नवीन लेखन...

स्वप्न पहावीत…

स्वप्न पहावीत… नाही कोण म्हणतंय ? स्वप्नं जरूर पहावीत.  इतकी सारी पहावीत की त्यांची ढिगारे व्हावीत. भान ठेवून उघड्या डोळ्यांनी  त्या स्वप्नांकडे पहावं. निर्धाराच्या अचूक बाणाने  त्या स्वप्नांना वेधावं. स्वप्नांसाठी आजच्या वर्तमानाला  निरर्थक नाही मारावं. उद्यासाठी आजच्या क्षणाला  व्यर्थ नाही टाळावं. अशक्य अश्या स्वप्नांसाठी  शरीराने जरूर थकावं. पण न खचता मनानं  पून्हा धैर्यानं उठावं. तुटलेल्या मोडलेल्या […]

वनमाळी सांवळा (श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानें )

गोपी : तेजस नीलमण्यांचा मळा राजस वनमाळी सांवळा ।। नयनमनोहर रूप सांवळें मनीं उतरलें कैसें, न कळे न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।। नील कमलदल, भ्रमरपुंजही श्यामल यमुना, श्यामला मही नीलमेघ जलभरले, तैसा हा घनश्याम निळा ।। मोरपीस शोभतें शिरावर श्यामल तनुस खुलवी पीतांबर कटीं बासरी, करीं घोंगडी, तुलसीमाळ गळा ।। किति सांगूं […]

लक्ष्मीसूत

आशीर्वाद दे ग आई मजला,  विनवितो मी तुझाच पूत्र, बाबा माझे नसती हयात,  कोण मजला ह्या जगतात, ‘केशव’ माझे वडील असता,  ‘केवशसूत’  हा ठरतो मी, तसाच बनता  ‘केशवकुमार’,  मोठे होण्याची युक्ती नामी जगावयाचे जर मोठ्या नामी,  तूच मजला महान आहे ‘लक्ष्मी’  तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com      

तप- शक्ती

तप आणि सत्याची,  महान असे शक्ती, वाढवूनी बघा तुम्ही, प्रभूस ती खेचती   तप वाढता तुमचे,  झुकेल तो ईश्वर, हतबल होत असे,  भक्त जणांसमोर,   विश्वाचा तो मालक,  दिसत नाही कुणा, प्रयत्न होवूनी व्यर्थ, निराशा येई मना,   मिळविण्यास जा तुम्ही,  मिळत नसे केव्हां तपशक्ती वाढविता, आपोआप येई तेव्हां   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे    कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे    जे सबळ समजती  ।।१।। विचार मनी येतां     दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां    हार तुमची झाली ।।२।। मनाची सबलता    हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह    दुर्बल असतां मन ।।३।। सुदृढ देह व मन     यांची मिळून जोडी जीवनातील यश    तुमच्या पदरीं पाडी ।।४।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

श्रावणमास

आला श्रावण मेघ नभातील दूर दूर चालले येता हळुच सर मेघांमधूनी मी ईंद्रधनु पाहिले । कधी ऊन तर कधी पाऊस हा खेळ असे चालला पाहूनी हिरवळ भासे कुणी शालू हिरवा तो नेसला । तुडुंब भरूनी नदी निघाली प्रिय सागर भेटीला ओढ लागली मीलनाची आता दिसे न काही तिला । तरारली पिके शिवारी शेतकरी बहू हरखला अती […]

मृगया

जीव काढून घ्यायचा आणि विचारायचं जिवंत आहेस का…? किती सोयीस्कर बदलतोस भूमिका तुझी…? बेफाम वादळात… शिड म्हणून वापरायचं आणि म्हणायचं तुटते आहेस का…? किती ग्राह्य धरायचं तुला…? अग्नी पंखांची भरारी व्हायची मी आणि म्हणायचं माझ्यासाठी फडफडशील का…? सुंदर अविष्काराचं चिञ व्हायचं… आणि म्हणायचं भावनांचे रंग भरशील का…? वास्तवाच्या तप्त अग्नीत झोकायचं आणि म्हणायचं सोसशील का…? एकतानतेत […]

निसर्ग प्रकोप

घे थोडी विश्रांती आता घे थोडी उसंत जराशी आता बरसणे थांब जरा अश्रू डोळ्यातून बरसती । ऊध्वस्त झालीत घरेदारे ऊध्वस्त झालीत स्वप्ने ना राहण्यास घर राहिले ना खाण्यास अन्न ऊरले । होते जाणीव पदोपदी आता नाही निसर्गाची अवकृपा वृक्षतोडीचा अतीरेक झाला यात निसर्गाची ना गलती । येऊ दे आतातरी जाग मानवा थांबावा हस्तक्षेप अतीरेकी सुधारणेच्या नावाखाली […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा    भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं    काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर    रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा    आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी    विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित    जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो    जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।।   डॉ. […]

शब्द फुले

माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार, अर्पित जातो ते,  प्रभू चरणांवर….१, राम नाम जपत,  कुणी एक येतात घटकाभरासाठी,  विश्रांती ते घेतात….२, रोज देती मजला,  ओंजळभर फूले कोणत्या बागेतली,  कधी न सांगीतले….३, त्यांच्याच सांगण्याने,  हार मी गुंफीतो बघतात कौतुकें कसा मी अर्पितो….४, फूलांची ओंजळ ती नव्हे, शब्दांचा ठेवा, कवितेच्या रचनी,  उपयोगी पडावा….५, शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे मिळतो विषय […]

1 263 264 265 266 267 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..