नवीन लेखन...

अपूर्व आहे आज सोहळा

अपूर्व आहे आज सोहळा चहूंदिशांनी झाले गोळा बालवृद्ध, स्त्रीपुरुष, ऋषिमुनी, नृपती, विद्वज्जन ।। ६ मंत्रमुग्ध जनसिंधूपुढती गिरा अमृतासम रसवंती प्रत्ययकारी शब्दौघातुन घाली संमोहन ।। ७ नऊ रसांचा सुचारु वापर चित्र उमटतें मन:पटावर वीर, करुण, शृंगार, रौद्र, शतरंगांचें मीलन ।। ८ नातीगोती, राग, लोभ, भय, मोद, क्लेश, छल, पीडा, अनुनय, निषेध, कौतुक, निसर्ग-मोहक, यथातथ्य चित्रण ।। ९ […]

निनादे जगतीं रामायण

सूत : प्रभुरामांच्या मानसमूर्तिस करुनी अभिवादन आदिकवी वाल्मीकि आदरें रचतीं रामायण ।। १ निनादे जगतीं रामायण ।। करुण क्रौंचवध समोर बघुनी कवितारूपें प्रगटे वाणी अमर जाहलें व्याधाप्रत ऋषिवर्यांचें भाषण ।। २ वरदहस्त श्रीवाग्देवीचा सहजसिद्ध प्रासादिक भाषा सज्ज कथाया रघुनाथांचें लोकोत्तर जीवन ।। ३ मर्यादापुरुषोत्तम रघुवर नरपुंगव, अद्वितिय धुरंधर जगा दिव्य आदर्श चिरंतन कौसल्यानंदन ।। ४ आश्रमात […]

बदलती पिढी

पिढी गेली रूढी बदलली,  बदलून गेले सारे क्षणा क्षणाला बदलून जाते,  मन चकित करणारे….१, सुवर्णाचे दाग दागीने,  हिरे माणके त्यात पिढ्यान पिढ्याचे मोल राहती,  श्रीमंतीचा थाट….२, चमचम आली तेज वाढले,  नक्षीदार होवूनी फसवे ठरले आजकालचे,  क्षणक जीवन असुनी….३, हासणारी ती फुले बघीतली,  आणिक इंद्र धनुष्य नक्कल करता निसर्ग कलेची,  दिसे त्यात ईश….४, ओबड धोबड बटबटती ते, […]

एक सैनिक ‘ बाप ‘

एक सैनिक ही बापचं असतो जरी तो घरापासून दूरवर असतो, तुझ्या जन्माचा आनंद ही घेता आला नाही बाप म्हणून गावभर मिरवता ही आले नाही, तुझ्या आठवणीत उश्या खाली रडतो या सैनिकांचं मन कोण भला जाणतो, घरी आल्यावर ओळखशील का ग मला.. बाबा बाबा हाक मारशील ना ग मला.. ना बाहुली ना खेळणी आणली मी तुला आल्यानंतर […]

आरसा

दाखवितोस हूबेहूब रुप    आरशामध्ये मला मीच माझे रुप बघूनी    चमत्कार वाटला सत्य स्थितीचे द्दष्य करुनी    दाखविलेस सर्वाला उणें अधिक न करितां   तसाच दिसे आम्हाला गुणदोष बघूनी देहाचे    मुल्य मापन करितो आम्हीं चांगले राहण्या शिकवी    हीच युक्ती नामी कांचेच्या आरशापरीं असे    मनाचा अरसा आत्म्याची मलीनता दाखवुनी   चांगला बनवी माणसा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

भरताचा जाब

ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी, कां धाडिला राम वनीं ?   कैकयीला भरत विचारी   ।।धृ।।   आम्ही बंधू चौघेजण, झालो एका पिंडातून, कसा येईल भाव परका ? असतां एकची जीव, चार शरीरीं कैकयीला भरत विचारी   ।।१।।   वचनपूर्ती ब्रीद ज्याचे, आदर्श जीवन रघूवंशाचे, कसली शंका मनांत होती ? पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी, कैकयीला भरत […]

बाळकृष्ण

रंगले माझे मन मुरारी नाम येई मुखीं श्रीहरी   //धृ//   काळा सावळा रंग कोमल भासे अंग हास्य खेळते वदनीं तेज चमके नयनीं ओढ लागतां शरिरीं    //१// रंगले माझे मन मुरारी, नाम येई मुखीं श्रीहरी   कंठी माळा चमकती मोर पिसे टोपावरती पायीं नुपुरे घालूनी नाचतो ताल धरुनी हातांत त्याच्या बासरी   //२// रंगले माझे मन मुरारी, नाम […]

दृष्टी बदल

नवा चित्रपट बघण्या गेलो,   कुटुंबासह चित्र मंदिरी चित्रगृह ते भरले असतां,   प्रवेश मिळाला कसातरी….१, चित्रपट तो बघत असतां,  आश्चर्य वाटले जल्लोशाचे टाळ्या, शिट्या देवून प्रेक्षक,  कौतूक करी नटनट्यांचे….२ वास्तवतेला सोडूनी,   रटाळपणे वाहत होते, वैताग येवूनी त्या चित्राचा,   सोडून आलो मधेच मी ते….३, घरी येवूनी शांत जाहलो,  आठवू लागलो बालपण अशीच होती छायाचित्रे,  ज्यांत आमचे रमले मन….४ […]

श्री कृष्ण जन्मी सेवेसाठी स्पर्धा

चालली स्पर्धा साऱ्यांची,  प्रभूची सेवा करण्याची….।।धृ।।   निशाराणी संचारी निद्रीत जाई पहारेकरी खट्याळ वारे धावूनी दारे दिली उघडूनी विज चमकूनी आकाशी   मदत होई वसुदेवाची….१ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   पावसाच्या पडती सरी पक्षी नाचती तालावरी कोकीळेचे सुरेल गान आनंदाने वातावरण नागराजा फना काढूनी   काळजी घेई नव बाळाची….२ चालली स्पर्धा साऱ्यांची प्रभूची सेवा करण्याची   […]

काव्य कलश

ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे, पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला, नाहून जाता त्यात,  देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे,  पसरते चोहीकडे, आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

1 103 104 105 106 107 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..