नवीन लेखन...

अंत्यसंस्कार…मी अनुभवलेला

हसते बोलते बाबा अचानक शांत झोपले नियतीची क्रूर चेष्टा ती… मी त्या विधात्याला कोसले आठवणींचे मडके हाती जड झाले होते सिद्धार्थाचे दूःख तेंव्हा पहिल्यांदा समजले होते जिवंतपणी विचारलं नाही ते हवे नको बघत होते प्रेमाचे अगदी जवळचे घरचे कार्य समजत होते सर्वजण धीर देत होते माझे डोळे पुसत होते माझे जड डोके मात्र बाबांचा खांदा शोधत […]

मोक्ष अंतीम फळ

मागील कर्म पुढे चालूनी, कर्माची होई शृखंला, फळ मिळते कर्मावरूनी, मदत होई मुक्तीला…..१,   चांगले कार्य करीतेवेळी, मृत्यू येता अवचित, पुनर्जन्म तो मिळूनी तुम्हां, खेचतो त्याच कार्यात….२,   अपूरे झाले असतां कार्य,  ज्ञानेश्वराच्या हातून पुनरपि येऊनी पूर्ण केले, आठरा वर्षे जगून……३,   ध्रुव जगला ५ वर्षे, अढळ पद मिळवी कित्येक जन्मीचे तपोबल, पांच वर्षांत पूर्ण होई….४, […]

एऽ येश्वदे

एऽ येश्वदे, एऽ ममद्या, बाप्ये जमवा समदे बाया बी गोळा करा समद्या मारा समद्यांनला जोरात हाका, आन् ती समदी मेंढरं हाका. चला आपन बहिनी-भाऊ मतदानासाठी जाऊ. देऊ त्याला भलामोट्टा आपल्या मतांचा गठ्ठा. तो, जो गावीं आल्ता पठ्ठा ज्यानं आपल्या समद्यांनला वाटला हाय पैका. – सुभाष स. नाईक  

मागू तिला कसे मी ?

मागू तिला कसे मी ? वृत्त :- आनंदकंद लगावली :- गागालगा लगागा गागालगा लगागा गेली निघून कोठे ,गाठू तिला कसे मी? घेणे जुनेपुराणे,मागू तिला कसे मी? राहून भेट गेली ,गर्दीत चाहत्यांच्या ये एकटी पहाटे,सांगू तिला कसे मी ? घालून पोत काळी,भेटावयास आली हा लागला सुगावा,भेटू तिला कसे मी ? चर्चा नको म्हणाली,गावात भेटल्याची सोडून गाव जा […]

अंबेस दाखवी काव्य

पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने पित्याचे ते लक्ष वेधण्या,  हनुवटी खेची तो हातानें….१, प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे अजाणपणा तो दाखवोनी,  दुर्लक्ष करी तो मुलाकडे…२, शब्दांची ती गुंफन करूनी,  कवितेचा तो संग्रह केला तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला…३, जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या […]

मानवता धर्म

परमेश्वर अगाध ।  त्याच्या शक्तीचा नसे वाद ।। मान्य करिती एक । ईश्वर नसे अनेक  ।। नावे बहुत संबोधीती । सारे एकास मिळती ।। प्रभु निराकार ।  निर्गुण असुनी होई साकार ।। आस्तिक प्रभु मानती ।  नास्तिक समजती शक्ति ।। ईश्वर निर्मिले मानवता । मानव शोधे विवीधता ।। ज्ञान प्रभुपासून । धर्म त्या शक्तीतून ।। वापरुन […]

व्यर्थची यात्रा

जमले होते असंख्य भाविक, जगंदबेच्या दर्शना  । कांहीं तरी मागत होते,  हात जोडूनी चरणा  ।। दयावान ती आहे समजता,  गर्दी होते तिजपाशीं  । कधी न दिले काहींहीं तिजला,  मग ही मागणी कशी ?  ।। जावू नका दर्शनास तिच्या,  रिक्त अशा त्या हाताने  । तिला पाहिजे ताट पूजेचे,  भरलेले भक्ती भावाने  ।। व्यर्थ होवून जाती ते श्रम, […]

हें माणसा !

मानव योनी हीच महान    नको करु हा वृथा अभिमान मानुनी प्राण्यांत श्रेष्ठ    झालास तूं अतिगर्विष्ठ ‘विवेकशक्ति’ असे ज्ञान    हेच ठरविसी परिमाण हाच निर्णय चुकीचा    पाया ठरे गैरसमजाचा उंच आकाशांतून घार    पाही भक्ष्य जमिनीवर तुजला नसे तिक्ष्ण दृष्टी    निसर्गे दिली ती पक्षिसृष्टी तंतुसी काढूनी मुखातूनी   सुंदर विणी जाळे त्यांतूनी कोळी विणतो सुंदर जाळे    वास्तूकला ती कुणा न […]

दोन्हीं दारीं मारामारी

दोन्हीं दारीं मारामारी खानेसुमारी पानसुपारी. खालीवर तागडी जुळली फुगडी हुशारला गडी फुशारला गडी. आतां झाली पक्की आतां मिळेल नक्की लाल-दिव्याची गाडी ! – सुभाष स. नाईक

कुणी भुंकली

कुणी भुंकली कुणी थुंकली कुणी म्हणालं, ‘जंगली’. पण विधानसभा नाहीं भंगली. अखेरीस एकानं केलं वॉक् आऊट, अन्, दुसरी पार्टी ट्रस्ट-व्होट जिंकली – सुभाष स. नाईक

1 264 265 266 267 268 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..