे घर बांधणीते, पड झड पाहे असे जन्ममरण, ह्याच देहीं हेच असतां जीवन, सुख दुःखे पाही एक दुःख येतां, मन होई निराश काळ पुढे जाता,विसरे ते सावकाश एका दुःखाचा चटका, दग्ध करी मनां जमता दुःखे अनेक, नष्ट करील जीवनां निसर्गाची […]

जरा धीर ठेव

ज्या ज्या वेळी धीर ठेवशी मिळेल कांहीतरी गडबड मनां होऊन जातां निराशाच पदरीं ।।१।। शांत चित्त आपुले तूं ठेव प्रत्येक समयी मिळेल यश पदरी तुझ्या खात्री याची घेई ।।२।। आत्मविकास तूं सोडूं नको आपल्या कामाचा मोबदला मिळेल तुजला योग्य प्रयत्नाचा ।।३।। — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

अर्पण

आशिर्वाद श्री जगदंबेचा, सहवास तुझ्या स्फूर्तीचा रचिली ओवीबद्ध कथामाला, ती अर्पितो मी तुजला II १II विचारांच्या उठल्या लहरी, शब्द जुळता काव्या परी कविता रूप धारण करी, ती अर्पितो मी तुजला II२ II प्रभूचा असावा सहवास, हीच अंतर्मनातील आंस विचारांची घालूनी शब्दरास ती अर्पितो मी तुजला II३ II प्रभू नसे जन्ममरण व्यथा, अवतारास संबोधूनी जन्मकथा भावनेस व्यक्त […]

स्वच्छता मोहीम……..

मिडिया आली, प्रेस आली,

खटाखट कॅमेरान्ची बटने दाबली,

चित्रे दिसली गोजिरवाणी,

नाही नां येणार वेळ लाजिरवाणी?
[…]

1 393 394 395 396 397 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..