नवीन लेखन...

जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे अर्थात नाना शंकरशेठ

आज आपण अशा एका व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देणार आहोत की ज्यांनी मुंबईच्या शैक्षणिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक गोष्टींच्या पायाभरणीत सिंहाचा वाटा उचलला आहे.  अशी ही महान व्यक्ती म्हणजे जगन्नाथ शंकरशेठ मुरकुटे, म्हणजेच  नाना शंकर शेठ. आधुनिक मुंबईचे शिल्पकार. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून अगदी मृत्यूपर्यंत म्हणजे ६५ व्या वर्षापर्यंत मुंबईच्या जडणघडणीत त्यांनी केलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे. या महिना अखेरीस , म्हणजे, 31 जुलै 2021 ला त्यांचा 156 वा  स्मृतीदिन आहे. त्यानिमिताने हा त्यांच्या योगदानाचा उहापोह ! […]

ग्रँड कॅनीयन ऑफ महाराष्ट्र

सकाळी सात च्या सुमारासच त्या परिसरात गेल्याने धुक्याची अंधुकशी चादर पसरली होती. मध्येच एखाद्या वाडीतील दोन चार घरातून बाहेर पडणारा धूर धुक्यात मिसळताना दिसत होता. अधून मधून येणाऱ्या पावसाच्या लहान लहान सरींनी पळसाच्या पानांवर पावसाचे टपोरे थेंब खाली पडायच्या अवस्थेत खोळंबल्यासारखे दिसत होते. […]

जिंदगी धूप, तुम घना साया

१९८१ साली प्रदर्शित झालेला ‘चष्मेबद्दूर’ हा हलका फुलका, अप्रतिम चित्रपट आहे. तो अगदी आजही पाहिल्यावर ‘रिफ्रेश’ झाल्यासारखं वाटतं. त्यातील ‘कहासे आये बदरा..’ हे गाणं गाणारी दिप्ती नवल ही अभिनेत्री न वाटता, आपल्या जवळपासच राहणारी साधी मध्यमवर्गीय मुलगी वाटते. […]

कवयित्री इंदिरा संत

इंदिरा संत याचे शेला, मेंदी, मृगजळ, मरवा ,निवारा असे अनेक काव्यसंग्रह प्रसिदध आहेत. त्यांनी ऐकून २५ पुस्तके लिहिली. […]

फोर व्हिलर

तीन बैलजोड्या होत्या त्यातील एक एक जोडी कमी होत गेली. शेवटी शेवटी तर एकच बैल उरला होता. एक बैल काहीच कामाचा नसल्याने त्याला विकण्या शिवाय पर्याय नव्हता असे असूनही त्याला विकायची ईच्छा होत नव्हती. एकाच बैलाला काही वर्षे संभाळल्यावर बाबांच्या एका मित्राने त्याला विकत नेण्याची तयारी दर्शवली. […]

फुल खिले है

१९७२ साली भारतात दूरदर्शन सुरु झाल्यावर, पहिल्याच आठवड्यात एका लोकप्रिय कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमाचं नाव होतं ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’! हा कार्यक्रम सलगपणे तब्बल २१ वर्षे चालला. […]

अभिनेते प्राण

प्राण साहेबानी आपल्या चाहत्यांना भरभरून दिले… तरी पण ते सगळ्यांना अपूर्ण वाटते कारण हि माणसे अमर आहेत असेच आमची पिढी लहानपणापासून मानत आहे.. […]

प्राईसलेस

रस्त्यावरून जाणाऱ्या गाडयांना हातातील गजरे हलवून दाखवणाऱ्या त्या लहान मुलीला, बाय गजरे कसे दिले विचारले आणि तिने दहाला एक सांगताच वीस रुपयात दोन गजरे विकत घेतले. न उमललेल्या मोगऱ्याच्या कळ्यांपासून बनवलेल्या डझनभर गजऱ्यातून फक्त दोन गजरे घेतल्याने देखील त्या लहान मुलीच्या चेहऱ्यावर लहानसे हसू उमलले. […]

वृक्षवल्ली

निसर्गाशी माणसाचं नातं फार पुरातन काळापासून आहे. आपल्या बोलण्यातून कित्येक झाडं, झुडपं, रोपं, फळा-फुलांचे संदर्भ सहजपणे येत असतात.. त्यामुळेच संत तुकाराम महाराजांनी म्हटलेला अभंग माणसांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतो.. वृक्षवल्ली आम्हा, फक्त सोयरीच नाही तर ती आमच्यात भिनलेली आहेत.. […]

ड्रीम लायनर टू होम क्वारंटाईन

जकार्ता विमानतळावर फक्त एअर इंडियाच्या विमानासाठी भारतीय जमा होतं होते. भारतीय दूतावासातील कर्मचारी आपुलकीने सहकार्य आणि मार्गदर्शन करत होते. इंडियन नेव्हीचे एक कमांडर स्वतः अडचण असलेल्या प्रवाशाला शांतपणे ऐकून आणि समजून घेत होते तसेच त्याची समस्या दूर करत होते. भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विमानतळावर भारतात परतण्यासाठी आतुर असलेल्या तणाव ग्रस्त भारतीयांशी आपुलकीने आणि सहजतेने वागतानाचे भावनात्मक क्षण पाहून भारावल्यासारखे झाले होते. […]

1 168 169 170 171 172 284
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..