नवीन लेखन...

वेडी

रस्त्यावरती उभी राहूनी,  हातवारे ती करित होती मध्येच हसते केंव्हां रडते,  चकरा मारीत बसे खालती…१, गर्दी जमली खूप बघ्यांची,  कुत्सीतपणे न्याहळू लागली, ‘शिपाई आणा जावूनी कुणी’,  ठाण्यात नेण्यास सांगू लागली…२ जीवनातील दु:खी चटका,  सहनशक्तीचा अंत पाहतो, मनावरील तो ताबा सुटूनी,  वेडेपणा हा दिसून येतो…३ इतकी गर्दी जमून कुणीही,  तिच्या मनीचा ठाव न जाणला रूख रुख वाटली […]

दु:खी अनूभवी

दु:ख जाणण्या दु:खी व्हावे, या परि अनूभव दुजा कोणता सत्य समजण्या कामी न येई, तेथ कुणाची कल्पकता  १ धगधगणारे अंगारे हे, जाळती जेथे काळीज शब्दांचे फुंकार घालूनी, येईल कधी का समज  २ मर्मा वरती घाव बसता, सत्य येते उफाळूनी चेहऱ्यावरले रंग निराळे, हलके हलके जाती मिटूनी ३ त्या दुःखीताला जाणीव असते, जीवनामधली निराशा कशी झेप घेवूनी […]

आनंदात गाऊं

प्रेमिकांचे गीत गाऊं आनंदात न्हाऊ //धृ// बागेमधल्या फुलानीं सुगंध आणिला वनीं फुलपाखरासमान  गंधशोषित जाऊ //१// प्रेमिकांचे गीत गाऊं     आनंदात न्हाऊ कोकिळ गाते आम्रवनीं कुहू ss  कुहू ss स्वर काढूनी नक्कल करण्या तिची  उंच लकेरी घेऊं //२// प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ श्रावणाच्या पडती सरी अंग भिजते थोडे परि सप्तरंगाचे इंद्रधनुष्य  आकाशांत पाहूं //३// प्रेमिकांचे गीत गाऊं […]

स्फूर्ती दाता

तुम्ही गेला आणि गेले सुकूनी माझे काव्य समजूनी आले रूप तुमचे होते जे दिव्य  १ तुमच्या अस्तित्वाने मजला येत असे स्फूर्ती प्रफूल्लीत ते भाव सारे ओठावर वाहती  २ कोकीळ गाते गाणे जेंव्हां वसंत फुलतो वनी मोर नाचे तालावरती श्रावण मेघ बघूनी  ३ हासत डोलत कळी उमलते प्रात: समयी दवबिंदूच्या वर्षावाची किमया सारी ही  ४ गात नाचत […]

आला ! आला रे पाऊस !

आला  !   आला रे पाऊस ! धरणीला मीलनाची आंस    //धृ//   गेली होती तापूनी      रखरखली सारी, अंग जाता वाळूनी     भेगा पडती शरीरी  ।। थकली ती सोसूनी     उकाड्याचे चार मास आला  !   आला रे पाऊस ! धरणीला असे मीलनाची आंस    ।।१।।   पाणी गेले आटूनी     नदी नाले कोरडे, पहाटेच्या दवातूनी   झाडे जगती थोडे  ।। गेली हरळी जळूनी   […]

बालपणीची भांडणें

मजेदार वाटत असती,  भावंडांची बघून भांडणें ‘मला पाहीजे जास्त’,  हेच मुख्य मागणें   इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार दांत ओठ खाऊनी,  रागव्यक्त होणार   क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें   राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं स्वार्थतेचा अभाव दिसे,  शत्रु येथे नसे कुणी   बालपणीच्या […]

गतकाळ विसर

विसरून जा भूतकाळ तो, नजर ठेवूनी भविष्यावरी, वर्तमानी राहून प्रवाही, जीवन सारे यशस्वी करी ।।१।।   व्यर्थ होतील प्रयत्न तुझे, उगाळता गत आठवणी, खीळ पडेल उत्साहाते, अपयश आले हे जाणूनी ।।२।।   ज्ञान जगाचे मिळूनी तुला, जन्म जहाला आजच खरा, अनुभवी नव बालक तूं, वाहून नेई जीवन धुरा ।।३।।   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

खरे ग्रह

तुमचे जीवन अवलंबूनी,   ग्रहराशीच्या दशेवरती तेच होई जीवनी तुमच्या,   जसे ग्रहमंडळ फिरती…१, मित्र मंडळी सगे सोयरे,  शत्रू असोत वा प्रेमाचे, जीवनातल्या हालचालीवरी,   परिणाम ते होई सर्वांचे…२, हेच सर्व ते ग्रह असूनी,  सतत स्थान ते बदलती परिस्थिती बघूनी तुमची,   वागण्यात तो फरक करती…३ अपयशाला कारणीभूत तो,  असतो कुणीतरी नजीकचा राहू-केतू शनि वा मंगळ,  ग्रहमान बनतो त्या घडीचा…४, […]

आनंद घट

देहमनाचा आनंद औरची,  नसे तयाला दुजी कल्पना  । जीवनामधले मिळता सारे,  उरे न तेथे कसली तुलना  ।।  १ आनंदाचा घट भरूनी हा,  तन मन देयी पिण्यासाठी  । आनंदाला नसे सीमा मग,  अनेक घट अन् अनेक पाठी  ।।  २ एक घटातूनी आनंद मिळता,  दुजे घट हे जाती विसरूनी  । अनेक घटांतील आनंद हा,  लूटाल कसा तृप्त होवूनी  […]

जीवन मृत्यू खेळ

सर्व दिशांनी घेरूनी येतो, मृत्यू तुमचे जवळीं सही सलामत निसटून जाणें, हीच कला आगळी….१, भक्ष्य त्याचे बनून जाणें, चुकत नाही कुणा, काळाची ती भूक असूनी,  माहीत असते सर्वांना….२, अविरत चालू लपंडाव ,  जगण्या मरण्याचा शेवट हा जरी निश्चीत असला,  हक्क तुम्हां खेळण्याचा….३, खेळती काही तन्मयतेने,  रिझविती इतरजणां, खेळामधले नांव करूनी, आदर्श ठरती जीवनां….४ — डॉ. भगवान […]

1 102 103 104 105 106 437
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..