ललित लेखन
एक चित्रपट -तीन आठवणी !
थोड्या वेळापूर्वी ” आंटीने वाजविली घंटी ” हा चित्रपट टीव्ही वर लागला होता. १९८८-८९ ला आम्ही इस्लामपूरला असताना एक स्थानिक दिग्दर्शक श्री दिनेश साखरे (ते एका शाळेत शिक्षकही होते) यांनी हा चित्रपट काढला. निळूभाऊ, अलका कुबल, लक्ष्मीकांत बेर्डे , आशा पाटील अशी तगडी स्टारकास्ट. त्याच्या तीन आठवणी – […]
लोकधाराची दंगलगाणी
महाराष्ट्राची लोकधारा’चा पहिला कार्यक्रम मी पाहिला, तो चारुदत्त आफळेने टिळक स्मारक मंदिरात सादर केलेला. त्या कार्यक्रमात प्रवीण सूर्यवंशी नावाचा एक उत्साही कलाकार, वासुदेवाची भूमिका करायचा. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्याच्याशी आमचा परिचय झाला. […]
ब्रँडेड स्कुल
सगळ्या शाळांमध्ये असलेल्या सोयी सुविधा एका पेक्षा एक, थ्री स्टार, फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेल सारख्या. चकाचक रिसेप्शन, चकाचक एअर कंडिशन असलेले वर्ग, चकाचक गार्डन, चकाचक मैदान, चकाचक बसेस, चकाचक शिक्षक आणि स्टाफ आणि त्याहून चकाचक त्या शाळेत शिकणारे लहान लहान निरागस विद्यार्थी. पण सगळ्यात जास्त खटकत होत ते म्हणजे अशा या सगळ्या ब्रँडेड शाळा आपापले मार्केटिंग करत होत्या. […]
‘सुरीली’ सफर
गुणगौरव’मध्ये जाहिरातींची कामं सुरु करण्याआधी आम्ही घरातूनच कामं करीत होतो. ऑर्केस्ट्राचं पहिलं काम केलं ते पपीशकुमार ललगुणकर यांच्या तिकीटाच्या डिझाईनचं. हत्ती गणपतीजवळ एक छोटा ‘लकी प्रिंटींग प्रेस’ होता. शहा व लाळे असे दोघेजण त्याचे पार्टनर होते. त्यांच्याकडे डिझाईनचं काही काम आलं की, ते आमच्याकडून करुन घ्यायचे. […]
“मन’मोहना’ऽऽ, तू राजा ‘मनोरंजना’तला”
मोहनच्या वडिलांचं, मनोहर (अण्णा) कुलकर्णी यांचं विजय थिएटरच्या तळघरात ‘मनोरंजन पब्लिसिटी’चं आॅफिस होतं. मनोहर कुलकर्णी, डॅडी लोणकर व नाना रायरीकर या तिघांनी मिळून ‘मनोरंजन’ची स्थापना केली. नाटकांसाठी थिएटर बुकींग, नेपथ्य, जाहिरात, लायसन्स अशा सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारं पुण्यातील हे एकमेव ठिकाण होतं. […]
पोस्ट-कार्ड
मी क्षणार्धात भूतकाळात गेलो. १९८३ साली अनेक दिवाळी अंकांचे काम केले होते. त्यामुळे पोस्टमनची घरी रोजचीच चक्कर होत असे. कधी पत्रं तर कधी दिवाळी अंकाचे पार्सल पोस्टाने येई. त्या दिवाळीला आलेल्या दोघां पोस्टमनच्या हातावर ‘पोस्त’ची रक्कम देताना मला अतिशय समाधान वाटलं होतं आणि या वर्षी कोरोना महामारीमुळे गेले आठ महिने मी लाॅकडाऊनमध्ये घरात बसून काढले. […]
जगण्याची कला शिकवणारे विद्यापीठ
शतकानुशतके ना कोणी आमंत्रण पत्रिका छापते, ना कुणी कोणाला एकत्र येण्याचे आवाहन करते, ना कोणाला एकत्र येण्याचे, काम करण्याचे मानधन मिळते, तरीही बरोबर ज्या त्या तिथीला, जो तो आपापल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचतोच…. हे वैशिष्ठय कोणत्या सभेचे किंवा उपक्रमाचे नाही तर ही आहे आपली पंढरीची वारी…. […]
