रस्ता
कुठे जातो हा रस्ता कुठेच नाही इथेच पडून असतो नुसता ! कुठे नेतो हा रस्ता कुठेच नाही जागचा हलतही नाही नुसता ! अजबच म्हणायचा हा रस्ता भुईला म्हणायचा भार नुसता ! रस्ता कुठे जात नसतो रस्ता कुठे नेत नसतो रस्ता जागच्या जागीच असतो प्रवासी मात्र चालत असतो रस्ता जरी स्वस्थ असतो तरी त्याला शेवट असतो प्रवाशाने चालायचे असते रस्त्यारस्त्याची […]
