नवीन लेखन...

‘शुक्र तारा’ जो संगीतातला

३० एप्रिल…..  ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे उर्फ खळे काका यांचा जन्मदिवस ! “सर्व सर्व विसरू दे गुंतवू नको पुन्हा” हे गाणं म्हणता म्हणताच ज्यांच्या संगीतात , लयीत आणि तालात आपण गुंतत जातो ते खळेकाका ! ” गोरी गोरी पान” ते “लळा जिव्हाळा शब्दच खोटे”, “या चिमण्यांनो परत फिरा रे” ते “ऊन असो वा असो सावली”, “चुकचुकली […]

इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू

( ही कविता प्राणवायुला समर्पित !) इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू । जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।। लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे । प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।। इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा । जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।। एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक । […]

तो….

जातो छापील अभ्यासक्रमाच्या बाहेर काळजी घेतो ” मानसिक ” आरोग्याची हळुवार शब्दांनी फुलवतो मने विकासाच्या फुलांना गंध देतो त्याला आयुधं लागत नाही – वन्ही पेटवायला ! तो अनादी आहे- अनंत आहे त्याच्यावाचून जग शक्य नाही तो कधी सांदीपनी होतो , कधी चाणक्य तर कधी अब्दुल कलाम आई तर तो कायम असतोच पण वडिलपणही अबोलपणे निभावतो ” […]

जखमांचे वण

किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती. एकच गोष्ट सतत कानी पडत होती. उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा. भडीमार होत होता आईकडून शब्दांचा.. आम्ही होतो बालपणीच गांधीवादी. एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे. मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे. खेळणें, कुदणें, उड्या मारणें, त्यातच […]

दुर्बल मन नको

सारेच आहेत दुबळे कुणाते नसे शक्ति वेळ येतां दुर्बल ठरे जे सबळ समजती  ।।१।। विचार मनी येतां दुसरा शक्तिशाली समजोनी  जावे तेव्हां हार तुमची झाली ।।२।। मनाची सबलता हेच शक्तीचे मापन काय कामाचा देह दुर्बल असतां मन ।।३।। सुदृढ देह व मन यांची मिळून जोडी जीवनातील यश तुमच्या पदरीं पाडी ।।४।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

काळ व कार्याची सांगड

मानव जीवन तुम्हां लाभले, महत् भाग्य ते समजावे कर्म दिधले पाठी तुमच्या, सद्उपयोगी यांसी करावे….१, जीवन रेखा मर्यादेतच, ठेवली असती तुमचे हातीं जाणीव त्याची मनीं असावी, कर्म कार्ये जेव्हां करिती…२, हाती घेतल्या कार्यामध्ये, एकचित्त तो प्रयत्न व्हावा काळ केवढा तुमचे जवळी, याचा विचार सतत यावा…३, कार्ये राहता अपूर्ण अशी, वेळ न उरे तुमचे हाती अभाव असता […]

आता तरी लस घे…

नकोसा झालाय हा करोना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही ह्याच्या झळा पार होरपळून टाकतात ह्याच्या असण्याने शब्दही शब्दाला गिळून टाकतात का हा असा छळतो काही कळत नाही मन सतत पळ म्हणत पण तो काही पळत नाही दुःखाच्या घेऊन येतो लाटा जगण्याच्या बंद करतो वाटा माणूस फक्त करतोय आटापिटा पण श्वास मात्र थांबत जाई जीवनचक्र […]

आस्तित्व

समोर ये तूं केंव्हा तरी, बघण्याची मज ओढ लागली, फुलूनी गेली बाग कशी ही, बीजे जयांची तूच पेरीली ।।१।। कल्पकता ही अंगी असूनी, दूरद्दष्टीचा लाभ वसे, अंधारातील दुःखी जनांची, चाहूल तुज झाली असे ।।२।। शीतल करुनी दुःख तयांचे, जगण्याचा तो मार्ग दाखविला, सोडूनी सारे वाटेवरी, आकस्मित तू निघूनी गेला ।।३।। आस्तित्वाची चाहूल येते, आज इथे केंव्हातरी, […]

पेराल तसे उगवते

रुजविता बियाणें अंकूर फुटती असतील दाणे जसे तेच उगवती पेरता आनंद आनंदचि मिळे प्रेमाची बियाणें प्रेम आणी सगळे शिवीगाळ करुनी आदर येई कसा शत्रुत्त्वासंगे नसे मैत्रीचा ठसा घृणा दाखवूनी कसे येई प्रेम क्रोधाच्या मोलाचे शांती नसे दाम पेरावे तसें उगवतें नियम हा निसर्गाचा सुख दुःखाला कारण स्वभाव ज्याचा त्याचा डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

देवाचिया दारीं

देवाचिया दारीं, मनाचा मुजरा, झुकवूनिया मान, हासे तो चेहरा ।। धृ ।। जाई जेव्हां मंदिरी, घेतां प्रभू दर्शन, आनंदानें नाचते, हर्षित चंचल मन, नयन साठविती, त्या मंगल ईश्वरा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।१।। नदीनाले धबधबा, उंच उंच वृक्ष वेली, कोकीळ गाती, मोर नाचे, इंद्रधनुष्याच्या खाली, रोम रोमातूनी शिरे, निसर्गाचा फवारा, देवाचिया दारी मनाचा मुजरा  ।।२।। दु:खी […]

1 101 102 103 104 105 439
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..