होक्काइदो मधील पर्वतांची दुनिया ! जपानमधील सर्वात मोठे नॅशनल पार्क म्हणून प्रसिद्ध असणारे हे दाइसेत्सुझान. साधारण २ हजार मीटर (६६०० फूट) पेक्षा जास्त उंच भव्य बर्फाच्छादित पर्वत (Great Snowy Mountains) येथे पाहायला मिळतात. […]
ही कोणती स्पर्धा जेथे एखाद्याच्या पोटावर पाय ठेवून पुढे जाण्यास मज्जा येते. जो तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. फक्त ऐकवण्याच्या गोष्टीत स्वारस्व मानतो.’आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाहावं वाकून’ अशी भरकटलेली तसेच वाईट दृष्टीच्या विचारांचा अंगीकार करून त्रुट्या काढण्यात अनेक महाशय धन्यता मानतात. आपल्या खांद्याला खांद्या लावून चालणारा पुढे जाण्यास निघाला की, पाय खेचण्याची ओढच काही जणांना लागते. […]
मंजिरी आणि राघव नुकतच लग्न झालेल एक नवं कोर जोडपं. लग्नला नुकताच महिना होत आला होता. अश्याच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलाच्या बाहेर पडले. कार जरा लांब पार्क केली होती म्हणुन फुटपाथच्याकडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडी कडे जात होते…… […]
प्रश्न…. समस्या…… अर्जुन ……काल … आजही! अश्मयुगापासून आजपर्यंत आपल्या अचाट बुद्धीमत्तेच्या जोरावर माणसाने खुप प्रगती केली. भौतिक सोयी सुविधांची अनेक साधने निर्माण केली. अनेक अडचणींवर मात केली. पण काही प्रश्न आजही अनुत्तरीतच राहीले. […]
“नावात काय आहे?”… असं शेक्सपियरने म्हटले आहे! याचेच जणु उत्तर देऊ पाहणारे डोंगराळ भागातील हे गाव आहे बीएई. बीएई (Biei) नावाची फोड केली तर सौंदर्य+स्पार्कल असा अर्थ होतो. स्पार्कल म्हणजे काय असावं ? तर चकाकी, चमक, तेज, उमेद, इ.नावातच सौंदर्य असलेले हे बीएई. […]
माणसाच्या घरात किती फर्निचर आहे , किती भारी सजावट आहे हे नेहमी बघितले जाते. माझे घर ज्यामध्ये मी राहतो तेथील सर्वात आवडती जागा कोणती असा प्रश्न कोणी मला विचारला तर माझे उत्तर माझे पुस्तकाचे कपाट म्हणण्यापेक्षा माझे ‘ शब्दालय ‘ असे उत्तर मिळेल. […]
आज आपणा सर्वांस ज्यांनी इतरांसोबत मला ही मार्गदर्शन केलं, ज्यांनी मला लिहायला शिकवलं. साहित्य प्रकारची अतिशय चांगल्या पद्धतीने ओळख करून देऊन, मला समृद्ध केलं. लेखनशैली उत्तम होण्यासाठी वेळात वेळ काढून कायम तत्परता दर्शवली. असे जेष्ठ साहित्यिक श्री.अरुण वि.देशपांडे यांच्याबद्दल आणि त्यांच्या दीर्घ लेखन-प्रवासाबद्दलचा हा परिचय लेख. […]
ओतारू हे ऐनू वस्तीचे शहर, “ओतारू” हे नाव सुद्धा मूळचे ऐनू भाषेतुन घेण्यात आले आहे. ऐनु म्हणजे उत्तर जपानमधील एक जमात आहे. ह्या ऐनु जमातीचे लोकं साधारणपणे सध्या फक्त होक्काइदो मध्ये आढळून येतात. सांस्कृतिक पार्श्वभूमी सुद्धा बहुतेक करून उर्वरित जपानमधल्या लोकांपेक्षा वेगळी आहे. भाषा आणि संस्कृती मध्ये वेगळेपण आहे. ऐनु संस्कृती विषयक पुरावे आणि विस्तारित माहिती देणारी अनेक ठिकाणे होक्काइदो मध्ये आहेत. […]
राधिकाला या नवीन जागेत येऊन आता तीन महिने झाले होते. राधिकाचा नवरा राजीव बँकेत नोकरीला होता. बँकेचे कर्ज थकवणाऱ्या एका कर्जदाराचे हे घर बँकेने ताब्यात घेऊन लिलाव केला होता त्यातून ते राजीवला मिळाले होते. पनवेल शहरात अगदी मोक्याच्या जागी ते दुमजली घर होते. […]