नवीन लेखन...

शिर्डीच्या श्रीसाईबाबा मुर्तीची कथा!

शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीला ६७ वर्षे पुर्ण झाली, शिर्डी संस्थानच्या इतीहासात या दिवसाला खुपच महत्व आहे, बाबांच्या महासमाधीनंतर ३५ वर्षांनी हि मुर्ती मंदिरात प्रस्थापीत केली गेली, त्याची विलक्षण कथा खालीलप्रमाणे,

१९५२ मधे पांढरा शूभ्र ईटालीयन मार्बलचा एक मोठा तुकडा इटलीहुन मूंबई डॉकयार्ड मधे आला, कोणी पाठवला?कोणी मागवला? कोणालाच माहीती नव्हती, ताबा घेणारा कोणी नाही म्हणुन डॉकयार्ड अधीकाऱ्यानी त्याचा लिलाव काढला,ज्याने हा लिलाव घेतला त्याने हा तुकडा शिर्डी संस्थानला दिला,
अतीशय मौल्यवान असा तो संगमरवर पाहुन शिर्डी संस्थानने त्याची मुर्ती बनवायची ठरवले!

हे काम त्यांनी मुंबईचे प्रसीद्ध शिल्पकार श्री बाळाजी वसंतराव तालीम यांना दिले. आपल्या कामात निष्णात असलेल्या तालीम यांनी या मुर्तीसाठी लागणारी हत्यारे,त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे लोहार व सुतार यांच्याकडून बनवुन घेतली. सुरुवातीला त्यांनी बाबांची मातीची मॉडेल मुर्ती बनवली व कामाला सुरुवात केली, बाबांच्या चेहेरे पट्टीशी जुळणारी हुबेहुब मूर्ती त्यांना बनवता येत नव्हती कारण त्यांच्याकडे बाबांच्या चेहऱ्याचे पुर्ण तपशील नव्हते जे काही होते ते एक जुना ब्लॅक व्हाईट फोटो होता, त्यावरुनच त्यांना हे काम करायचे होते! शेवटी त्यांनी कळकळीने बाबांची प्रार्थना केली व म्हणाले”बाबा, तुम्ही मला दर्शन दिलेत तरच मला ही मुर्ती घडवता येईल आणी अस झाल तरच हि मुर्ती भक्तांना आनंद देऊल व त्यांची भक्ती वाढवील!

आणी काय सांगावं!

एके दिवशी सकाळी सात वाजता तालीम आपल्या स्टुडीओत गेले असताना त्यांनी एक दिव्य प्रकाश पाहीला व त्या प्रकाशात बाबा प्रकट झाले!

बाबांनी तालीमांच्या सर्व शंका दुर केल्या व आपल्या चेहेऱ्याचे विविध कोनातुन दर्शन घडवले, तालीमांनी ते सर्व लक्षात ठेवल व सर्व तपशील स्मरणात ठेवले!

इकडे शिर्डी संस्थानने मातीच्या मॉडेल मुर्तीला मान्यता दिली व त्याच्या अनुषंगाने मूर्ती घडवण्यास सांगीतले! १९५४ साली मुर्तीचे काम अंतीम टप्य्यात असताना,त्या मुर्तीत हवेची एक मोठी पोकळी आढळून आली, कमकुवत असा तो भाग काढणे आवश्यक होते, हा भाग बाबांच्या डाव्या(दुमडलेल्या)पायाच्या गुडघ्याखालचा होता,पण अस केल असता तर कदाचीत मुर्तीच्या आवश्यक भागातला काही भाग पण नीघाला असता तर ती मुर्ती भग्न झाल्यामूळे पुजनीय राहीली नसती, काम थांबल, बाळाजी तो अनावश्यक भाग काढुन टाकायला तयार होईनात, परत त्यांनी बाबांना प्रार्थना केली,”बाबा,मुर्ती तयार आहे,माझ्यावर कृपा करा” तेवढ्यात त्यांच्या अंतर्मनातुन आवाज आला,”कामा सुरु ठेव” बाळाजींनी कारागीरना तो भाग काढण्यास सांगीतले, पण ते तयार होईनात, त्यांना भीती वाटत होती की तो गुडघ्याखालचा भाग ढासळेल!

shirdi sai baba original murtiशेवटी स्वतः तालीमांनी छीन्नी हातोडा हातात घेतला व तो भाग काढायला सुरुवात केली. त्यांच्या आश्चर्याने तो भाग सहजच बाहेर आला व मुर्तीहि शाबुत राहीली,बाळाजी नाचायलाच लागले त्यांनी लगेच मिठाई आणून वाटली, अत्यंत सजीव वाटणाऱ्या त्या मुर्तीची गावातुन समारंभपुर्वक मिरवणुक काढली, लक्ष्मीबाई शिंदे व स्वामी शरणानंद जे बाबांचे जवळचे भक्त होते. त्यांनी मुर्तीच्या हुबेहुबपणाबद्दल समाधान व्यक्त केले व जणु “बाबाच परत आपल्यात आले” हे उद्गार काढले.

ही मुर्ती घडवण्याचे काम चालु असता एकदा बाबांनी बाळाजींना दर्शन दिले व या मुर्तीनंतर तु अन्य कुठलीही मुर्ती बनवणार नाहीस असे सांगीतले. बाळाजींची ही मुर्ती अखेरची ठरली, शेवटी वयाच्या ८२ व्या वर्षी वीस डिसेंबर ला तालीमांनी अखेरचा श्वास घेतला.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..