नवीन लेखन...

एक आठवण – शांतिनिकेतनची

मी 1977 ला  इस्टर्न कोलफिल्डस् लि. या कंपनीत  नोकरी करण्यासाठी  राणीगंज जवळच्या  परसिआ  या  खाणीत 18.1.1977 ला  जॉईन झालो.तो  दिवस मला  महत्वाचा  वाटला  होता ,माझ्याकरता.कारण एक चांगली वरचे पैसे  कमवू देऊ शकणारी  पीडब्ल्यूडी ची तीन वर्षांची महाराष्ट्रातील नोकरी  सोडून मी  इतक्या  दूर बंगालमध्यें आलो होतो. […]

पासपोर्ट : एक सुखद अनुभव

माझा पासपोर्ट अप्लाय केल्यापासून तिसर्‍या दिवशी तो घरात आला आणि माझ्या डोक्यातल्या सरकारी यंत्रणेला छेद बसला. थोडक्यात म्हणजे गोगलगायच्या गतीने काम करणार्‍या गवरमेंटवरचा विश्वास उडाला. लोकांच्या कामाच्या बाबतीत अतिदक्ष असणारे आपले सरकार एवढे कार्यक्षम झाले असेल ही स्वप्नातदेखील कल्पना नव्हती. मी साध्या पासपोर्टबद्दल बोलतोय. तात्काल नव्हे. जिथे तात्काल पासपोर्ट यायला आठ दिवस लागतात तिथे साधारण पासपोर्ट […]

बायको नावाचे अजब रसायन

“घरची थोडी तरी कामे करत जा. हॉटेलवर आल्यासारखे घरी येता आणि सकाळी उठल्या उठल्या आॅफिसला जाता!” मला खात्री आहे, बर्‍याच नवरेमंडळीना हे वाक्य थोडयाफार दिवसांनी ऐकायला लागतेच. […]

एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग ४

“पुढे काय झालं?” सुरेशने अधीरतेने विचारलं. “हो रे, सांगते नां !” लककीने सुरुवात केली. “याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे […]

…आणि चष्मा लागला

स्थळ ठाणे रेल्वे स्टेशनचा तीन नंबरचा फलाट. तीन नंबरवर येणारी गाडी मी दोन नंबर फलाटावरच येते आहे असे समजून गाडी येणार्‍या फलाटाच्या कडेला जाउुन वाकून बघत होतो. एवढयात दिन्याने नुकत्याच खाल्लेल्या सुप्रसिद्ध कचेरी मिसळीचे उपकार विसरून मी आंधळा असल्याचे फलाटाच्या त्या गर्दीतच जाहीर केले. […]

एक पाऊल ओल्या वाळूंत- भाग ३

सुरेशने आईचं मन वळवलं होतं. लक्कीला भेटायला तो उत्सुक झाला होता. आईने संमती दिल्यावर त्याने लक्कीला फोन केला, वेळ ठरवली आणि आईला घेऊन तो निघाला. जुहूला त्याला पत्ता फार वेळ शोधावा तागला लाहीं. ‘रंगनाथ पै’ अशी दारावरची पाटी पाहून त्यांने घंटीचं बटन दाबलं. एक वयस्कर गृहस्थ दारापाशी आले. ” Yes? Whom do you want?” त्यानी विचारलं. […]

बायको आणि तिचा मोबाईल

परवा पेपरात बायकोने नवर्‍याला मारायची सुपारी दिल्याची बातमी वाचल्यावर माझे होश उडाले. कारण होते नवरा सतत वॉट्सअॅप आणि फेसबुकवर असायचा. मलाही वॉट्सअॅप आणि फेसबुकचा वापर जरा कमी करायला हवे याची प्रकर्षाने जाणीव झाली. […]

गावगुंड

आमच्या गावी एक सार्वजनिक कुत्रा होता. आम्ही सगळेजण त्याला गावगुंड म्हणत असू. तपकिरी रंग आणि काळसर तोंड असलेला हा गावगुंड गावातल्या सगळया मोकाट कुत्र्यांचा बादशहा होता. वैयक्तिक पाळलेली कुत्रीही याच्यासमोर अंगापिंडाने किडमिडीत वाटायची. शहाणी कुत्री तर याच्या सावलीलाही यायची नाहीत. […]

मुंबैतील देवांच्या जन्माची चित्तरकथा

माणसाला देवाने जन्म दिलाय की नाही माहित नाही, पण देवाला मात्र माणसानेच जन्म दिलाय, हे पुरातन सत्य या वाचन-लेखनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने अनुभवायला मिळालं. यात कोणताही धर्म अपवाद नाही. देवांच्या या जन्माची आणि त्यांच्या बारशाची आणि त्यांच्या उत्सवी वाढदिवसांच्या चित्तरकथा मी सध्या लिहितोय. […]

1 250 251 252 253 254 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..