नवीन लेखन...

बबड्या, आसावरी आणि मी

सध्या एका नामवंत वाहिनीवर “बबड्या’ची मालिका चालू आहे. त्यातील पात्रांवरुन फेसबुकवर, व्हाॅटसअपवर अनेक ‘टीकात्मक पोस्ट’ वाचनात आल्या. त्यातील विनोदाचा भाग सोडला तर आजकाल दहा कुटुंबातील चार तरी कुटुंबात ‘बबड्या’ आपल्याला भेटतोच. माझंच पहाना, आमचा ‘बबड्या’ बालवाडीत असताना त्याला रोज डब्यामध्ये आसावरी वेगवेगळा खाऊ द्यायची. कधी मॅगी, कधी केक तर कधी बर्गर. शाळेतल्या बाई बबड्याच्या आईला समजावून […]

हिरोशिमावर बॉम्ब टाकून वेडा झालेला वैमानिक – क्लौड इथेर्ली

हिरोशिमाच्या आकाशात दोन विमाने घिरट्या घालत होती. एका क्षणात त्यातल्या एका विमानातून अणुबॉम्ब हिरोशिमा शहरावर पडला. प्रचंड मोठा स्फोट झाला आणि मशरूमच्या आकाराचा आगीचा लोळ आकाशाकडे झेपावला. त्या आधीच ती दोन्ही विमाने हिरोशिमाच्या बाहेर पडली. त्या दोन विमानापैकी एक वैमानिक होता पौल तीबेट्स  व दुसरा वैमानिक होता क्लौड इथेर्ली (Claude Eatherly). […]

क्रिकेट – मनाच्या मैदानापासून ते टीव्ही च्या पडद्यापर्यंत !

आजवर एकही सामना प्रत्यक्ष पाहिला नसला तरीही “ इन्साईड एज “या वेबसीरीज च्या दोन सीझन्सच्या निमित्ताने घरबसल्या पीपीएल (आय पी एल च्या धर्तीवर) चा दृश्यानुभव घेतला. एकेकाळी “जंटलमेन्स “गेम म्हणून प्रसिद्ध असलेले क्रिकेट दुसऱ्या सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये “लेट द बेस्ट विन ” या तुरटीच्या खड्याकडे येऊन संपते तेव्हा मनःपूत श्वास सोडावासा वाटला. […]

खडतर प्रवास

जीवन हे माणसाला पावलापावलाला एक नवीन अनुभव देत असते परंतु, हा अनुभव घेताना यात अनेक खडतर मार्ग येतात, या मार्गांवरून जाताना स्वतःला सांभाळणे सर्वात अवघड असते. […]

मी कशाला आरशात पाहू

काळ बदलला खूपच आणि आता आपली पूर्ण प्रतिमा दिसेल एवढे आरसे. शिवाय मोबाईल मध्ये. गाडीवर. कुठे कुठे नसतो आरसा. एवढे असूनही सेल्फीत सारखे बघायचे चालूच. आणि वरताण म्हणजे मी कशी दिसते? हा प्रश्न विचारला जातोच. […]

पप्पू दी ग्रेट

द्वारकानाथ संझगिरीं यांनी वयाच्या २१ व्या वर्षी लिहिण्यास सुरवात केली. त्यांचे वडील जाहिरात क्षेत्रात होते , त्यामुळे त्यांच्याकडे सर्व वृत्तपत्रे येत असत त्या वाचनामुळे समाजात काय चालले आहे ह्यांचे त्यांना भान होते आणि या सर्व गोष्टींमधून त्यांना लिहणायची स्फूर्ती मिळाली. […]

बाप बिलंदर बेटा कलंदर

कांबळेंबद्दल आम्हाला काही वेळा हे खरंच चित्रकार असावेत का? अशी शंका येत असे. कारण त्यांनी स्वत:चा काम करताना फोटो दाखवला नाही. कधी कागदावर स्केचसुद्धा काढून दाखवलं नाही. […]

योग साधनेचा येता (सुमंत उवाच – ९०)

कर्मयोग या शब्दाला श्री समर्थ रामदासांनी फार महत्व दिलं आहे. प्रत्येक माणसाच्या शरीरात चार प्रकारच्या शक्ती असतात आणि प्रत्येकाच्या शरीरात त्यातल्या एका शक्तीचा प्रभाव जास्त असतो. […]

अचूक ऊत्तर

कामावर निघालेले बाबा पेपर चाळत असताना म्हणाले काय कलियुगात चाललय काही समजत नाही. दोन रुपयांसाठी मित्राचा खून केला आहे असे वाचून सांगत होते. ते गेल्यावर एक मुलगा आईला म्हणाला मी कसा आहे म्हणजे कसा वागतो चांगला वागतो ना . याच ऊत्तर आणखीन दहा वर्षांनी सांगते असे म्हणून आई आत मध्ये गेली. […]

काळाच्या पडद्याआड जाणारी सिनेमाघरं..

मार्च महिन्यापासून ‘कोरोना’मुळे लाॅकडाऊन सुरु झालं आणि सर्व टाॅकीज ‘व्हेंटिलेटर’वर गेल्या. टाॅकीजमध्ये जळमटं वाढलीत. खुर्च्यांवरती धुळीची पुटं चढलीत. मनोरंजनाच्या क्षेत्रावर झालेला हा दुष्परिणाम जागतिक चित्रपटसृष्टीचं सर्वात मोठं नुकसान आहे. […]

1 134 135 136 137 138 286
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..