‘बोनस’ लाईफ
वयाच्या साठीनंतर उपभोगलं जाणारं प्रत्येकाचं जीवन, हे ‘बोनस’ लाईफच असतं. बालपण वय वर्षे चौदापर्यंत, भुर्र उडून जातं. गद्धेपंचविशीपर्यंत, शिक्षण पूर्ण झालेलं असतं. नोकरी आणि छोकरी तिशीपर्यंत, जीवनात समाविष्ट होते. पुढील तीस वर्षे पाठीचा कणा तुटेपर्यंत, संसाराचा गाडा हाकावा लागतो. साठीपर्यंत घरातील जबाबदाऱ्या पार पाडून, तृप्त भावनेने, कर्ता करविताचे अस्तित्व अनेक युद्ध गाजवून छातीवर दहावीस मेडल्स मिरविणाऱ्या, […]
