नवीन लेखन...

विश्रांती

धावपळीचे जीवन सारे, मिळे न कुणा थोडी उसंत विश्रांतीच्या मागे जाता, दिसून येतो त्यातील अंत ।।१।।   चैतन्यमयी जीवन असूनी, चक्रापरी ते गतीत राही चक्र थांबता क्षणभर देखील, मृत्यूची ते चाहूल पाही ।।२।।   थांबत नसते कधीही जीवन, अंत ना होई केंव्हां त्याचा निद्रा असो वा चीर निद्रा, विश्रांती ही भास मनीचा ।।३।।   थकून जाई […]

खेळण्या नसे पर्याय

दु:खाचे तूं देवूनी चटके,   सत्वपरिक्षा ही बघतोस प्रतिकूल ती स्थिती करूनी,  झगडत आम्हां ठेवतोस खेळामधली रंगत न्यारी, खेळ खेळणे चुके कुणा खेळातूनि अंग काढतां,  जगण्याच्या मिटतील खुणा…२, खेळगडी तो असूनी तुम्हीं,  मैदानासम विश्व भासते तन्मयतेनें खेळत असतां,  खचितच यश तुम्हा येते…३, विना खेळण्या पर्याय नसे, एक चित्त ते करूनी खेळा बसू नका हतबल होवूनी,  गमवाल त्या […]

तो पुन्हा आलाय

तो पुन्हा आलाय पण तो गडबडलाय आणि गोंधळलाय थोडासा हिरमुसलाय त्याच्या स्वागताची तयारी नाही उत्साह तर कुठेच दिसत नाही उत्सवी वातावरण नाही कसलीच लगबग नाही नेहमी कशी जय्यत तयारी असते स्वागताची सर्वांनाच प्रतिक्षा असते त्याच्या आगमनाची महिला वर्गाला पर्वणीच नटण्यामुरडण्याची बालगोपाळांना मोदक पटकावण्याची कलात्मक आरासी केल्या जातात पानाफुलांनी मखरं सजवली जातात घराघरांतून पूजा अर्चा केल्या जातात […]

सुखाचा डब्बा

जगातील वस्तू, वाटे आकर्षक देह सुख देण्या, समजे त्या ठिक…१ प्रत्येक गोष्टीला,  डब्याचा आकार सुखाचे वेष्ठन, ते चमकदार…२ चमक बेगडी,  फसवी सर्वाला काय डब्यामध्ये,  कळेना कुणाला…३ झाकण उघडा,  दुःख दिसे आंत लपून बसले,  प्रत्येक गोष्टीत…४ हात लावताच,  दुःख हाती येई भासलेले सुख,  नष्ट होत जाई…५ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

मी एकटी, मी एकाकी

अरे, एव्हाना ती यायला हवी होती ! अजून कशी उगवली नाही ती गवताची पाती ! ती आल्यावर प्रार्थनेचे सुर उमटतात. आसमंत उजळून निघतो, लता वेली डोलू लागतात. सुरू होते पूजा अर्चना आणि सरस्वतीची आराधना. मध्येच पोटात कावळ्यांचा कलकलाट. खाऊ झालाच समजा सफाचाट. कधी कधी ऐकू येतो गलका. माझ्या कानांना मस्त बसतो दणका. थोड्या वेळाने परतायची वेळ […]

काळाची चाहूल

जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१, भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२, चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो,  जो जो येई त्याच्या टापूत…३, जरी दिसे मारक कुणीतरी,  करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा  […]

 जीवनाचा खरा आनंद

केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   ।।धृ।। बालपणाची रम्यता    मजा केली खेळ खेळता निरोप देता बालपणाला   नाद गेला खेळण्याचा   ।।१।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   तारुण्याचे सुख आगळे   मादकतेने शरिर भारले बहर ओसरु लागला   दूर सारतां घट प्रेमाचा   ।।२।। केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा   प्रौढत्वाची शानच न्यारी   श्रेष्ठतेची ठरे भरारी येतां दुबळेपणा शरिराला   उबग येई […]

चुकलं माझं आई

माझ्यासाठी वणवण करुनही आई मी तुझ्यावर आज रागावलो चुकलं माझं आई मला क्षमा केव्हा करणार आहे? ||१|| मला आठवते, तुझ्या हाकेने मा़झी रोज सकाळ होई शाळेत जाताना न विसरता तू डब्बा देई ||२|| संध्याकाळ होताच क्षणी रोज माझी वाट पाही लवकर घरी आलो नाही तर तुझी चिंता वाढतच जाई ||३|| सगळ्या माझ्या हौस पुरवल्या चुकत असेल […]

देह मनाचे द्वंद

दोन स्थरावर जगतो मानव,  आंत बाहेरी आगळा  । भिन्न भिन्न ते दर्शन घडते,  यास्तव कांहीं वेळा  ।। एकच घटना परी विपरीत वागणे  । दुटप्पेपणाचा शिक्का बसतो,  याच कारणे  ।। देहा लागते ऐहिक सुख,  वस्तूमध्ये जे दडले  । अंतर्मन परि सांगत असते,  सोडून दे ते सगळे  ।। शोषण क्रियेत आनंद असतो,  ही देहाची धारणा  । त्यागमधला आनंद […]

कन्येस निराश बघून

कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं झेप तुझी आणि झेप आमची,  विसंगत राही असे उमलणारे फूल उद्याचे, तूं […]

1 120 121 122 123 124 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..