नवीन लेखन...

मीरेची तल्लीनता

नाच नाचती तालावरती मीरेची पाऊले चित्त ते हरीमय जाहले. – – – धृ   लागला प्रभुचा ध्यास हरि दिसे नयनास चलबिचल नजर होऊन अंग सारे मोहरले   – – -१ चित्त ते हरीमय जाहाले   न राही आपले भान झाली भजनी तल्लीन तनमन प्रभुचे ठायी जाता संसार ते विसरले.  –  –  – २ चित्त ते हरीमय जाहाले […]

हिरकणी

गड्यांनो, — या लवकरी,उघडा हा दरवाजा, लेकरु वाट पाहे खाली, तान्हुला बाळ माझा, संध्याकाळ होऊन गेली , उशीर किती झाला आता, बाळ माझे झोळीत खाली, फुटू लागला मलाही पान्हा, भुकेलेला बाळ माझा, रडत असेल तो केव्हाचा ,घरांत दुसरे कोणी नाही, धनीही मोहिमेवर माझा, कुणी नसते अशावेळी, लेकराला लागतां भुका, मायच भूक जाणे त्याची, जीव तडफडे कसा […]

विशाल आपुले पंख फैलावुनी

विशाल आपुले पंख फैलावुनी, उंच उंच आभाळी उडावे, मनसोक्त रमतगमत दूरवरी, विहरत –विहरत गात जावे,–||१|| नको कुठले ताणतणाव, नकोच कुठल्या चिंता, भोवती निळा आसमंत, मेघ सारे नि विद्युल्लता,–||२|| वाटले तर वृक्षांवर बसुनी, निवांत करावी फक्त टेहळणी, स्वातंत्र्य फक्त राहावे जपत, नको कोणाचीच मनधरणी,–||३|| अपमान, मानभंग, दुःखे, कोणीच नको करायाला,– नातीगोती टोचती सारी, अवघ्या मानवजातीला,–||४|| आपल्या दिलाचा […]

पतंग

एक पतंग वरी चालला, डोलत आकाशीं भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी    //   भरारी घेई पतंग ज्याला, आधार दोरीचा जाणीव होई येतां प्रसंग,  त्याला कटण्याचा    //   धरतीवरी कोसळत असतां,  दृष्टी टाकी आकाशीं इतर पतंग बघूनी बोलला,  तोच स्वतःशीं     //   ” नभांग मोठे दाही दिशा त्या,  संचारा स्वैरपणें आठवण ठेवा त्या शक्तीची,  […]

प्रतिक्रीया

क्रियेला प्रतिक्रिया, ध्वनीला प्रतिध्वनी तत्व ते सनातन, दिसे नित्य जीवनी फेकतां जोराने,  आदळे भिंतीवरी प्रवास परतीचा,  होई तुमचे उरीं शिवी वा अपशब्द, दिले कुणासाठी येवूनी धडकतील,  तुमचेच पाठीं प्रेमाने बोलणे,  सुंगध आणिते आनंदी लहरी,  मनां सुखावते   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।। निशाराणी संचारी निद्रीत जाई पहारेकरी खट्याळ वारे धावूनी दारे दिली उघडूनी विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची….१ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   पावसाच्या पडती सरी पक्षी नाचती तालावरी कोकीळेचे सुरेल गान आनंदाने वातावरण नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची….२ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   स्पर्श […]

गुणधर्म

करूं म्हटले करूं न शकलो   रोकू म्हटले रोकू न शकलो जे जे स्फूरले येईल ते ते    ठरले असते होईल ते ते बघूनी बाह्य जगला ठरवी   मिळवीन तेच सुख भावी त्याचेसाठी स्थिती आगळी   उमज न येई ती सगळी धडपड करीतो गडबड करीतो   त्याच चाकोरीतूनी जाऊ लागतो सुप्त गुण हे अंगी लपले   उभारून ते येतील सगळे मात करूनी विचारावरती […]

येता तुझ्या चरणांशी

येता तुझ्या चरणांशी, पंढरीनाथा,वेगळी प्रचिती, लौकिकाचे काटे बोचती, पण अद्वैताचीच अनुभूती,–!!! अलौकिकाचे आम्ही प्रवासी, स्वर्ग आमुचा पंढरी, जन्मोजन्मी आंस तुझी, अनंतकाळाचे रे वारकरी,–!!! हिमगौरी कर्वे. ©

तुमच्या हृदयीचा राजा

तुमच्या हृदयीचा राजा, गुलाब असे ना जरी, माझ्यासारखा राजबिंडा, मिळेल का तुम्हालाही,–? जन्म घेतला राजवंशा, नसते कुणी राजा म्हणुनी, कर्तृत्वाने मोठे व्हाया,– पाकळी पाकळी अगदी फुलुनी–!! विचारा थेट आपल्या हृदयां, फूल माझे छोटे अगदी, बघा मोठ्या कार्यकर्तृत्वा,– मी मागे नाही जराही,–!!! रंगीबेरंगी जराही नसता, दुनिया आकर्षित होई, डोलारा खूप नसता मोठा, भरल्या आंत राशी सुगंधी,–!!! वाऱ्याबरोबर […]

पुण्याचा साठा

खिशांत माझ्या पडली होती,  सुटी नाणी काही वस्तूंची ती खरेदी करण्या,  सर्व बाजार पाही….१, सराफ्याच्या दुकानी दिसला,  एक हिऱ्याचा हार डोळे माझे चमकूनी गेले,  फिरती गरगर…२, दाम विक्रीचे जाणूनी घेता,  हताश मी झालो हातातील धनाचे मोजमाप, करू मी न शकलो…३ दोन वेळची पूजा करूनी,  जप माळ जपती खूप साचले पुण्य आपले,  हे कांहीं समजती….४, कसा मिळेल […]

1 … 194 195 196 197 198 … 440
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..