नवीन लेखन...

गुंता

केसात गुंता झाला की कंगव्याच्या मोठ्या दातांनी तो सोडवण्याचा पहिला प्रयत्न केला जातो. पण तो गुंता इतका पक्का असतो की सुटत तर नाहीच उलट खूप वेदना होतात सहन होत नाही म्हणून तो तोडूनच काढावा लागतो. आर्थात इच्छा होत नाही पण नाईलाजाने का होईना मान्य करावे लागते. आयुष्यात कधी ना कधी असे काही प्रश्न निर्माण झाले की […]

सुटका

बस स्टॉप वरील ओळखीतून एकमेकांचा आगापीछा माहीत नसलेले ते दोन अविचारी तरुण जीव, एक महिन्याच्या ओळखीत “एक दुजेके लिये” झाले होते. त्यांना विभक्त केल्याचे पाप मी माथी घेतलं होतं. […]

“Nature Stay”, सफाळे (१००%निसर्ग सान्निध्यात)

शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. […]

एक क्षण फक्त…. ..

गुरुकुल मध्ये गुरुगृही गेल्या वर शिक्षकांच्या हातात मुले सोपवून पालक निर्धास्त असत. तर गुरु म्हणजे आईवडील मग आत्ताच असे का व्हावे. असो कालाय तस्मै नमः तरीही आतून मनापासून वाटते की पालक. मुले व शाळा यांच्यातील संबंध जिव्हाळ्याचे. […]

माझे शिक्षक – भाग २ (आठवणींची मिसळ १६ )

सातवी पर्यंतच्या शिक्षणांत बरेच सहाध्यायी होते. अंधेरीमधे ही एकमेव शाळा होती. ज्या मुलांच्या आईवडीलांना ही शाळा पसंत नसे, त्यांच्या मुलांना ते पार्ल्याच्या पार्ले टिळक विद्यालयांत घालत. अशी मुलं हाताच्या बोटावर मोजण्यासारखी होती.त्यामुळे मध्यम, उच्चमध्यम घरांतली सर्व मुलं इथेच प्रवेश घेत. मला आठवतयं की रत्नमाला या नटीचा मुलगा याच शाळेत होता.नीटनीटका वेष, तेल लावून व्यवस्थित भांग पाडलेले, चापून बसवलेले केस, ह्यामुळे तो उठून दिसायचा.पण स्वभावाने बुजरा असल्यामुळे मुलांच्या चेष्टेचा विषय व्हायचा. […]

प्रयोगशील निर्माता – शांताराम शिंदे

पहिल्या नाटकात अपयश येऊनही ते सतत नाट्यनिर्मिती करत राहिले. नवीन कलाकारांना संधी, जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन, मल्टिस्टार नाटक या आताच्या संकल्पना त्यांनी पाच वर्षांपूर्वीच वापरल्या होत्या. ‘निर्मल’ संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले. पण शिंदेसाहेब कधीही पुरस्कार सोहळ्याला, पार्ट्यांना हजर राहिले नाहीत. त्यांनी स्वतला कधीही मिरवून घेतलं नाही. असा हा आगळावेगळा निर्माता 16 जुलै 2012 रोजी आपल्यातून निघून गेला. […]

भारतमातेच्या वीरांगना – ५९ – भगिनी निवेदिता

त्यांनी आपल्या शाळेतून ‘वंदे मातरम्’ चे गायन सुरू केले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना जागृत झाली. लॉर्ड कर्झन ह्यांच्या विचारांची पोल सगळ्यांसमोर उघडी केली, ते नेहमी पाश्चिमात्य संस्कृतीचे उदात्तीकरण करत आणि पूर्वेकडील संस्कृती ला कमीपणा देत. भगिनी निवेदित्यांच्या प्रयत्नांनी लॉर्ड कर्झन ला सार्वजनिकरित्या माफी मागायला लावली. भारतीय लोकांमध्ये स्वदेशीचा प्रचार, प्रसार केला. […]

भारताचे ‘साहित्यिक’ पंतप्रधान

राजकारण आणि साहित्य ही खरंतर दोन विरुद्ध टोकं असं आपल्याला वाटतं. साहित्य संमेलनात राजकारण्यांचा वावर हा दरवर्षी चघळला जाणारा विषय. पण आचार्य अत्रे, ग दि माडगूळकर यासारख्या काही प्रतिथयश साहित्यिकांनी राजकारणातही त्यांची चमक दाखवली आणि यशवंतराव चव्हाणांसारख्या काही राजकारण्यांनी साहित्य क्षेत्रातही ! सावरकर तर दोन्ही क्षेत्रातले स्टार व्यक्तिमत्त्व. साहित्याची विशेष जाण आणि साहित्यात यशस्वी वाटचाल करणारे […]

माझे शिक्षक – भाग १ (आठवणींची मिसळ १५ )

शिक्षक म्हणजे गुरू.दत्तात्रेयांनी २४ गुरू केले असे म्हणतात.अनेक सुप्रसिध्द गायकांनी दोन-तीन गुरू केल्याचे सांगितले आहे.जो जो आपल्याला कांही शिकवतो, तो आपला गुरू, अशी व्याख्या केली तर आई-वडिलांपासून सुरूवात करून ह्या वयातही आपल्यात सुधारणा व्हावी म्हणून सतत प्रयत्नशील असणाऱ्या आपल्या पत्नीपर्यंत असंख्य गुरू आपल्याला आठवतील.अगदी लोकलच्या प्रवासांत चपळाईने चौथी सीट कशी मिळवावी हे शिकवणाऱ्या गुरूचीही आठवण होईल.पण शाळा कॉलेजमधे जे आपल्याला शिकवतात, तेंच आपले अधिकृत गुरू, म्हणजेच शिक्षक.अगदी बिग्रीपासून ते युनिव्हर्सिटीपर्यंत खूप शिक्षक आपल्याला भेटतात.कांही कायम लक्षात रहातात.कांहीना विसरावसं वाटत पण विसरतां येत नाही.आपल्याला घडवण्यात आपल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा असतो. […]

उगाच काहीतरी – ८ (एंट्रन्स एक्साम्स , क्लासेस आणि पालक)

सूचना – इथे कोणावरही टीका करण्याचा किंवा सल्ला देण्याचा काहीही हेतू नाहीये. त्यावरून प्लिज कोणताही निर्णय घेऊ नये. मीना ची दहावी अर्ध्यात पोहोचली म्हणजे सप्टेंबर/ऑक्टोबर उजाडला आणि तिच्या पालकांच्या मोबाईलवर अचानक क्लासेसचे फोन यायला लागले. आमच्या क्लास ची स्कॉलरशिपची परीक्षा तुमच्या मुलीला द्यायला लावा म्हणजे तिचा आता पर्यंतचा अभ्यास कसा चाललंय तेही कळेल आणि त्या मार्क्सवर […]

1 68 69 70 71 72 284
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..