नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

लुटीचे नवे साधन

खासगीकरणातून बांधण्यात आलेल्या विविध रस्त्यांवर सुरू असलेल्या अन्याय्य टोलवसुलीच्या विरोधात आता वाहनधारकांनी दंड थोपटले आहेत. त्यामुळे या विषयाची नव्याने चर्चा सुरू झाली आहे. मुदत संपून गेल्यानंतरही टोलवसुली सुरू असल्याचे प्रकार यापुर्वी उघडकीस आले आहेत. त्यामुळे जनतेच्या आर्थिक लुटीचे नवे साधन बनलेल्या टोलबाबत सरकार फेरविचार करणार का हा खरा प्रश्न आहे.
[…]

पवित्र ते कुळ पावन तो देश

आता वेळ आलि आहे जगालाच नव्हे तर आपल्यातल्याच जातीय विषवल्ली जोपासनार्‍या जात्यांध नतद्रष्ट पैदासिंना दाखवून देणयाची.आता वेळ आली आहे जगाला एकता आणि शांततेचा संदेश देणयाची.आता वेळ आलि आहे जात,पात,धमर्,पंथापेक्षा माणुस धर्माचा जयजयकार करण्याची.अयोध्यातील वादग्रस्त जागेच्या हक्का बाबत न्यायदेवता उद्या निकाल देणे अपेक्षित आहे .हा निकाल म्हणजे भारतावर मोठे संकट आहे.भारतावर जणू काही अनूबाँम्ब फुटणार आहे.अश्याच असुरी अनंदात भारताचे काही शत्रू दात काढ़त असतिल.अशा नतद्रष्टांचे मनसुबे नेस्तनाबुत करण्या साठी त्यांची दात खीळी बसविण्यासाठी आता आम्ही भारतिय सज्ज झालो आहोत […]

अपघातांची मालिका कधी संपणार ?

ताज्या रस्ते अपघातांमध्ये ‘सारेगामापा’ स्पर्धेतील लक्षवेधी गायक राहुल सक्सेना, अपूर्वा गज्जला, गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रितम मते असे अनेक मान्यवर जखमी पडले. गणेशोत्सवाच्या धामधुमीत राज्यात रस्ते अपघातात अनेकांनी प्राण गमावले. अशा अपघातांना रस्त्यांची दुरवस्था, चालकांचा बेदरकारपणा कारणीभूत ठरत असला तरी अपघात टाळण्यासाठी प्रशासन फारसे काही करत नाही हेही खरेच. ही परिस्थिती कधी बदलणार? […]

ट्रिमेंडस्! फफफफफफफफंटास्टिक! मूर्तिकार मार्व्हलस मूर्तिकार

या मूर्तिकारांना श्री गणपती बाप्पा बनवितांना अनेक अडचणी येत असतात. आजकाल काही कृत्रीम साचे तयार करुन बाप्पांची निर्मिती केली जात असते पण विशालकाय बाप्पांच्या निर्मितीमागचे परिश्रम, ते तयार करतांना त्यांची निर्माण होणारी कल्पकता त्यात ते भरीत असलेले कलात्मक रंग अन् त्यावर फिरणार्‍या हळूवार कुंचब्यांचा अद्भूत अविष्कार हा सर्व विचार मनात आला की या मूर्तिकाराचा खरोखरच खुप अभिमान वाटतो त्यांच्या कल्पक बुध्दीला सॅल्यूट ठोकावा वाटतो. त्यांच्या कलेपूढं नतमस्तक व्हावसं वाटतं मग ती मूर्ति भारताच्या खेड्यातल्या मलकापूर पासून अमेरिकेतल्या न्यूयॉर्कपर्यंत पोहचलेल्या श्री गणेशाच्या मनमोहक मूर्त्या बनविणार्‍या सर्व मूर्तिकारांना ग्रेटच म्हणायला हवं. केवळ निखळ आनंद देण्याशिवाय त्यांच्या या कलेनं दुसरं काहीच दिलं नाही. सो थँक्स् टू ऑल गणपती बाप्पा मेकर्स अॅन्ड हिज आर्टस् !
[…]

अभिनंदन पा !

