चंदाराणी

Chandarani

१९४७ साली एक बालक जन्माला आले
माय-पित्यांनी त्याचे नाव चंदाराणी ठेवले
त्याच वेळी मी बिगर राज्याची राणी झाले

नेहमीच विजय तर कधीतरी हार झाली
आणि त्या हारेलाच एक वेगळी धार आली
आयुष्याच्या सुखदु:खांशी मर्दानीपने लढली

संकटाच्या सार्‍या थव्यांनी आता माघार घेतली
स्त्री म्हणून सारे चटके मी एकटीनेच घेतले
या सार्‍या चोथ्याचे राज्य माझे असेच उभे राहिले

शेवटच्या घटकेला माझे मलाच उमगले
कुठले राज्य – कुठली राणी.. हे तर अळवावरचे पाणी होते
येणार्‍या काळाचे मी एक छोटे सावज होते….

– चंदाराणी कोंडाळकर

चंदाराणी कोंडाळकर
About चंदाराणी कोंडाळकर 15 Articles
चंदाराणी दिवाडकर - कोंडाळकर या रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळच्या वरसगांव येथील एक कवीयत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या. वरसगाव येथे त्यांनी मायभवानी मंदीराची स्थापना केली आणि तेथेच माहेर नसलेल्या स्त्रियांसाठी हक्काचे माहेर उभे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…