नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

एक मोठे पारितोषिक

त्या वेळी फक्त दूरदर्शन होते. तेही जेमतेम चार तास. त्यामुळे आज दिसणारी इतर मराठी आणि हिंदी चॅनेल्स आणि त्यावर होणाऱ्या झी सारेगमप आणि इंडियन आयडॉलसारख्या संगीत स्पर्धा त्यावेळी अस्तित्वातच नव्हत्या. आज या गोष्टीचे आश्चर्य वाटेल कदाचित. पण १९८० साली ही वस्तुस्थिती होती. त्यामुळे संगीतामध्ये पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या माझ्यासारख्या मुलामुलींना आंतरमहाविद्यालयीन गायन स्पर्धा हाच पर्याय उपलब्ध होता. […]

निपटारा – भाग  1

सकाळच्या ‘दै. मराठवाडा’ तील हेडलाईन वाचली आणि मी सुन्नच झाले. ‘अरुंधती पांडे या कॉलेज युवतीची आत्महत्या!” क्षणभर डोकं बधीर झालं. डोळ्यांवर विश्वासच बसेना. पुन्हा पुन्हा वाचलं अन् धावतच गेले घरात. “मामी, मामी! वाचलीस का ही बातमी? अग आपली अरू गेली.’ “काय?’ मामी किंचाळलीच. “बघू बघू’ म्हणून पेपर हातात घेतला आणि डोळे विस्फारून ती हेडलाईनकडे पाहतच बसली. […]

ए आयेऽ

कणखर आवाज, बोलके डोळे, ग्रामीण भाषा, साधी वेशभूषा ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आई मुलांचे नातेसंबंध साकारताना, त्यांनी दादांना कधी गावरान शिव्या देखील दिल्या तर कधी त्या हळव्या झाल्या. पूर्वीच्या चित्रपटातील, आईची प्रतिमा बदलून टाकणाऱ्या रत्नमाला, खाजगी जीवनातही स्वतःच्या मुलाविषयी संवेदनशील होत्या. […]

शेवटचं पान (संक्षिप्त रूपांतरीत कथा २९)

शिमला आणि मनाली ह्यामधे कुलू येतं. पर्वतराजी आणि आजूबाजूच्या प्रदेशाची चित्रें रेखाटू इच्छिणारे अनेक चित्रकार तिथे कांही काळ स्थायिक होतात. हॉटेलात दीर्घ काळ रहाणं त्यांच्या किंमतीमुळे केवळ अशक्य असतं. तशातच ह्यांतल्या अनेक चित्रकारांच अजून नाव झालेलं नसतं. त्यांच्या चित्रांना हवा तसा मोबदलाही मिळत नाही. तेव्हां तिथे भाड्याने घर घेऊन रहाणं हा एकच मार्ग चित्रकारांसमोर असतो. एका […]

नाट्याभिमानी शशी जोशी

व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र…’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली […]

एकावर एक !

बघता बघता आपण नकळत स्वतःला “शिक्क्यांची ” सवय लावून घेतो. उदा- टाटा इंडिका म्हणजे टॅक्सी, मारुती व्हॅन म्हणजे स्कूल व्हॅन, (आमच्या लहानपणी) भाजलेले शेंगदाणे म्हणजे चित्रपटाचा इंटरव्हल, तसेच पुण्यातील भनाम (भरत नाट्य मंदिर) वरचा शिक्का म्हणजे राज्य नाट्य स्पर्धा अथवा एकांकिका. […]

बारावी…इंजिनिअरिंग आणि गाणे

त्याचबरोबर माझा बारावीचा अभ्यास सुरू झाला. हे वर्ष माझ्यासाठी फार महत्त्वाचे होते. कारण या बारावीच्या मार्कांवरच इंजिनिअरींगची अॅडमिशन अवलंबून होती. शाळेत अगदी पाचवीपासून विनय देवस्थळी, सुबोध दाबके, पंकज देवल, सुभाष देसाई, नितीन थत्ते असे माझे जवळचे मित्र बनलेले होते. बारावीतही आम्ही सगळे बरोबर होतो. अभ्यास एकत्र करत होतो. कॉलेजमधील मजाही एकत्रच अनुभवत होतो. बारावीत विनायक महाजनही […]

बाणे ऑलिम्पिक

सुप्रसिद्ध दैनिक ‘रोजची पहाट’ चे संपादक सूर्याजीराव रविसांडे हे फार अस्वस्थ होते. ते विशेषांक सम्राट म्हणून ओळखले जातात. प्रत्येक आठवड्याला ‘रोजची पहाट’चा विशेषांक काढायचा हे त्यांचे वैशिष्ट्य आणि ज्यांच्या जीवावर हा त्यांचा विशेषांक सम्राटाचा डोलारा उभा होता त्या काका सरधोपटांचा गेले दोन दिवस झाले पत्ताच नव्हता. सूर्याजीरावांच्या अस्वस्थतेचे हेच कारण होते. काका सरधोपट हा एक अवलिया […]

हिमशिखरांच्या सहवासात – प्रस्तावना

भारताच्या वायव्येकडे पसरलेल्या हिंदुकुश आणि काराकोरम या पर्वतरांगांपासून पार अरुणाचल प्रदेशाच्या पूर्व टोकापर्यंत पसरलेल्या हिमालय या पर्वताचे जगभरच्या लोकांना अपार कौतुक आणि आकर्षण आहे. या आकर्षणापोटी गेली हजारी वर्षे जगभरचे अनेक प्रवासी या पर्वतांत प्रवासासाठी येतात. हिमालयात भटकंती करायला येणाऱ्या लोकांचे प्रामुख्याने चार पाच वर्ग पडतात. काही लोकांना हिमालयाचा अभ्यास करायचा असतो, हिमालयाची भौगोलिक जन्मकथा अतिशय रंजक आहे. […]

परळ

परळला वाडिया हॉस्पिटलच्या समोर एका चाळीत आम्ही राहात असू. वाडिया हॉस्पिटलहून थोडं पुढे गेलं की के.इ.एम. हॉस्पिटल येतं. सुप्रसिद्ध हाफकिन इन्स्टिटयूट के.इ.एम.च्या शेजारीच आहे. याशिवाय टाटा कॅन्सर आणि बच्चूभाई डोळ्यांचे हॉस्पिटल ही देखील जवळपासच आहेत. यात भर म्हणजे जनावरांचं बैलघोडा हॉस्पिटलही परळचंच. सर्व हॉस्पिटल जवळजवळ एकाच परिसरात येत असल्याने आमच्या घरासमोरचा रस्ता नेहमी गजबजलेला असे. पेशंटस, […]

1 127 128 129 130 131 488
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..