आला पंचमीचा सनं……
आला पंचमीचा सन,घेऊन माहेरचा सांगावा बैलं जोडुनं डमनीलं,आला घ्याया भाउराया. वाट माहेराची सये,कटता कटेनं लवकर, मन व्हतया पाखरू,धुंडे माहेरचं आंगणं. डमनी भाऊरायाचीबाई,नाद घुंगराचा छुनछुनं, मन होई कासाविस,पाह्या माहेरचं गणगोतं. माहेरात सखीबाई,दारी मिजाज उंबराची, आठवे लहानपणचा झोका,मन लहानुनं जाई. आला पंचमीचा सनं,झोका झाडालं बांधला, वरसाची नवलाई,खेळं हौशीचा मांडला सासुरवाशीन मी गं सये,सुखं माहेरचा झोका, झोका खेळी वार्यासंग,ईसरे […]