नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

लगन गंधार !

पुण्याहून येताना त्यादिवशी असंच वातावरण होतं. किंबहुना जास्तच . पुढचं काही दिसत नव्हतं . अशा परिस्थितीत गाडी थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता . त्या अंधुक गूढ वातावरणात लगन गंधारचा बोर्ड दिसला आणि गाडी थांबवली . पळतच हॉटेलात घुसलो . त्या गारठ्यात गरम चहाची तल्लफ आली होती . पण ऑर्डरचे शब्द तोंडात येण्यापूर्वी कानात कुमार गंधर्वांच्या निर्गुणी भजनाचे स्वर घुमू लागले . […]

अजब न्याय नियतीचा – भाग १०

नील आणि आरू दीचे निरीक्षण करत होते…. तिचा चेहेरा थोडा ओढल्यासारखा दिसत होता. कालचा विषय कसा काढावा याचा ते विचार करत होते. शेवटी काल रात्री नक्की काय झालं ते दीनं सांगितल्याशिवाय त्यांना कळणारच नव्हते. दी शांतपणे पेपर वाचत चहा पीत होती. जरा वेळाने दीचे दोघांकडे लक्ष गेले…. दी हसून म्हणाली, “अरे, तुम्ही दोघे असे काय बघताय माझ्याकडे? माझ्या तोंडाला काही लागले आहे का?” […]

अजब न्याय नियतीचा – भाग ९

तिघेही गाडीतून नदीच्या जवळ आली. गाडी बाजूला लावून घाटाच्या पायऱ्यांवरून ते गप्पा मारत फिरत होते. आरुला तर गांवी यायला आणि असे नदीवर फिरायला खूपच आवडत असे, पण हल्ली गांवी जास्त येणं होत नव्हतं. नील आणि दीच्या गप्पा चालल्या होत्या. बोलत बोलत ते दोघे थोडे अंतर पुढे निघून गेले. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ८

ठरल्याप्रमाणे आठ दिवसांनंतर नीलच्या गाडीतून चारू, आरू आणि नील गांवी जायला निघाले. मुंबईपासून गावापर्यंचे अंतर ४५० ते ५०० किलोमीटर तरी होते. पण गाडीत छानशी गाणी ऐकत, गप्पा मारत, अधुन मधून रस्त्यात निसर्गरम्य परिसरांत थांबून तिथले फोटो काढत, रमत गमत संध्याकाळ्च्या सुमारास ते गांवी पोहोचले. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ७

आरूने तिचे शेड्युल पाहून १२ ते १५ फेब्रुवारी या तारखा गांवी जाण्यासाठी नक्की केल्या. जाण्यापूर्वी तिला तिच्या पूर्ण ऑर्केस्ट्रामधील इतर मित्रमंडळींना प्रॅक्टिस संबंधी महत्त्वाच्या सूचना द्यायच्या होत्या. चार-पाच दिवसांसाठी ट्रीपला जात असल्यामुळे घरातील इतर गोष्टींची व्यवस्था लावायला हवी होती. गांवी लागणाऱ्या वस्तूंचे शॉपिंग करायचे होते. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ६

तिघंही कॉफी पीत बराच वेळ गप्पा मारत बसले होते. नीलशी बोलताना दी खूपच आनंदी दिसत होती…… नील जरी आरूचा मित्र होता तरी तो घरी आल्यापासून दीबरोबरच जास्त गप्पा मारत होता. आरू एकदा दीकडे आणि एकदा नीलकडे समाधानाने पाहात बसली होती. आज तीला तिच्या दीचा आनंद जास्त महत्त्वाचा वाटत होता. […]

बलिदान देना होगा ! ‘सॅक्रेड गेम्स’

राजकीय रंग चढलेल्या धर्माच्या अनागोंदी कारभाराचा समाचार घेणारी सॅक्रेड गेम्स ही विक्रम चंद्राच्या 2006 मध्ये आलेल्या त्याच नावाच्या इंग्रजी कादंबरीवर आधारित असणारी वेबसिरीज ‘सॅक्रेड गेम्स’चा दुसरा सीझन 15 ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज झाला. अनुराग कश्यप व नीरज घायवान यांनी हा सीझन दिग्दर्शित केलेला असून कथा वरूण ग्रोवरने लिहिलेली आहे. […]

एक दिवस कांदेपोह्यांचा

स्थळ : ठाणे ते पुणे एक्सप्रेस हायवे , पुणे ते रत्नागिरी व्हाया कोकरूड , थोडक्यात मुंबई गोवा महामार्गावरील प्रचंड खड्डे आणि दरवर्षीची अपरिहार्य असणारी ट्रॅफिकमधील घुसमट टाळण्यासाठी ठाणे पुणे रत्नागिरी असा मार्ग धरलेला . एका अर्थानं ट्रॅफिक जॅमला कात्रजचा घाट दाखविण्याचा प्लॅन . मुंबईहून जाणाऱ्या चाकरमान्यांसारखी आपली अवस्था होऊ नये म्हणून माझ्यामते दूरदृष्टीने घेतलेली काळजी. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ५

नील एक एक चित्र निरखून पाहू लागला. प्रत्येक चित्र पाहताना वाह, सुंदर, अप्रतिम, अमेझिंग, सॉलिड, क्या बात हैं असे म्हणत तो पुढे पुढे जात होता. नील चित्रं पाहत असताना चारुदी तिथेच उभी राहून त्याचे निरीक्षण करत होती. तो मनापासून चित्रांचे कौतुक करतोय हे पाहून तिच्या चेहेऱ्यावर समाधानाचे हसू झळकू लागले. […]

अजब न्याय नियतीचा – भाग ४

बोलत बोलत तो चारूदीच्या अगदी समोर जाऊन उभा राहिला आणि दीच्या नजरेला नजर मिळवत तो म्हणाला, ” खरं तर सुंदर आणि सुगंधी गुलाबाची फुलं आवडत नाहीत अशी कुणी सुंदर मुलगी, निदान माझ्यातरी पाहण्यात नाही. So, मी मनकवडा वगैरे काही नाही….. असच…. सहजच आणली. पण तुम्हाला मनापासून आवडली ना ही फुलं? मग झालं तर….” […]

1 367 368 369 370 371 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..