नवीन लेखन...

गोपाळ गणेश आगरकर जयंतीनिमित्त

‘यतो वाचो निवर्तन्ते…’ सारख्या औपनिषदिक वचन उद्धृत केल्याने आगरकरांना अज्ञेयवादी मानले जाते. परमतत्त्व निर्गुण निराकार अनिवर्चनीय म्हणजे अज्ञेय हे मान्य केले की, आगरकर स्पेन्सरप्रमाणे अज्ञेयवादी किंवा पारलौकिकाविषयी शंका उपस्थित केल्याने ह्यूमप्रमाणे संशयवादी मानले जातात. इहवादी, इहनिष्ठ, विवेकी असे हे समतेचे तत्त्वज्ञान अस्पृश्यता निवारणासाठी मोलाचे कार्य केले. […]

काळ ‘मुद्रा’

पन्नास वर्षांपूर्वी रस्त्याने जाताना हातगाडीवर टाईपांचे खिळे जुळविलेल्या गॅली प्रिंटींग प्रेसवर घेऊन जाणारे हातगाडीवाले हमखास दिसायचे. त्यावेळी कंपोज एकीकडे तर प्रिंटींग दुसरीकडे होत असे. त्यावेळची मासिकं, पाक्षिकं, वर्तमानपत्रं इत्यादी सर्व कामं टाईपांचे खिळे जुळवून केली जायची. शिसे धातूचे टाईप तयार करणाऱ्या टाईप फाऊंड्री देखील खूप होत्या. पुरुषांबरोबर कंपोझिटर स्त्रियाही, ठराविक साच्यामध्ये मजकूर कंपोज करायच्या. त्याचं मग […]

पुराव्याने शाबित

भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो.. […]

खासे सामोसे

पाऊस पडून गेल्यावर काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा हमखास होतेच. अलीकडे कोणत्याही राजस्थानी स्वीट मार्टमध्ये गरमागरम सामोसे विक्रीला ठेवलेले असतातच. ज्याला ‘छोटीशी भूक’ आहे, तो सामोसा खायला, नक्कीच प्राधान्य देतो. दुकानदार तो गरम सामोसा पेपरप्लेटमध्ये घेऊन अंगठ्याने दाबून तो फोडतो, त्यात साॅस, ग्रीन चटणी घालून वरती बारीक शेव भुरभुरतो व सोबत एक तळलेली मिरची देतो. […]

रंगांचा बेरंग

व्हिजिटींग कार्डाची कामं त्यावेळी सारखी येत असत. त्याचं डिझाईन केलं की, निगेटिव्ह पाॅझिटिव्ह तात्यांकडे, ग्राफिनात करुन प्रिंटींगला देत असू. यामध्ये सुरुवातीला भावे हायस्कूल समोरील यंदे स्क्रिन प्रिंटरकडे, काम देऊ लागलो. यंदेची ओळख वेलणकरांमुळे झाली होती. यंदेच्या वडिलांचं मोटार गॅरेज होतं. त्या जागेच्या एका कोपऱ्यात यंदे व सावंत दोघेही स्क्रिन प्रिंटींगचं काम करायचे. तिथं पटवर्धन नावाचा मित्र भेटत असे. त्याला आम्ही ‘नुक्कड’ मधील ‘खोपडी’ हे नाव ठेवले होते. तो हाॅटेलची मेनू कार्ड यंदेकडून प्रिंटींग करुन घेत असे. […]

जगतविख्यात तत्वचिंतक जे. कृष्णमूर्ती

त्यांच्या भाषणातून अनेक मुद्द्यांना ते हात घालत असत आणि तो अर्धवट सोडून देत असत कारण यापुढील विचार ,त्याचा निर्णय तुमचा हवा एक थिंकर म्हणून .. ते नेहमी म्हणत जर कुठला प्रॉब्लेम आला तर त्याचे व्यवस्थित विचारपूर्वक पोस्टमार्टेम करा तुम्हाला तुमच्या प्रोब्लेमचे उत्तर सापडेल. सर्व दुःखाचे मूळ आहे ते म्हणजे अटॅचमेन्ट , तुम्हाला डिटॅच होता आले पाहिजे. ते अत्यंत साध्या सोप्या भाषेत समजवत असत. […]

मी तोच आहे, तू मात्र ‘बदललास’

रविवारची सुट्टी. दुपारचं जेवण झाल्यावर मी गॅलरीत खुर्ची टाकून निवांत बसलो होतो. जूनचा महिना असल्यामुळे आभाळ भरुन आलं होतं. आता थोड्याच वेळात थेंब पडायला लागतील, असं भर दुपारी ‘नभ मेघांनी आक्रमिलं’ होतं. तेवढ्यात मला कुणाचा तरी आवाज आला. होय, पाऊसच माझ्याशी बोलत होता. तो मला म्हणाला, ‘कसा आहेस मित्रा, ओळखलंस का मला?’ मी गोंधळून गेलो. मला काय बोलावं ते सुचेना. […]

अजूनही “लिटील” च !

मागील आठवड्यात गाजावाजा झालेला लिटील चॅम्प्स बघितला. पंचरत्न म्हणून पुढे महाराष्ट्रात नावाजली गेलेली मुग्धा, कार्तिकी, आर्या, रोहीत आणि प्रथमेश आता वेगळ्या भूमिकेत दिसली. आणि त्यांना ते काम अजिबात जमत नव्हतं. एकतर त्यांची गायक म्हणूनच अद्याप कारकीर्द मोठी नाही, रियाझ /साधना पूर्ण झालेली नाही आणि लगेच त्यांना इतरांचे मूल्यांकन करायला सांगणे? […]

बर्थ – रिबर्थ

डिलीव्हरी नंतर अडीच तीन तास झाले असावेत प्रियाकडे बघून तिच्या मामीला काहीतरी वेगळेच जाणवले. प्रियाला काहीतरी होतेय असे तिला वाटले, हा डिलीव्हरी नंतरचा थकवा नाहीये असे तिला वाटतं असताना तिने सिस्टरला बोलावले आणि प्रियाला बघायला सांगितले तेवढ्याने पण तिचे समाधान झाले नाही. मामीने डिलिव्हरी केली त्या डॉक्टरना ताबडतोब बोलवायला सांगितले. डॉक्टर आल्यावर त्यांनी प्रियाला बघितले आणि लगेच पुन्हा ओटी मध्ये न्यायला सांगितले. नॉर्मल डिलिव्हरी नंतर अडीच तीन तासांनी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव सुरु झाला होता. […]

कानगोष्टी

सुंदर पुरुषाच्या चेहऱ्याकडे पाहिलं की, लक्ष जातं ते त्याच्या डोळे, नाक, ओठांकडे. ती जर स्त्री असेल तर या तीन्ही गोष्टींनी तिच्या सौंदर्यात भरच पडते, जसं हरिणाक्षी टपोरे डोळे, चाफेकळीसारखं नाक व धनुष्याकृती ओठ! अशावेळी चेहऱ्यावरील एका महत्त्वाच्या अवयवाकडे सर्वांचंच दुर्लक्ष होतं, ते म्हणजे बिचाऱ्या कानांकडे! त्यांना चेहऱ्याची रखवालदारी करण्यासाठी दोन्ही बाजूला आयुष्यभर उभं केलं जातं. […]

1 194 195 196 197 198 307
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..