नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

शेरदिल ‘शेरू’

शेरूने स्वतःच्या नाट्य प्रेमाबद्दल खूप काही सांगितले. त्याला अभिनयाची उपजतच आवड होती, मात्र परिस्थितीमुळे त्याला ती जोपासता आली नाही. त्याने शिक्षण झाल्यावर गरज म्हणून काही वर्ष रिक्षाचा व्यवसाय केला. रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्याला आलेले अनुभव त्याने सांगितले. […]

बोलिला वेद, मर्म ताडिले (सुमंत उवाच – ११४)

पुराणात जे सांगितले, ते पूर्वीची लोकं जगली, त्या प्रमाणे त्यांनी आयुष्य घडवले, वैद्यकीय माहिती, व्यवसाय शिक्षण, शिवाय वेगवेगळ्या विषयांतील ज्ञान पुराणात शिकायला मिळते आणि त्याचा उपयोग आपल्या आधीच्या लोकांनी योग्य प्रकारे घेतला. […]

ललितकलादर्श नाट्य संस्थेचा वर्धापनदिन

वयाच्या अठराव्या वर्षी, संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी ललितकलादर्श नाटकमंडळीची स्थापना केली. संगीत सौभद्र हे या कंपनीचं पहिलं नाटक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. […]

45 दिवस ते 45 मिनिटे

स्वप्नील आणि स्नेहाचं ब्रेकअप होऊन चक्क 45 दिवस झाले होते. तो 46 वा दिवस होता.  दिवस मोजण्याच कारण एवढंच की स्वप्नील ने ते 45 दिवस अगदी 45 वर्ष झाल्यासारखे घालवले होते. […]

कुस्करलेली कळी – उमललेले फुल – १२

एके दिवशी सकाळी सकाळी बांद्रा पोलीस स्टेशनचे एसीपी अभिजित सावंत यांचा संगीताला फोन आला. केसमधील काही महत्वाचे धागेदोरे हाती लागलेले असून, त्या बाबत पुढे काय पावले टाकायची हे ठरविण्यासाठी तिला ताबडतोब पोलीस स्टेशनवर बोलावले होते. […]

‘नटसम्राट’ – डॉ. लागू

कुसुमाग्रजांचे शब्द लागूंच्या वाणीतून कृतार्थ झाले. त्यांच्यानंतर दत्ता भट /यशवंत दत्त यांनी साकार केलेले नटसम्राटही मला भावून गेले. पण लागूंचे interpretation आणि सादरीकरण केवळ ! त्यांच्या “लमाण” ने थरारून सोडले. Athlete/Philosopher ही स्वतःबद्दलची ओळख किती वेगळी ! “मी तो हमाल भारवाही” ही विनम्र भूमिका मांडणारा आणि अखेरपर्यंत जगणारा हा कलावंत ! […]

चातुर्मासाची समाप्ती

माझ्या लहानपणी चाळीतील बायका पहाटे पाच वाजता उठून सगळी पारोसी कामे आटोपून अंघोळ करून पुजेचे साहित्य घेऊन आवळी पुजनाला जायच्या आम्ही लहान मुली त्यांच्या सोबत जायचो. एकमेकांच्या सहकाऱ्याने परिसर स्वच्छ झाला व पुजेच्या पाण्याने झाड टवटवीत झाले होते. […]

अपूर्वाईचा पूर्वरंग – 1 (माझी लंडनवारी – 4)

फायनली, मुकुंदला ही अच्छा करून माझी एक बॅग आणि खांद्यावर एक सॅक घेऊन मी प्लेन मध्ये पाय ठेवला.  आयुष्यात पहिल्यांदा विमानात शिरत होते!! ज्या क्षणाची उत्सुकतेने वाट बघत होते, तो आता आला. […]

पद्मश्री लीला पूनावाला !

त्यांची आणि माझी प्रथम भेट नक्की कुठे झाली आठवत नाही. बहुधा पुण्यातील एखाद्या HR कार्यक्रमात झाली असावी. visiting cards ची देवाण -घेवाण झाली. माझ्या सवयीनुसार त्यांच्या कार्डमागे तारीख /वेळ /प्रसंग वगैरे मी लिहिले. स्मृती लख्ख राहाव्यात आणि भविष्यकालीन संदर्भासाठी नोंद असावी म्हणून माझा मित्र रविशंकरने मला ही सवय लावली आहे. […]

प्रतिभाची ‘प्रतिमा’

१९८२ ची गोष्ट आहे. माझा काॅलेजमधील मित्र प्रमोद संचेती याने जळगावला गेल्यानंतर मला दिलेले वचन पाळले. तो काॅलेज संपताना म्हणाला होता, मी जेव्हा व्यवसाय सुरु करेन त्याचं जाहिरातीचं काम मी तुलाच देईन. […]

1 199 200 201 202 203 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..