नवीन लेखन...

एक अभागी – नक्षलवादी दहशतीची बळी (कथा ५)

शाळेत मुळाक्षर,शिकणे, १०० पर्यंत आकडे मोजणे, प्रादेशिक कोया भाषेत हे सर्व लिहिता येणे, ही नक्षलवादी जनता सरकारची सर्व मुलामुलींना शिक्षण देण्याची पद्धत, इयत्ता वगैरेची गरज नाही, अबुजमाड भागात अशा शाळा आहेत. एवढे जुजबी शिक्षण घेतले की यातील काही मुले खेड्यातील आपली राहती चंद्रमोळी झोपडी सोडून जंगलातील नक्षलवादिंच्या तंबूत राहण्यास येतात व तेच त्यांचे कायमचे आयुष्य जोपर्यंत […]

एक परीस स्पर्श ( भाग – १६ )

विजयच अभिनयाचं वेड त्याच्या घरच्यांना आवडत नव्हतं. म्हणून ! नाहीतर आज तो अभिनयाच्या क्षेत्रात नक्कीच एका उंचीवर असता. त्याने एक व्यावसायिक नाटक लिहिले होते.  त्या नाटकाचा प्रयोग प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाला होता, तेंव्हा विजय आणि त्याचे पाच सहा मित्र ते नाटक पाहायला गेले होते. […]

एक परीस स्पर्श ( भाग – १५ )

विजयने दुसरा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला. आणि एक प्रेमपत्र लिहायला घेतलं. म्हणजे त्याच्या आयुष्यातील पहिलं आणि शेवटचं प्रेमपत्र लिहायला घेतलं. ते प्रेमपत्र हजार शब्दांचं होतं. त्या पत्राच्या शेवटी त्याने त्याच्या आयुष्यातील पहिली कविताही लिहिली होती. […]

मृत्यु नक्षलवादींचा का गरीब निष्पाप आदिवासींचा ? (कथा ३)

बस्तर व बिजापूर हे छत्तीसगड मधील नक्षल चळवळीचे महत्वाचे जिल्हे, बिजापूर जिल्ह्यातील सारकेकुडा, कोटागुडाव राजपेटा या तीन खेड्यात रात्री गावकीची सभा चालू असताना SRP नी कोणतीही सूचना न देता बेछुट गोळीबार केला, पळापळ झाली, सभा उधळली दुसर दिवशी चंद्रमोळ्या झोपडयां समोर पुरुष व मुलांची प्रेते कापडात गुंडाळलेली, हताश होऊन कपाळाला हात लाऊन बसलेली गावकरी मंडळी त्यात […]

मधल्या मधे

आम्हीच माघार घेतली पाहिजे बरोबर आहे घर त्यांच राज्यही त्यांचेच आम्ही आश्रीत तेंव्हा बोलायचे नाही गप्प गुमान बंद करा आणि बसा शांत. आता नानांची पण काही चूक नाही. आर्थिक परिस्थिती मुळे सिनेमा नाटक सहली काहीही जमले नाही व्यवसाय. कामाचा व्याप मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी पैसा व वेळ गेला. आत्ता कुठे सगळे स्थिरस्थावर झाले आहे. […]

काळोखी गुहेत (कथा २)

ओडीसा राज्यातील तेंबुली नावाचे खेडे जेथे सामान्य जीवन जगण्याकरता लागणाऱ्या सर्वच वस्तूंची वांनगा आहे. अगदी आशा सुद्धा लुप्त पावलेली आहे. खेड्याच्या एका बाजूस नक्षलवादीचा तळ त्यामुळे सरकारी कोणतीच यंत्रणा अस्तिवात नाही, खेड्यातील एक तरुण आदिवासी बाई आपल्या ३ वर्षाच्या छकुलीला कडेवर घेऊन पाणी आणण्या साठी एका ओढ्याकडे चालत निघाली होती. प्रेमाने तिचे नाव ठेवले होते प्रीती […]

झुंडशाही (कथा नंबर १)

बस्तर मधील सुरगुजा जिल्हा जंगल, नद्या. दर्याने वेढलेला, खळाळणारे असंख्य नाले, रस्त्याला रस्ता म्हणायचे तरी कसे?काही वेळा घनदाट जंगलात नक्षलवादी वस्तीस येत, आदिवासींकडून हक्काने शिधा गोळा करत, तसे पाहता हा प्रदेश इतका मागासलेला, आदिवासींचे विखुरलेले पाडे, थोडीपार शेती, गुजराण तरी  कशी करणार? अर्ध पोटी जीवन चालू होते इतकेच. कारवा खेडे म्हणजे पाच पंचवीस चंद्रमोळी झोपड्या,काहींच्याच पडवीत […]

अकल्पित (भाग – 3)

“सकाळी मला जाग आली ती दारावर कुणीतरी जोरजोरात धक्के मारत होते त्या आवाजाने. मी जागी झाले आणि मनात पहिला विचार आला तो ह्यांचा. आम्हा दोघांना एकत्र पाहिले तर आमची धडगत नाही या विचाराने माझा थरकाप झाला. मी चटकन शेजारी सूर्यकांत राजेंना उठवावे म्हणून पाहते तर तिथे कुणीच नाही! या सगळ्या विचारात एखादा क्षण गेला असेल नसेल […]

अकल्पित (भाग 2)

घरी गेल्यावर मी पाचगणीला आईला मोबाईलवरून झालेली घटना सांगितली. ती म्हणाली, “अजितराजे, राजासमोर कुणी कसे बोलावे हे लोकांना कळत नाही. पण हे नेहमीचे उत्तर मला काही पटले नाही. एखाद्याच्या केवळ नजरेने एखाद्याची हृदयक्रिया बंद पडावी आणि त्यात त्याचा जीव जावा हे मला फारच विचित्र वाटले. आजपर्यंत माझ्या नजरेत अनोखी जरब आहे हे मला दिसत होते आणि […]

अकल्पित (भाग – 1)

मलबार हिलच्या नारायण दाभोळकर रोडवरच्या श्रीमंत वस्तीत ही वीस मजली इमारत. या इमारतीच्या विसाव्या मजल्यावरील पाचहजार चौरस फुटाचा हा अलिशान टेरेस फ्लॅट माझ्या मालकीचा आहे. मी आज एक तीस वर्षांचा तरुण उद्योजक आहे. संपूर्ण देशभर माझ्या उद्योगाचे जाळे पसरले आहे. हे सर्व वैभव मी माझ्या हुशारीने कमावले आहे. अर्थात माझ्या आईचा फार मोठा सहभाग आहे. नव्हे, […]

1 … 59 60 61 62 63 … 115
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..