भारतीय चित्रपट सृष्टीचा इतिहास मोठा रंजक आहे पण त्याच बरोबर बदलत्या काळानुरुप स्वरुप पालटलेल्या भारतीय चित्रपट सृष्टीचा वर्तमान काळ देखील रंजक म्हणता येईल भारतीय चित्रपट सृष्टीने भारतीय रसिकांसाठी केवळ मनोरंजनाची कवाडे उघडली नाहीत तर समाज प्रबोधनाच्या कार्यासही हातभार लावला आहे.
[…]

ड्रॅगनचे विषारी फुत्कार

दक्षिण आशियामध्ये चीनला प्रभाव वाढवायचा आहे. त्यात त्यांना भारताचा अडथळा जाणवत आहे. दुसरीकडे जागतिक महासत्ता बनण्यासाठी त्यांची अमेरिकेशी स्पर्धा सुरू आहे. या दोन्ही आघाड्यांवर लढताना त्यांनी पाकिस्तानला हाताशी धरून भारताच्या सीमांवर अशांतता निर्माण करण्याचे धोरण ठेवले आहे. यात भारताचे बरेच नुकसान होत असून अमेरिका आणि चीन यांच्या वर्चस्वाच्या युद्धात भारत होरपळून निघत आहे.
[…]

परप्रकाशी ‘स्वयं’सेवी संस्था !

देशात ३३ लाख स्वयंसेवी संस्था कार्यरत असल्या तरी या संस्थांनी नफा कमावू नये या मूळ उद्देशालाच हरताळ फासलेला दिसून येतो. काही संस्था निःस्पृहपणे काम करत असल्या तरी अनेक संस्था कर वाचवणे, प्रवर्तकांसाठी सुविधा निर्माण करणे,शासनाचा निधी उकळणे अशा कामांसाठीच स्थापन केल्या जातात. या संस्थांनी खरोखरच काम केले तर देशापुढील अनेक समस्या चुटकीसरशी सुटतील. […]

फंडा ब्रँड एंडोर्समेंटचा

टीव्ही लावला की प्रत्येक वाहिनीवर एखादा तरी लोकप्रिय कलाकार किवा क्रिकेटपटू विशिष्ट ब्रँडची जाहिरात करताना दिसतो. सेलिब्रिटीजची हीच प्रसिद्धी उत्पादन लोकप्रिय करते. ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कलाकारांची अटीतटीची स्पर्धा सुरू असते. अशा जाहिरातबाजीचा फंडा अर्थविश्वात अनेक तरंग उमटवत असून त्यातून भले मोठे अर्थकारण आकाराला आले आहे. वलयांकित व्यक्तिमत्वाच्या या अर्थकारणाचा खास वेध.
[…]

गरज दोघांच्याही आत्मपरिक्षणाची

मराठी चित्रपटनिर्मितीचा वेग वाढत असतानाच आवश्यक त्या प्रमाणात चित्रपटगृहे उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली जाते.

मुख्यतः मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट ‘प्राईम टाईम’मध्ये प्रदर्शित केले जावेत अशी निर्मात्यांची अपेक्षा असते. मात्र, याबाबत

मल्टीप्लेक्सचालक सहकार्य करत नाहीत, असा सर्वसाधारण सूर आहे. या परिस्थितीत मल्टीप्लेक्सचालक आणि निर्माते या दोघांचेही आत्मपरिक्षण गरजेचे ठरते. […]

द ग्रेट डायमंड रॉबरी !

गोरेगावमधील एनसीसी मैदानावरील भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शनात ‘दालुमी हाँगकाँग’ कंपनीच्या स्टॉलवरून तब्बल ६.६ कोटी रूपयांचे हिरे चोरीला गेले. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चार परदेशी हिरेचोरांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. इंटरपोल पथक आणि दुबई पोलिसांच्या मदतीने १० तासांच्या आत मेक्सिकोच्या चारही हिरेचोरांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली. […]

1 … 237 238 239 240 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..