एक पाऊल ओल्या वाळूंत- भाग ३

सुरेशने आईचं मन वळवलं होतं. लक्कीला भेटायला तो उत्सुक झाला होता. आईने संमती दिल्यावर त्याने लक्कीला फोन केला, वेळ ठरवली आणि आईला घेऊन तो निघाला. जुहूला त्याला पत्ता फार वेळ शोधावा तागला लाहीं. ‘रंगनाथ पै’ अशी दारावरची पाटी पाहून त्यांने घंटीचं बटन दाबलं. एक वयस्कर गृहस्थ दारापाशी आले. ” Yes? Whom do you want?” त्यानी विचारलं. “Is Ms. Lilly Sequeira staying here?” सुरेशने विचारलं. त्यावर त्या गहस्थाने आंत हांक मारली.”ऐ लक्की, हंग यो गो, कॉण आयलो पळे”

आपण योग्य ठिकाणी आलो अशी सुरेशला खात्री पटला. ते गृहस्थ रंगनाथ पै हेही त्यांने ओळखलं. सुरेशने वांकून नमस्कार केला. सावित्री बाईनी हात जोडून नमस्कार केला. लक्की तेव्हढ्यात तिथे आली. सुरेशला पाहून तिला आनंद झाला. सावित्री बाईना पाहून ती त्यांच्या मिठीत शिरली. नाहींतरी तिच्या लहानपणी याच सावित्री बाईने तिला अंगा-खांद्यावर खेळंवलं होतं. सुरेशशी तिने हस्तांदोलन केलंं. पाव्हण्यांसाठी तिने खास कांदे पोहे बनवले होते. वर कॉफी. गप्पा रंगल्या.

सुरेशला रहावलं नाही. त्यांने स्पष्टच विचारलं.

“मला सांग, लक्ष्मी पै ची लिली सिक्वेरा कशी झालीस?” लक्कीने एकदा आपल्या पप्पांकडे नजर घातली. पप्पांनी “उलय उलय” अशी संमती दिली. लक्कीने आपली कथा आरंभली.

“मी शाळेची शेवटची परिक्षा पास झाले तेंव्हा मम्मा वारली. घरची परिस्थिती बरी नव्हती म्हणून मी नोकरीच्या शोधात होते. मला एयर होस्टेस ची नोकरी मिळाली. सुरुवातीला मला ट्रेनिंगकरता जावं लागे. अशाच एका फ्लाईटमध्ये मुम्बई हाय कोर्टचे रिटायर्ड जज प्रवास करत होते. विल्फ्रेड सिक्वेरा असं त्यांचं नांव होतं….”

“आणि तू त्यांच्याशी लग्न केलंस?” सुरेशने न रहोवून प्रश्न केला. “ऐक रे, मध्ये बोलूं नकोस.” सावित्रीबाई म्हणाल्या. लक्कीने आपली कथा पुढे चालू केली.

“त्या जजना विमानात हार्ट अॅटॅक आला. मी मदत केली आणि प्रथमोपचार केले. विमान गोव्याला उतरल्यावर त्यांना त्यांच्या निवासस्थानी- कलंगुट बीच -इथे पोहोंचवलं.”

— अनिल शर्मा 

About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…