नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

23 एप्रिल जागतिक पुस्तक दिन, कॉपीराइट दिन आणि नाटककार शेक्सपिअर यांचा जन्म आणि स्मृतीदिन

वाचन संस्कृतीच्या चर्चेशिवाय पुस्तकदिन पोरकाच. वाचन संस्कृतीवर आलेली अवकळा व इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुळसुळाट यांचा अकारण सकारण संबंध जोडला जातो आणि संबंधाचा सबळ पुरावा देण्यासाठी अलीकडच्या मुलांच्या वाचन सवयीवर अमर्याद चर्चा होऊन पूर्णविराम दिला जातो. अलिकडची मुलं वाचत नाहीत. मुलांना पुस्तक उपलब्ध नाही. ही विधाने जितकी खरी वाटतात तितकेच प्रश्नही निर्माण करतात व तिथेच थांबतात. मात्र आजच्या दिनाच्या औचित्याने आडातले पोहणाऱ्यांना नक्कीच आणता येईल. […]

काळाची लेखणी

“बॅरिस्टर ” केलं विक्रम गोखलेने! त्यानंतर सचिन खेडेकरने प्रयत्न केला. पण विक्रम तो विक्रमच! लागूंच्या नंतर खूपजणांनी ” नटसम्राट “चे शिवधनुष्य शब्दशः उचललं , पण नांव कोरलं गेलं ते फक्त श्रीराम लागू! […]

हरवलेल्यांची पंढरी (कथा)

सिनेमात काम करायचं -मुंबई. नोकरी मिळत नाही- मुंबई. घरी त्रास आहे- मुंबई परिक्षेत नापास झाला-मुंबई :  मुंबई : अशा अनेकविध कारणांमुळे घरी न सांगता मुंबईकडे धाव घेणारे अनेक आहेत. स्वत:हून दडून बसलेल्या अशा माणसांना शोधून काढणं पोलीसच काय कुणालाच शक्य नाही. […]

मेरा वो सामान “लौटा “दो !

माणसांची वैश्विक गंमत असते- सुरुवात “मी ” पासून होते. मग वाटेत नातं /नाती येऊन जोडली जातात की शब्द तयार होतो “आपण “. काळाच्या ओघात फक्त काही जिवलग नातीच पैलतीराला जाऊन थांबतात. […]

एक छान मैत्रीण हवी

प्रत्येकाला जीवनात, ‘मैत्रीण’ लाभतेच असं नाही.. पूर्वी एकाच वाड्यात, चाळीत अनेक कुटुंबं रहायची.. त्यामुळे समवयस्क मित्र-मैत्रिणी भरपूर असत, त्यांच्या मैत्रीसंबंधावर पालकांचाही विश्र्वास असायचा.. त्यातूनही शाळा, जर मुला-मुलींची एकत्र असेल तर वर्गातील मैत्रीण घरी आल्यावर तिलाही पालक कुटुंबात सामावून घेत असत. काॅलेजमधील मैत्रिणी हा वर्गात व घरात, चर्चेचा विषय असे. ती जर सहज घरी आली तर तिला […]

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग १

माझा डोळ्यांवर विश्वास बसेना! हे म्हणजे आंधळा मागतो एक डोळा… असं झालं. पिठापूर बरोबर कुरवपूर पण आणि ते सुध्धा 5 मार्चला!! मी लगेच होकार कळवून टाकला. […]

बिबट्या खेळवणाऱ्याची गोष्ट (संक्षिप्त रूपांतरीत कथा १३)

जॕक लंडन हा प्रसिध्द अमेरिकन कादंबरीकार, कथाकार व सामाजिक विषयांवर लिहिणारा लेखक म्हणून ओळखला जातो. व्यावसायिक नियतकालिकांमधून कथा/कादंबऱ्या मालिका स्वरूपांत लिहिणं व लोकप्रिय करणं ह्याचं श्रेय त्याला जातं. त्याने सेलर (खलाशी) म्हणून कांही वर्षे काम केलं. त्याकाळचा अमेरिकेतला “व्हायोलन्स” अनुभवला. तो आणि जगण्याचा झगडा त्याच्या लिखाणामधे दिसून येतो. त्याने पंधरा सोळा कादंबऱ्या, सुमारे तीनशे कथा व अनेक लेख लिहिले. व्यावसायिक दृष्ट्या लिखाणावर पैसे कमवून श्रीमंत होणारा तो पहिलाच लेखक. दुर्दैवाने तो केवळ चाळीसाव्या वर्षीच मरण पावला. प्रस्तुत गोष्ट त्याच्या इतर लिखाणाहून थोडी वेगळ्या धर्तीची आहे. परंतु तितकीच प्रसिध्द आहे. आपणांस आवडेल अशी अपेक्षा आहे. अभिप्राय जरूर कळवावा. […]

गांवाची ओढ (कथा)

माणूस भाऊच्या धक्क्यावर उतरो, व्हीटी स्टेशनला उतरो, बॉम्बे सेंट्रलला उतरो, नाही तर सांताक्रुझ विमानतळावर उतरो. त्याच्या पाठीवर त्याच बि-हाड असतं, डोळयात स्वप्नं असतात आणि मनात एक खूणगाठ बांधलेली असते. नाव आणि पैसा मिळवून गावी परत जायचं. […]

तुम न जाने किस जहां मे खो गयें..

जीवनाच्या अनेक संचिता पैकी लताचं असणं हे एक संचित आहे. आपल्या अवती भोवती अनेक समृद्ध व्यक्तिमत्वें असतात, स्वर असतात, त्यांच्यामुळे आपलं जीवन समृद्ध होत असतं. मोठ्या माणसांच असणं डोक्यावर छत्र असतं. लतांची गाणी अनेकांच्या दृष्टीने मुदत ठेव आहे, जिच्यामुळे त्यांचं आयुष्य सुखद आहे. सौंदर्य आणि स्वर आपल्या आवाक्यात जरी नसले तरी पाहण्यात व ऐकण्यात ते आपलेच […]

बेटा-बेटांचं मुंबई बेट (कथा)

पूर्वी कधीतरी मुंबई सात बेटांची असेल. आज ती बेटं एकमेकांना सांधण्यात आली आहेत. मात्र आज मुंबई नावाच्या शहरात अनेक छोटी-मोठी बेटं तयार झाली आहेत. इथं राहणारा प्रत्येक माणूस एक स्वतंत्र बेटच आहे. […]

1 155 156 157 158 159 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..