नवीन लेखन...

सर्वात वाईट वस्तू

(उत्तरप्रदेशची लोककथा)

एक मौलवी होते. त्यांनी सगळीकडे आपल्या प्रामाणिकपणाचा प्रचार प्रसार केला. मशीदीत बसून दिवसभर मुलांना शिकवित असत आणि जी फी मिळे त्यात आपला उदर निर्वाह करीत असे. एक दिवस संध्याकाळी ते घरी आले आणि पत्नीला म्हणाले, “आज काय स्वयंपाक केला आहे. फार भूक लागली आहे.” ती म्हणाली, “आपण जेवावयास बसा. मी कोंबडा बनविला आहे.” “कोंबडा कुठून आणला?” मौलवीनी विचारले.

“संध्याकाळी आपल्या अंगणात एक कोंबडा उडून आला; मी त्याला कापले आणि शिजविले.” पत्नी म्हणाली.

“दुसऱ्याचा कोंबडा तू कापला. तुला लाज कशी वाटली नाही. लोकांना कळलं तर ते काय म्हणतील. तू माझे नाव डुबवयास निघाली आहेस की काय?

कोणाला विचारलं तरी होतं का?” मौलवी म्हणाले.

“मी संपूर्ण गल्लीत सगळ्यांना विचारलं, तो कोणाचाही नव्हता. तेव्हाच कापला.” “बरं, बरं, मसाला कुठून आणला?” “मसाला तर घरात होताच” “बरं, ठीक आहे. मी कोणा दुसऱ्याचा कोंबडा खात नाही. मसाला आपलाच आहे म्हणून तू फक्त रस्सा वाढ.” मौलवीजी म्हणाले.

पत्नीने रस्सा वाढला. मौलवीने सगळा रस्सा संपविला आणि म्हणाले, “थोडा रस्सा अजून वाढ.”

पत्नी भांडच घेवून आली. आणि वाटीत रस्सा ओतू लागली तर एक दोन बोट्या त्यात पडल्या. ती चमच्याने त्या बोट्या काढू लागली. तर ते म्हणाले, “राहू दे, ज्या बोट्या आपोआप येत आहे त्या येवू दे. त्यांना तर मी न स्वतः घेत आहे, न तू देत आहेस. तेव्हा यात काही पाप नाही.” याप्रमाणे बऱ्याच बोट्या त्यांच्या वाटीत आल्या. त्यांनी पोट भरून त्या खाल्या.

सकाळी झोपून उठले तर काय पाहतात की त्यांच्या पाठीवर कोंबड्याचे पंख उगविले आहेत. ते घाबरले. आणि चादर पांघरून मशीदीत मुलांना शिकवायला आले. इमाम साहेबांनी विचारले, “काय बरं वाटत नाही का? चादर का पांघरली आहे. त्यांनी आपले दुःख इमाम साहेबांना सांगितले.” इमाम साहेबांनी उपाय सुचविला की उद्या तुम्ही वाईटातील वाईट वस्तू खा तरच तुमचे पंख नष्ट होतील.

मौलावी शोधात निघाले. भूकेने बेजार होवून बाजारात फिरत होते. त्यांनी पाहिले एका सावकाराच्या घरी जेवणावळ सुरू आहे. त्याने मौलवीजींना आग्रह केला. एकाहून एक चांगले पक्वान्न पाहून ते जेवावयास बसले. पोटभर जेवण केले.

सकाळी उठून पाहतात. तर पंख गायब. अत्यंत आनंदित होवून ते इमाम साहेबांकडे गेले. कारण विचारले तेव्हा इमाम साहेब म्हणाले, “तुम्हाला माहितच आहे, सावकाराचा व्यवसाय व्याजाने पैसे देणे आहे. त्याच्याजवळ गरीबांच्या व्याजावर एकत्र झालेला पैसा आहे. जेवणावळ ही त्याच पैश्यातून दिली आहे.

व्याजापेक्षा कोणतीही वाईट वस्तू नाही. म्हणून तुमचे पंख गायब झाले आहेत.” मौलवीच्या लक्ष्यात आले आणि त्यांनी भविष्यात सत्य आणि प्रामाणिकपणाने जगण्याची शपथ घेतली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..