नवीन लेखन...

इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर

मर्चंट नेव्ही मध्ये जहाजांवर इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणजेच ई टी ओ ही रँक पूर्वी इलेक्ट्रिकल ऑफिसर किंवा ई ओ अशी होती. हल्ली नवीन जहाजांवर आधुनिकीकरणामुळे ऑटोमेशन, कॉम्पुटर आणि इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्ड सिस्टीम आल्यामुळे इलेक्ट्रिकल ऑफिसर्स ना सुद्धा सक्षमता परीक्षा किंवा कॉम्पेटँसी एक्झाम द्यावी लागते. ही परीक्षा सुरु झाल्यापासून इलेक्ट्रिकल ऑफिसर हे इलेक्ट्रो टेक्निकल ऑफिसर म्हणून जहाजावर जॉईन होत आहेत. […]

जगावेगळं जोडपं

नचिकेत व जयू हे दोघेही खरे व्यवसायाने आर्किटेक्चर. मात्र ही क्रांतिकारी घटना पडद्यावर साकारण्यासाठी त्यांनी चंग बांधला. NFDC कडून अर्थसहाय्य घेऊन अवघ्या साडे तीन लाखांत या चित्रपटाची निर्मिती केली. थिएटर अॅकॅडमीचं या निर्मितीला सहकार्य मिळालं. माझ्या ओळखीचे अनेक कलाकार या चित्रपटात सहभागी होते. […]

आठवण संत कान्होपात्रा नाटकाची

आज आषाढी एकादशी! त्यानिमित्ताने मागील काही जुन्या नाटकांचा अभ्यास करते वेळेस अचानक समोर ‘संगीत संत कान्होपात्रा’ नामक नाटक उभं ठाकलं. जास्तीचा अभ्यास करताना हे नाटक केवढं जुनं आहे हे लक्षात आलं. १९३१ च्या काळात हे नाटक रंगभूमीवर आलं असं वाचनातून निदर्शनास आलं. १९ नोव्हेंबर १९३१ रोजी या नाटकाचा प्रथम प्रयोग झाला. या नाटकाला संगीत मा. कृष्णराव […]

मधु’रिमा’

१९७९ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिंहासन’ या चित्रपटापासून तिने सिने कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर नाटक आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात तिचे नाव गाजू लागले. […]

अभिनेत्री सुरय्या

सूरय्या …तिचा मी लहानपणी रुस्तम-ए- सोहराब पहिला होता..का कुणास ठाऊक मला ती खूप आवडू लागली…मी तिचा हा चित्रपट खूप वेळा पहिला..एक दिवस मी वानखेडे Stadium ला गेलो असताना मला कळले ती कोपऱ्यावर राहते, […]

‘बाप’ दिवस

लेखकांमध्ये प्रत्येक पिढीनुसार, नवे जुने ‘बाप’लेखक असू शकतात. मी आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, उद्धव ज. शेळके यांचं साहित्य वाचलं. खरंच ती माझ्या दृष्टीनं ‘बाप’माणसंच होती. त्यांची पुस्तकं वाचूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची लेखनशैली आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला. […]

जीए !

जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित – अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. […]

‘मोहा’ची कात्री

गंगारामने असा अघोरी खून केलेला पाहून त्याचे मामा स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागले. गंगारामला या गावात आणल्याचा त्यांना आता पश्र्चाताप होऊ लागला.पोलीस तपास सुरु झाला. गंगारामच्या मामांना पोलीसांनी चौकशीसाठी चौकीत बोलाविले. मामांच्या साध्यासरळ जीवनात असा मानहानीचा प्रसंग कधीही आला नव्हता. त्यांनी विष घेऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

शेवटी तपास करणाऱ्या पोलीसांना गंगाराम व त्या […]

लास्ट डे, लास्ट शो !

भुसावळला वसंत टॉकीज च्या वरती “राजश्री ” चे ऑफिस होते. गल्लीमित्र कमलाकर भोळे याचे वडील तेथे नोकरीला होते. बरेचदा सायकलवर मोठ्या लोखंडी पेट्या किंवा रिळांच्या बॉक्सेसची ते ने-आण करीत. त्यांनी आम्हाला एकदा टीप दिली होती- “कोणताही सिनेमा पाहायचा असेल तर तो फर्स्ट डे फर्स्ट शो बघावा किंवा लास्ट डे लास्ट शो !”

कारण गावात रिळं आलीत की टॉकीज मधील पहिल्या शोला कापाकापी नसते. […]

गोपाळ गणेश आगरकर जयंतीनिमित्त

‘यतो वाचो निवर्तन्ते…’ सारख्या औपनिषदिक वचन उद्धृत केल्याने आगरकरांना अज्ञेयवादी मानले जाते. परमतत्त्व निर्गुण निराकार अनिवर्चनीय म्हणजे अज्ञेय हे मान्य केले की, आगरकर स्पेन्सरप्रमाणे अज्ञेयवादी किंवा पारलौकिकाविषयी शंका उपस्थित केल्याने ह्यूमप्रमाणे संशयवादी मानले जातात. इहवादी, इहनिष्ठ, विवेकी असे हे समतेचे तत्त्वज्ञान अस्पृश्यता निवारणासाठी मोलाचे कार्य केले. […]

1 169 170 171 172 173 282
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..