राज्यात पोलीसांच्या सशस्त्र मानवंदनेचा बहुमान असलेली केवळ दोन मंदिरे आहेत. पैकी पंढरपूरचे विठ्ठल देवस्थान हे पहिले आणि त्यानंतर रोह्यातील ग्रामदैवत असलेले धावीर महाराज हे दुसरे मंदिर होय. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी या मंदिरातून ग्रामप्रदक्षिणेसाठी निघणाऱ्या पालखीला पोलीसांकडून सशस्त्र मानवंदना दिली जाते. […]
गुजरात या राज्याची पहिली पायरी चढताच जणू एक नवा जग अनुभवायला मिळतो. गजबजलेल्या उद्योग-धंद्यांसोबत इथली परंपरा, संस्कृती, रंगीत सण आणि खाद्यसंस्कृती मनाला वेगळाच ठसा उमटवतात. खाद्यसंस्कृतीचा अनुभव गुजरात मध्ये पाऊल टाकताच आपले स्वागत एका ताटाने होते – ज्यात गोड, तिखट, आंबट अशा सगळ्या चवींचा सुंदर समतोल असतो. […]
1931 साली परळ ते शिवडी रस्ता बांधण्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले. त्या वेळेस एक अत्यंत आश्चर्यकारक अशी मूर्ती या उत्खननात सापडली. या मूर्तीचा निर्मितीकाळ हा इसवीसन पाचवे ते सहावे शतक असा आहे. म्हणजेच भारताचा सुवर्णकाळ म्हणून गणलेल्या गुप्त काळातील ही मूर्ती आहे. […]
आजचा लेख गोमय वर आहे. शेतकरी गायीचे शेण खत शेतात टाकतो त्या बदल्यात शेतातून अन्न रूपी लक्ष्मी प्रगट होते. शेतकरी आणि जनतेचे पोषण या अन्नावरच होते. बहुतेक हेच कारण असावे शरद ऋतुत नवीन अन्न आल्यावर गोवर्धन पूजेची परंपरा आपल्या देशात आहे. […]
‘द ईकॉनॉमिस्ट’चा हा आर्थिक अहवाल प्रामाणिक असल्याचे गृहीत धरले तर, भारताने डिजिटल पेमेंट व्यवहारात आणि ‘यूपीआय’ प्रणालीत मोठी मजल मारली असली तरी, अजून बऱ्याच सुधारणेला वाव निश्चितच आहे. भारतातील संबंधित यंत्रणेने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही चालू केली असेल अशी आशा बाळगूया ! […]
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले. […]
लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आत्मा म्हणजे भावनांची नाजूक छटा—प्रेम, विरह, भक्ती, आनंद किंवा देशप्रेम.प्रत्येक भावना त्यांच्या सुरेल आवाजातून श्रोत्यांच्या मनाला भिडते. लता मंगेशकर यांचं गाणं हे फक्त सुरावटींचं नव्हे तर भावविश्व उलगडणारं एक अविस्मरणीय अनुभवविश्व आहे. […]
भारतातील डिजिटल इकोसिस्टमची वाढ अनेक घटकांमुळे झाली आहे, ज्यात सरकारचा डिजिटलायझेशनवरचा जोर, इंटरनेट आणि स्मार्टफोनचा वाढलेला वापर आणि ई-कॉमर्सचा उदय यांचा समावेश आहे. भारत सरकार डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया सारख्या विविध उपक्रमांद्वारे डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरास सक्रियपणे प्रोत्साहन देत आहे. […]
लेह-लडाख, ज्याला Land of High Passes म्हणून ओळखलं जातं, हा भारताच्या उत्तरेतील अप्रतिम प्रदेश आहे. आयुष्यात एकदा तरी इथे जावं, अशी इच्छा अनेकांना असते. […]
या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढऱ्या फुलाची रुई (Calotropis procera). जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढऱ्या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढऱ्या फुलाच्या रुईच्या झाडाला ‘मंदार’ असेही नाव आहे. १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही. रुई हा हनुमान या देवतेचा आवडता वृक्ष आहे. […]