नवीन लेखन...

अभिनेत्री सुरय्या

सूरय्या …तिचा मी लहानपणी रुस्तम-ए- सोहराब पहिला होता..का कुणास ठाऊक मला ती खूप आवडू लागली…मी तिचा हा चित्रपट खूप वेळा पहिला..एक दिवस मी वानखेडे Stadium ला गेलो असताना मला कळले ती कोपऱ्यावर राहते, […]

‘बाप’ दिवस

लेखकांमध्ये प्रत्येक पिढीनुसार, नवे जुने ‘बाप’लेखक असू शकतात. मी आचार्य अत्रे, पु. ल. देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, उद्धव ज. शेळके यांचं साहित्य वाचलं. खरंच ती माझ्या दृष्टीनं ‘बाप’माणसंच होती. त्यांची पुस्तकं वाचूनच मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्यांची लेखनशैली आत्मसात करण्याचा मी प्रयत्न केला. […]

जीए !

जीए कुलकर्णींनी ज्याक्षणी लेखणीला हात घातला तो क्षण मराठी सारस्वताच्या भाळी कायमचा गोंदला गेला. रूढार्थाने गावकुसाबाहेर राहून त्यांनी मराठी भाषेला जागतिक व्यासपीठ दिले. साहित्याचे सगळे लिखित – अलिखित नॉर्म्स न पाळता ते स्वतःच्या उंचीवर पोहोचले. […]

‘मोहा’ची कात्री

गंगारामने असा अघोरी खून केलेला पाहून त्याचे मामा स्वतःच्या नशिबाला दोष देऊ लागले. गंगारामला या गावात आणल्याचा त्यांना आता पश्र्चाताप होऊ लागला.पोलीस तपास सुरु झाला. गंगारामच्या मामांना पोलीसांनी चौकशीसाठी चौकीत बोलाविले. मामांच्या साध्यासरळ जीवनात असा मानहानीचा प्रसंग कधीही आला नव्हता. त्यांनी विष घेऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

शेवटी तपास करणाऱ्या पोलीसांना गंगाराम व त्या […]

लास्ट डे, लास्ट शो !

भुसावळला वसंत टॉकीज च्या वरती “राजश्री ” चे ऑफिस होते. गल्लीमित्र कमलाकर भोळे याचे वडील तेथे नोकरीला होते. बरेचदा सायकलवर मोठ्या लोखंडी पेट्या किंवा रिळांच्या बॉक्सेसची ते ने-आण करीत. त्यांनी आम्हाला एकदा टीप दिली होती- “कोणताही सिनेमा पाहायचा असेल तर तो फर्स्ट डे फर्स्ट शो बघावा किंवा लास्ट डे लास्ट शो !”

कारण गावात रिळं आलीत की टॉकीज मधील पहिल्या शोला कापाकापी नसते. […]

गोपाळ गणेश आगरकर जयंतीनिमित्त

‘यतो वाचो निवर्तन्ते…’ सारख्या औपनिषदिक वचन उद्धृत केल्याने आगरकरांना अज्ञेयवादी मानले जाते. परमतत्त्व निर्गुण निराकार अनिवर्चनीय म्हणजे अज्ञेय हे मान्य केले की, आगरकर स्पेन्सरप्रमाणे अज्ञेयवादी किंवा पारलौकिकाविषयी शंका उपस्थित केल्याने ह्यूमप्रमाणे संशयवादी मानले जातात. इहवादी, इहनिष्ठ, विवेकी असे हे समतेचे तत्त्वज्ञान अस्पृश्यता निवारणासाठी मोलाचे कार्य केले. […]

काळ ‘मुद्रा’

पन्नास वर्षांपूर्वी रस्त्याने जाताना हातगाडीवर टाईपांचे खिळे जुळविलेल्या गॅली प्रिंटींग प्रेसवर घेऊन जाणारे हातगाडीवाले हमखास दिसायचे. त्यावेळी कंपोज एकीकडे तर प्रिंटींग दुसरीकडे होत असे. त्यावेळची मासिकं, पाक्षिकं, वर्तमानपत्रं इत्यादी सर्व कामं टाईपांचे खिळे जुळवून केली जायची. शिसे धातूचे टाईप तयार करणाऱ्या टाईप फाऊंड्री देखील खूप होत्या. पुरुषांबरोबर कंपोझिटर स्त्रियाही, ठराविक साच्यामध्ये मजकूर कंपोज करायच्या. त्याचं मग […]

पुराव्याने शाबित

भांड्यांवर नाव टाकण्यामागे कारण असं असायचं की, कधी शेजारी पाजारी ते भांडं काही वस्तू घालून दिलं, तर ते सहज परत मिळावं व त्याची त्यांच्या भांड्यात सरमिसळ होऊ नये म्हणून…त्यावर नाव असल्याने आपण ते भांडे आपलेच आहे, हे ‘पुराव्याने शाबित’ करु शकतो.. […]

खासे सामोसे

पाऊस पडून गेल्यावर काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा हमखास होतेच. अलीकडे कोणत्याही राजस्थानी स्वीट मार्टमध्ये गरमागरम सामोसे विक्रीला ठेवलेले असतातच. ज्याला ‘छोटीशी भूक’ आहे, तो सामोसा खायला, नक्कीच प्राधान्य देतो. दुकानदार तो गरम सामोसा पेपरप्लेटमध्ये घेऊन अंगठ्याने दाबून तो फोडतो, त्यात साॅस, ग्रीन चटणी घालून वरती बारीक शेव भुरभुरतो व सोबत एक तळलेली मिरची देतो. […]

रंगांचा बेरंग

व्हिजिटींग कार्डाची कामं त्यावेळी सारखी येत असत. त्याचं डिझाईन केलं की, निगेटिव्ह पाॅझिटिव्ह तात्यांकडे, ग्राफिनात करुन प्रिंटींगला देत असू. यामध्ये सुरुवातीला भावे हायस्कूल समोरील यंदे स्क्रिन प्रिंटरकडे, काम देऊ लागलो. यंदेची ओळख वेलणकरांमुळे झाली होती. यंदेच्या वडिलांचं मोटार गॅरेज होतं. त्या जागेच्या एका कोपऱ्यात यंदे व सावंत दोघेही स्क्रिन प्रिंटींगचं काम करायचे. तिथं पटवर्धन नावाचा मित्र भेटत असे. त्याला आम्ही ‘नुक्कड’ मधील ‘खोपडी’ हे नाव ठेवले होते. तो हाॅटेलची मेनू कार्ड यंदेकडून प्रिंटींग करुन घेत असे. […]

1 171 172 173 174 175 284
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..