एका बोटांचे कौशल्य
आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात. […]
आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात. […]
शायर हसन नईम म्हणतो , एक शायर था कि जागा रात भर सारे अहमक़ सो गये आराम से। मी गेल्यावर्षी वर्ल्डकपचा “भारत-पाकिस्तान” सामना पहायला मँचेस्टरला गेलो असतानाची गोष्ट. सामन्याच्या दिवशी पहाटे ३.३० वाजता ( अर्थात इंग्लंडच्या ) माझा मोबाईल खणाणला. “सामंतसाहेब , गुडमॉर्निंग”… …….वर्गावर आल्यावर आपल्या विद्यार्थ्यांना संबोधित करावे अशा प्रसन्न आवाजात प्रोफेसर अभिषेक निकम बोलत […]
अभिषेकची आणि माझी फारफारतर गेल्या दोन अडीच वर्षांतीलच ओळख असेल. तसं म्हंटले तर हा कालखंड काही फार मोठा मानता येणार नाही. अगदी नेमकं सांगायचे तर २०१८ सालच्या ठाणे हिरानंदानी मॅरेथॉनच्या आसपास आमची जुजबी ओळख झाली असावी. मी नुकतीच गोल्ड जिम जॉईन केली होती. एक शशी दळवी सोडला तर बाकी कोणालाच मी फारसा ओळखत नव्हतो. एकदा […]
नशिबाची मुळ व्याख्या समजावुन देण्याचा प्रयत्न… आपण मानव म्हणुन जन्मलो हेच आपलं मोठं नशिब आहे. करोडो रुपयाचे शरीर फुकट मिळाले… हे आपलं नशिब आहे.. फुकटात प्राणवायु मिळाला हे पण आपलं नशिब आहे… आभाळातून पडणारं पाणी हे पण आपलं नशिब आहे. […]
आदल्या दिवशी झालेल्या सामन्यांचे फक्त निकाल व स्कोअर्स दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात छापून आणणारा “स्कोअरर” व ” जाणता क्रीडापत्रकार” यांमधील फरक विविकंनी ठळक अक्षरात दृग्गोचर केला. राजकीय माकडचेष्टांनी आणि खुज्या व स्वार्थी पुढाऱ्यांच्या कुरघोडीच्या कारस्थानांनी भरलेले वर्तमानपत्राचे पहिले पान वाचण्यापेक्षा शेवटचे क्रीडापान आधी वाचण्याची सवय त्यांनी सुजाण वाचकांना लावली. […]
१९८० सालचा , कदाचित या शतकातील सर्वोत्तम , अजरामर असा , विम्बल्डनचा अंतिम फेरीचा सामना. बियाँर्न बोर्ग विरुद्ध जॉन मॅकॅन्रो. शायर अदम म्हणतो, दो मस्तियों के दौरे मे आया हुआ है दिल, लबपर किसी का नाम है, हाथों में जाम है । कुरळे केस डोळ्यावर येऊ नयेत म्हणून कपाळावर रुंद बँड लावलेल्या, देखण्या तरण्याबांड जॉनने , […]
मी दादरला ( सुखात ) रहात असताना ( गेले ते दिवस ) माझ्या आजीच्या माहेरच्या दूरच्या नात्यातील एक वृद्ध गृहस्थ आमच्या घरी आठवड्यातून एखादी चक्कर मारत असत. ते येताना ( न चुकता ) माझ्यासाठी १० पैशांची दोन पेपरमिट आणत. एकदा असेच त्यांनी दिलेले पेपरमीट चघळत, मी बेसावध असताना त्यांनी भागवत चंद्रशेखरप्रमाणे गुगली टाकला…. “बाळ , तू अभ्यासाव्यतिरिक्त काही अवांतर वाचन करतोस की नाही ?” […]
‘टीब्रेक’ नंतर गोलंदाजांनी आपला एण्ड बदलावा तसा विषय बदलून मी गाडी हळूच त्यांच्या करीअरकडे वळवतो. गाडी मला हव्या त्या स्टेशनवर ,इंग्लंडच्या १९६३/६४ च्या भारत दौऱ्यावर येऊन थांबते.पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला, १० जानेवारी ते १५ जानेवारी १९६४ दरम्यान खेळला गेलेला, मद्रासच्या नेहरु स्टेडियमवरचा कसोटी सामना. दुसऱ्या दिवसअखेर धावफलक ….. भारत..पहिला डाव….७ बाद ४५७ ( डाव घोषित…. बुधी […]
१९७८ साली मी पीएच. डी. पदवी मिळवली. त्यानंतर काही दिवसात मला मराठी विभागाचे पत्र आले. विभागाने वाड़्मयीन नियतकालिकांवर एक प्रकल्प घेतला होता. त्या आधी पुष्पा भावे यांनी ‘विविधज्ञानविस्तार’ या एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकावर पीएच. डी. पदवीकरिता प्रा. अ.का. प्रियोळकर यांच्याकडे नाव नोंदवले होते आणि त्या नियतकालिकामधील लेखांची सूचीही केली होती. […]
मी आणि व्ही.पी. सिंग आम्ही दोघेही संभ्रमावस्थेत असण्याचा तो १९८८-८९ चा मंतरलेला काळ होता. पंतप्रधान बनण्याच्या कल्पनेने ते आणि कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या आशेने मी ,असे आम्ही दोघेही पछाडलेले होतो. निर्माता, दिग्दर्शक आणि नायक बनण्याच्या कल्पनेने महेश कोठारे ( डँम इट ) ‘झपाटलेला’ होता जवळपास तसेच. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions