एक पाऊल ओल्या वाळूंत – भाग ४

“पुढे काय झालं?” सुरेशने अधीरतेने विचारलं.
“हो रे, सांगते नां !” लककीने सुरुवात केली.

“याच सुमाराला पप्पांच्या एका नातेवाईकाने डाव साधला. रमेश कामत असं त्याचं नांव. त्याचाही हॉटेल व्यवसाय होता. माझ्या आईशी लग्न व्हावे अशी त्याची इच्छा होती, म्हणजे त्याकाळी त्याला भरपूर हुंडा मिळाला असता, शिवाय आजोबांची इस्टेट. पण दामू आज्जांनी मम्मीकरतां पप्पांची निवड केली हे त्याला खटकलं होतं. त्यांने गोड बोलून पप्पांकडून पर्सनल सिक्यूरिटी पेपर्स वर सह्या घेतली व तो पैसे खाऊन परागंदा झाला. पप्पांकडून बॅंकेने पैसे वसूल करून घेतले. पप्पाना वाईट परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. अशावेळी सिक्वेरा साहेबांनी मला मदत केली. त्यांचं सर्व कर्ज फेडलं.”

” त्याची उतराई करण्याकरता तूं सिक्वेरा साहेबांशी लग्न केलंस, होय नां ?” सुरेशचा प्रश्न.
“सिक्वेरा साहेबांना एक मुलगा होता. विल्यम्स सिक्वेरा. तो कँंसरने आजारी होता. त्याच्या आईने- सिक्वेरा साहेबांच्या दिवंगत पत्नीने विल्यमचं लग्न करून देण्याची जबाबदारी सिक्वेरा साहेंबावर टाकली. शिवाय त्यांच्या वाटेची प्रॉपर्टी भावी सुनेच्या नांवाने करण्याची अट घातली. त्यांच्या निधनानंतर सिक्वेरा साहेबांना मला विचारल. मी होकार दिला. विल्यम्स शी माझं लग्न झालं. त्यानंतर दोनच महिन्यानंतर तो वारला. सिक्वेरा साहेब अलीकडेच वारले. त्यांची प्रॉपर्टीही माझ्या नांवाने झाली…..”

“तूं श्रीमंत झालीस. तरी मग तू एयर होस्टेसची नोकरी कां करतेस ?….” सुरेशने प्रश्न केला.
“तू मला अचानक भेटावास म्हणून…..” तिने आपलं वाक्य पुरं केलं.
“एक पाऊल ओल्या वाळूंत” असं म्हणत सुरेशने तिचा हात धरला. आणि उपस्थितांची पर्वा न करता नाचूं लागला.
“पै माम. This is not calf love. आमचं हे ऍडल्ट प्रेम आहे…परवानगी म्हणण्या ऐवजी आशिर्वाद द्या.! ” तो म्हणाला.

“मागिर पळोंया” पै माम नी हंसत उत्तर दिलं… !

— अनिल शर्मा 

About अनिल शर्मा 15 Articles
वास्तव्य – बेंगलूरू-कर्नाटक, वय एक्क्यांशी, शिक्षण मराठी भाषेतून झाले. सध्या वृद्धाश्रमात रहातो. एके काळी वकीलीचा व्यनसाय केला. आता स्वस्थ बसून संगणकावर काहीेतरी लिहीत आसतो.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ...

कोकणचा मेवा – जामफळ

उन्हाळ्यातील उष्णता कमी करण्यासाठी निसर्गत: डोंगर उतारावर येणारे फळ म्हणजे ...

कोकणचा मेवा – फणस

प्रवासात सामानाचे वजन वाहून नेतांना कष्ट पडतात. पण कोकणातला फणस ...

कोकणचा मेवा – जांभूळ

कोल्हापूरकडे जातांना आंबा घाटाच्या परिसरात जांभळाची झाडे अधिक प्रमाणात आहेत ...

Loading…