नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

आनंददायी प्रवासाला प्रारंभ

गाण्याची संधी मिळावी म्हणून माझे अनेक प्रयत्न सुरू होते. त्यातलाच एक भाग म्हणून ऑल इंडिया रेडिओच्या मराठी सुगम संगीत आणि हिंदी गीत-भजन अशा दोन ऑडिशन टेस्टस् मी दिल्या होत्या. या दोन्ही परीक्षांमध्ये मी पास झालो आणि मला बी ग्रेड मिळाली. रेडिओच्या ऑफिसला गेल्यावर मला कळले की सुरूवातीला कोणत्याही कलाकाराला ‘बी’ ग्रेडच मिळते. नंतर त्याने अपग्रेडेशनसाठी पुन्हा […]

काळ्या पैशांतून, गोरा स्वर्ग

अठ्ठावन्न वर्षांपूर्वी राज कपूरने ‘संगम’ चित्रपटाची निर्मिती केली.. प्रेमाच्या त्रिकोनाची कहाणी, आपल्या खास शैलीत सादर केली. चित्रपटात स्वित्झर्लंड येथे राज कपूर व वैजयंती माला यांच्यावर एका इंग्लिश गाण्याचे चित्रीकरण केलेलं आहे. हा चित्रपट सुरुवातीला तीन तासांचा होता. त्याला दोन मध्यंतरं होती. यातील सर्वच गाणी अप्रतिम, त्यामुळे हा चित्रपट एकदा पाहून कुणाचंही समाधान होत नाही.. प्रेक्षकांनी अक्षरशः या चित्रपटाची पारायणं केली.. चित्रपट यशस्वी झाला व राज कपूरने, त्या पैशातून पुण्यामध्ये लोणीजवळ, राजबाग खरेदी केली. […]

निपटारा – भाग  2

काही खास चर्चा असली म्हणजे आम्ही ‘परिंदा’ मध्ये भेटायचो. सिद्धार्थ गार्डनच्या जवळ, नाल्यावरच्या सिद्धी विनायक मंदिरासमोर, परिंदा म्हणजे एक धाबा वजा छोटंसं हॉटेल होतं. भरपूर मोकळी जागा, उघड्यावर टेबल खुर्त्या प्लॅस्टीकच्या, चार चार टेबलांच्या ग्रुपला एक मेंदीचं बुटकं कुंपण, आजूबाजूला भरगच्च झाडी. फारशी गर्दी नाही, भरवस्तीत असूनही शांत आणि आमच्या सारख्या मुलींना सुरक्षित. तिथं फारशी वर्दळही […]

कल चमन था

दादा कोंडके यांच्या ‘आगे की सोच’ चित्रपटातही, ती होती. पंधरा वर्षांच्या कालावधीत तिच्या जीवनात फार चढ-उतार आले. तिची आई सोबत होती, तोपर्यंत ती निर्धास्त होती. आई गेल्यानंतर, एकाकी पडली. ती फाॅर्मात असताना तिच्या जीवनात राजू उर्फ अली, हा बदमाश माणूस आला. तो अमेरिकेत हाॅटेल इंडस्ट्रीज मध्ये होता. हुमा त्याच्या जाळ्यात, अलगद अडकली. तो व्यवसायासाठी तिच्याकडे पैसे मागत राहिला. हुमा भविष्याचा काहीही विचार न करता, त्याला पैसे पुरवत राहिली. शेवटी चार वेळा, मोठ्या रकमा दिल्यानंतर, हुमाकडे काहीच शिल्लक राहिली नाही. […]

गणपती

आम्ही दरवर्षी गणपतीचा उत्सव कोकणातल्या आमच्या न्हैचिआड गावी साजरा करतो. गणपतीच्या साधारणतः दोनतीन महिने आधी आमच्या घरी गणपतीची गडबड सुरु होते. ह्यावर्षी गणपती अमुक अमुक तारखेला आहेत, तेव्हा गावी जाण्यासाठी कोण कधी निघणार, कुठल्या गाडीने निघणार वगैरे चर्चा आमच्या घरी सुरु होते. घरी म्हणजे आमच्या चुलत नातेवाईकांमध्ये- रेग्यांमध्ये आम्ही सर्व चुलत बंधू एकत्ररित्या घरचा गणपती गावी […]

रम्य ते बालपण : चित्तरंजन भट

नागपुरात आमच्या घरीही बाबांना भेटायला खूप लोक येत असत. बहुतेक माणसे साधीसुधीच असायची. बरेचदा नावाजलेली माणसेही यायची. बाबांच्या खोलीत मग गप्पांची, हास्यविनोदाची सत्रं चालायची. चहाच्या खेपा व्हायच्या आणि आई थकून जायची. विशेषतः हिवाळी अधिवेशनाच्या काळात अनेक मंत्रीमंत्री आणि आमदारही बाबांना खास भेटायला येत असत. उल्हास पवार, सुशीलकुमार शिंदे तर नेहमीचेच. […]

लोअर वरळी

गिरणगांव बचाव म्हणून बुध्दिवंतांची एक बैठक झाली, त्याला कवी-लेखक-शाहीर सगळे हजर होते. एक गाव लाटेखाली बुडायच्या मार्गावर आहे, त्याला वाचवायच म्हणजे काय करायच, हाच खरा प्रश्न आहे. तस हे गाव संपाच्या ओझ्याखाली केव्हाच मोडून गेलय. […]

एक मोठे पारितोषिक

त्या वेळी फक्त दूरदर्शन होते. तेही जेमतेम चार तास. त्यामुळे आज दिसणारी इतर मराठी आणि हिंदी चॅनेल्स आणि त्यावर होणाऱ्या झी सारेगमप आणि इंडियन आयडॉलसारख्या संगीत स्पर्धा त्यावेळी अस्तित्वातच नव्हत्या. आज या गोष्टीचे आश्चर्य वाटेल कदाचित. पण १९८० साली ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे संगीतामध्ये पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्यासारख्या मुलामुलींना आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धा हाच पर्याय उपलब्ध होता. […]

निपटारा – भाग  1

सकाळच्या ‘दै. मराठवाडा’ तील हेडलाईन वाचली आणि मी सुन्नच झाले. ‘अरुंधती पांडे या कॉलेज युवतीची आत्महत्या!” क्षणभर डोकं बधीर झालं. डोळ्यांवर विश्वासच बसेना. पुन्हा पुन्हा वाचलं अन् धावतच गेले घरात. “मामी, मामी! वाचलीस का ही बातमी? अग आपली अरू गेली.’ “काय?’ मामी किंचाळलीच. “बघू बघू’ म्हणून पेपर हातात घेतला आणि डोळे विस्फारून ती हेडलाईनकडे पाहतच बसली. […]

ए आयेऽ

कणखर आवाज, बोलके डोळे, ग्रामीण भाषा, साधी वेशभूषा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आई मुलांचे नातेसंबंध साकारताना, त्यांनी दादांना कधी गावरान शिव्या देखील दिल्या तर कधी त्या हळव्या झाल्या. पूर्वीच्या चित्रपटातील, आईची प्रतिमा बदलून टाकणाऱ्या रत्नमाला, खाजगी जीवनातही स्वतःच्या मुलाविषयी संवेदनशील होत्या. […]

1 128 129 130 131 132 490
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..