नवीन लेखन...

पाटील-पटवारीची कमाल….. मोगलाई धमाल

सोशल मीडिया वर बऱ्यापैकी नावाजलेलं नाव असलेल्या श्रीकांत उमरीकर यांचे वडील Adv. अनंतराव उमरीकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक. या पुस्तकात एकच गोष्ट. या गोष्टीचे कथाकथन करण्या ऐवजी “एकपात्री” केलं तर? हा विचार. आणि या गोष्टीला समर्थ न्याय देणारा हरहुन्नरी कलावंत….

गोष्ट तशी निजामशाहीतली. मराठवाड्यातली.

(मराठवाड्याच्या बाहेर असलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींना सांगतो, आमचा मराठवाडा तुमच्या पेक्षा 13 महिने उशिरा स्वतंत्र झालाय. म्हणून आम्ही तांत्रिकदृष्ट्या 13 महिने मागासलेले आणि प्रत्यक्षात 13 वर्ष मागासलेले. आमचं मागासलेपण आम्ही “विकसनशील” या गोंडस नावाने झाकून ठेवतो.)

तर….जशी मराठी भाषा लवचिक आहे तसं उर्दू लिखाण लवचिक आहे. लेखणीच्या एका फटकाऱ्याने शब्दाचे अर्थ बदलतात. हे प्रात्यक्षित दाखवतांना आणि तो फटकारा नंतर तसाच ठेवल्याने सुरू झालेला गोंधळ. थेट निजामी राजवट उलथवण्याच्या चलवळीतला एक किस्सा होई पर्यंत मजल मारतो.

गावच्या पाटलाला चुकून आलेलं निजामाचे पत्र, पत्र आल्याने गावभर होणारी चर्चा, पाटलाचे पटवाऱ्याला घेऊन हैद्राबादला जाणं, तिथे त्यांची पोलिसांनी केलेली धरपकड आणि मग सुटकेचा थरार.

साधारण या प्रवासात 30 एक पात्र आपल्या सोबत असतात. हैद्राबाद ते हैद्राबाद मार्गे देवगाव बुंगारी हा प्रवास आपणही करत असतो. समोर असलेल्या एकाच पात्रात हे 30 पात्र आणि त्यांच्या सोबत केलेला प्रवास. आपल्याला कधी हसवतो, कधी रडवतो, कधी लहान मूल करतो, कधी अंतर्मुख करतो तर कधी धमणितलं रक्त तापवून चक्क सत्याग्रही करतो. प्रत्यक्ष आपण उपस्थित राहून पाहातो आहोत हा फील ठिकठिकाणी येतो.

सशक्त लिखाण, सशक्त पात्रं आणि सशक्त अभिनयाने केलेले सादरीकरण. आणि हे घेऊन येत आहेत हौशी नाट्य कालावंतात अभिनयातला “बाप माणूस” पण तरीही “आपला मानुस” किशोर पुराणिक…!!!!

— विनोद डावरे, परभणी.
15-09-2019

#सहजच सुचलं – 109

विनोद डावरे
About विनोद डावरे 14 Articles
मुक्काम परभणी. विविध विषयांवर लेखन. सहजच सुचलेले विषय आणि त्यांची मांडणी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..