नवीन लेखन...

निसर्ग स्वभावाचे दर्शन

बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव उमटविती भाव    मनावर आमच्या     ||१|| चांदण्याची शितलता,मनाची प्रफूल्लता देहाची आल्हादकता    लाभली चंद्राचे ठायी ||२|| नाजूक सहवास, मधूर मिळे वास, कोमलतेचा भास    जाणविला फूलांनी    ||३|| रंगाची विविधता, छटाची आकर्षकता, मनाची वेधता    इंद्रधनुष्य देई    || ४|| पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता, वेगाची तीव्रता,    भासे हरिणाच्या पायी    ||५|| प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता, स्वभावाची निर्मलता,    समजली […]

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती, हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।। मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां, दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।। घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत, कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।। बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत, कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।। भरले होते भव्य प्रदर्शन […]

योग्य वेळी

दिन दुबळे रोगी जर्जर,  कितीक पसरले या संसारी काटे काढूनी जीवनावरचे,  सुगंध घ्या तुम्ही कुणीतरी….१ शून्यामधले कितीकजण ते,  शून्यची सारे अवतीभवती परिस्थितीच्या वणव्यामध्ये,  धगधगणारे जीवन कंठती….२ आज हवे ते त्यांना कुणीतरी,  फुंकार घालील दु:खावरती सहानुभूतीचा शब्द एक तो,  निर्माण करील सहनशक्ति….३ क्षीण होता तव दृष्टी,  दिसेल कां तयाची धडपड श्रवणदोष तो येण्यापूर्वी,  ऐकून घे तू दु:खी […]

दिव्यत्वाची झेप

पंख फुटता उडूनी गेला,   सात समुद्रा पलीकडे आकाशातील तारका होत्या,  लक्ष्य तयाच्या नजरेपुढे निसर्गाने साथ देवूनी,  दणकट दिले पंख तयाला झेप घेत जा दाही दिशांनी,  मनी ठसविले त्या पक्षाला आत्मविश्वास तो जागृत होता,  चिंता नव्हती स्थळ काळाची कुठेही जाईन झेपावत तो,  ओढ तयाला दिव्यत्वाची निसर्ग रंगवी चित्र मनोहर, रंग एक तो कुंचल्यामधल्या देईन अंगच्या छटा निराळ्या, […]

पावन हो तू आई

पावन हो तू आई तव चरण शरण येई ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी तव रुप पाही ।।३।। […]

शिळा झालेल्या अहिल्या

आजही बऱ्याच अहिल्या पडल्या शिळा होऊनी कांहीं पडल्या वाटेवरी कांही गेल्या उद्धरुनी कित्येक होती अत्याचार अबला स्त्रीयांवरी उध्वस्त करुनी जीवन शिळा त्यांची करी काय करील ती अबला डाग पडता शिलावरी दगड होऊनी भावनेचा फेकला जातो रस्त्यावरी भेट होता तिची अवचित् कुण्या एखाद्या रामाची शब्द मिळता सहाऱ्याचे अंकुरे फुटती आशांची डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com

पूजा भाव

पूजा पाठ करीत असतां पूजा गेलो विसरुनी प्रभुचरणी ध्यान लागतां भान गेले हरपूनी पूजेमधल्या विधीमध्यें बहूत तास घालविले मनी घेऊनी आनंदे पूजा कर्म केले पूजेमधली सर्व कृतिं कटाक्षाने पाळली नेटकेपणासाठी योग्य साधने जमविली वर्षामागून वर्षे गेली पूजाअर्चा करुनी खंत मनी राहून गेली झालो नसे समाधानी मूर्ती समोर बसूनी एक चित्त झालो ध्यान अचानक लागूनी स्वतःसी विसरलो […]

जीव ( प्राण-आत्मा )

जीवनातील रगाड्यातून- वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत […]

जीवनाचा खरा आनंद

केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।। बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा ।।३।। […]

1 392 393 394 395 396 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..