नवीन लेखन...

स्पर्श निर्मली

लाभला जीवा निखळ मैत्र सुखावलो सदासर्वकाळ सुखही होते , दुःखही होते भोगभोगले प्रारब्धाचे खेळ….. भाळी पान्हाच मातृत्वाचा निर्भयी आधार पितृत्वाचा नव्हती कशाची खंतवेदना स्पर्श निर्मली सात्विकतेचा…. अंगणीचा सडा संस्कारांचा मीत्वास , दूर सारित राहिला नुरली अपपर भावनां अंतरी बीजांकुर मानवतेचा रुजला…. लागला जन्म सारा सार्थकी जाणवला साक्षात्कार ईश्वरी ब्रह्मातची ब्रह्मनाद ब्रह्मानंदी गीतातुनी स्त्रवली मधुर पावरी…. रचना […]

आठव स्मृतींचे

कधीतरी बोलना तूं एकदा गुज तुझ्या अव्यक्त अंतरीचे आता सरला हा जन्म सारा गहिवरले हे हुंदके भावनांचे गोठले स्नेहार्द भाव अंतरात भिजले चिंब पदर पापण्यांचे सांग! मनास कसे समजवावे दारुण दग्धदुःख या जीवनाचे हरविले सारे व्याकुळला जीव तरीही लोचनी आठव स्मृतींचे रचना क्र. १३४ / ४ / १० / २०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 

मन्या इंजिनियर

मन्या इंजिनियर फिरता फिरता बघायाचा नुसत्याच पोरी; म्हणायचा अन मनाशीच की पटविन मी, हि सरीता गोरी; मिचकावुनि मग उजवा डोळा आणि उडवुनी डावी भिवयी, भिरकावुनि ती तशीच ध्यायचा लकेर बेचव जैसा गवयी. ऑफिसातली ड्रॉईंग्ज बघणे; जिग, फिक्स्चर जॉब्ज अर्जंट, ऑइल तेल अन कुलंट नळीचे चेकिंग करणे आकडे कोळित; स्वप्नांवरती धूर सांडणे क्वचित बिडीचा वा मशीनचा धडधड […]

वेड

केलेस प्रेम तू ही भलत्याच गं धिटाने उरली उजाड वस्ती तू जिंकली कटाने ​ मी हा असा कफल्ल्क माझी उदास गाणी विराण या जगाची झालीस पट्ट राणी ​ देऊ कसे तुला मी आणून चंद्र तारे जखडून घेतले मी हे पाय या धरे वर घेऊन स्वप्न पंखे आलीस तू अशी का आधीच भंगलेली स्वप्ने इथे किती तर […]

सांजाळ

किती, कसे, कुठे शोधू तुला अशी कुठे? तूं हरवुनी गेली… लोचनी रूप तुझेच लाघवी पापणी, नित्य पाणावलेली… प्रतीक्षेत हरविले दिन ते सारे क्षितिजी सांजाळ थबकलेली… निलांबरी, मोहोळ आठवांचे निमिषात तूंच उठवूनी गेली… हे सारे, आज कसे विसरावे अशी कुठे गं तूच हरवून गेली.. प्रीतिवीण कां? जगणे असते धुंद श्वासात, गंधाळते बकुळी शीणलो तरी वाटते तुला पहावे […]

सालं माणसाचं असंच असतं

लहान असताना लहानपण नको असतं मज्जा असते पण शिस्त नको असतं म्हणून पटापट मोठ्ठं व्हायचं असतं सालं…..माणसाचं असंच असतं आजोळी गावाला जायचं नसतं चुलीतल्या निखार्‍यांवर काजू भाजत कोपरापर्यंत रस गळणारा रायवळ बदाक् कन परसात पडलेला फणस त्यातले पिवळेजर्द गोडूस गरे दुपारी खळात वाळवलेली आंबापोळी कच्च्या फणसाचे तळलेले गरे हे सगळं हवं पण गाव नको असतं सालं…..माणसाचं […]

लोकशाहीचे ओझे ?

पुरातन काळापासून खांद्यावर ओझे वाहणे हाच एककलमी कार्यक्रम समाजातील सामान्यांसाठी ! त्यावेळी पालखीत बसलेले मंदिरातील देव होते, सरदार होते , दरकदार होते ! संत होते , महंत होते, पंडित होते ! आज सजलेल्या पालखीत खासदार आहेत, आमदार आहेत , मंत्री आहेत , संत्री आहेत त्यांचे काटेचमचेपळ्या आहेत ! ओझे वाहणारे भोई मात्र तेच आहेत, समाजातील सामान्य […]

दुर्लभ जीव मानवी

अंगवळणी पडल्या दुःखवेदनां सभोती निर्विकार सुख संवेदना सारेच आपुले सख्ये सखेसोयरे परी दुर्मिळ झाल्या प्रीतभावनां…. भास शुष्कतेचे, संपली मृदुलता गोठले प्रेम, प्रीती कवटाळतानां हरविला प्रीतवात्सल्य जिव्हाळा हाच शाप कां? जन्म भोगतानां…. अंमल हाच कलियुगाचाच सारा वाटते, भोग प्रारब्धाचे भोगतानां युगायुगांचा हा दुर्लभ जन्म मानवी तिथे कुठली सुखदा वात्सल्याविना…. रचना क्र. ९९ ८/८/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

स्वैराचारी स्वातंत्र्य

स्वातंत्र्यदिनी मातृभूचे आक्रंदन घामेजले शरीर, भडका दिशांत झाला दूषित भूमी झाली, वारा विषारी झाला तोडुनी वृक्षराई, डोंगर उजाड केला निसर्ग कोपूनिया दुष्काळ माथी आला स्वातंत्र्यतेज आमुचे, सारे दूषित झाले आम्हीच हे स्वहस्ते, ऐसे अघोर केले ऐशा कुकर्मी आज,जनताच त्रस्त सारी स्वातंत्र्य हे कशाचे? ना संपली गुलामी सारे विषारी अन्न,भाजीत विष मिळते पाणी नदीतले ही, सारे अशुद्ध […]

आला पंचमीचा सनं……

आला पंचमीचा सन,घेऊन माहेरचा सांगावा बैलं जोडुनं डमनीलं,आला घ्याया भाउराया. वाट माहेराची सये,कटता कटेनं लवकर, मन व्हतया पाखरू,धुंडे माहेरचं आंगणं. डमनी भाऊरायाचीबाई,नाद घुंगराचा छुनछुनं, मन होई कासाविस,पाह्या माहेरचं गणगोतं. माहेरात सखीबाई,दारी मिजाज उंबराची, आठवे लहानपणचा झोका,मन लहानुनं जाई. आला पंचमीचा सनं,झोका झाडालं बांधला, वरसाची नवलाई,खेळं हौशीचा मांडला सासुरवाशीन मी गं सये,सुखं माहेरचा झोका, झोका खेळी वार्‍यासंग,ईसरे […]

1 3 4 5 6 7 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..