तीन गुणाचे जीवन
तीन गुणांनीं युक्त असूं द्या, तुमचे जीवन सारे । जीवन यश पताका तुम्हीं, फडकवित रहा रे ।।१।। असती सारे ईश्वरमय, याच भूतला वरचे । प्रथम मान द्या हो प्रभूला, कार्य समजून त्याचे ।।२।। आनंद घेऊनी संसारांचा, लक्ष्य असावे जीवनीं । निसर्गाचे हे चक्र फिरावे, विचार असूं द्या मनी ।।३।। दुसऱ्याचा बघूनी आनंद, दुप्पट होई आपला । […]
