फंडा ब्रँड एंडोर्समेंटचा

टीव्ही लावला की प्रत्येक वाहिनीवर एखादा तरी लोकप्रिय कलाकार किवा क्रिकेटपटू विशिष्ट ब्रँडची जाहिरात करताना दिसतो. सेलिब्रिटीजची हीच प्रसिद्धी उत्पादन लोकप्रिय करते. ब्रँड एंडोर्समेंटमध्ये कलाकारांची अटीतटीची स्पर्धा सुरू असते. अशा जाहिरातबाजीचा फंडा अर्थविश्वात अनेक तरंग उमटवत असून त्यातून भले मोठे अर्थकारण आकाराला आले आहे. वलयांकित व्यक्तिमत्वाच्या या अर्थकारणाचा खास वेध.


दिवसभरात कधीही टीव्ही लावला तरी आपले आवडते कलाकार एखाद्या उत्पादनाची जाहिरात करताना दिसतात. क्रिकेटचा सामना असो, एखादा चित्रपट किवा मालिका, कलाकारांच्या टीव्हीवर झळकण्यात अजिबात खंड पडत नाही. आपणही अगदी उत्सुकतेने आणि मनापासून ती जाहिरात पाहतो आणि हे उत्पादन वापरून पाहिले पाहिजे असा विचार कुठेतरी नकळतपणे मनात डोकावतो. इथेच ब्रँड एंडोर्समेंटला खर्‍या अर्थाने यश मिळते. कलाकारांनी तो ब्रँड वापरला म्हणजे आपणही तो वापरून पाहायला हवा असा ग्राहकांवर प्रभाव पडला की उत्पादकांचा आणि सेलिब्रिटींचा फायदाच होतो. त्यातही तो अभिनेता किवा अभिनेत्री खूप लोकप्रिय असेल तर ब्रँडचा जास्त नफा होतो. सेलिब्रिटींच्या ब्रँड एंडोर्समेंटमध्ये सतत स्पर्धा सुरू असते. सध्या या स्पर्धेमध्ये करिनाने बाजी मारली आहे. फिल्मफेअर मासिकामध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार जाहिरातविश्वामध्ये करिना ही सर्वात महागडी आणि ‘वाँटेड’ सेलिब्रिटी आहे. सध्या ती गीतांजली, एअरटेल, कुरकुरे अशा उत्पादनांच्या जाहिराती करते. तज्ज्ञांच्या मते अभिनेते-अभिनेत्रींचा एखादा चित्रपट हिट झाला की ते प्रसिद्धीच्या झोतात येतात. चित्रपटप्रेमींच्या तोंडावर सतत त्यांचेच नाव असते. याचा जाहिरात उत्पादनांना फायदा होतो. त्याचप्रमाणे कलाकारांचे व्यक्तिमत्त्व, लूक्स यावरही त्यांची आणि त्यांच्या ब्रँडची लोकप्रियता ठरते. सेलिब्रिटी आणि त्यांच्या जाहिराती हे समीकरण समजून घ्यायचे असेल तर सुरूवातीला भारतातले ब्रँड माकर्ेट समजून घ्यावे लागेल.


हा लेख मराठीसृष्टी (www.marathisrushti.com) या वेबसाईटवर प्रकाशित झाला आहे. लेख शेअर करायचा असल्यास लेखकाच्या नावासह शेवटपर्यंत संपूर्णपणे शेअर करावा...

सेलिब्रिटीची लोकप्रियता तिच्या व्यवसायातील यश आणि व्यक्तिमत्त्व यावर अवलंबून असते. एकमेकांवर मात करण्याचे सेलिब्रिटजचे प्रयत्न सतत सुरू असतात. प्रत्येक सेलिब्रिटीची ब्रँड व्हॅल्यूही ठरलेली असते. या ब्रँड व्हॅल्यूप्रमाणे सेलिब्रिटीजची यादी करायची झाली तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आघाडीवर असणार यात शंकाच नाही. तो सध्या टायटन, कोकाकोला, सॅमसंग, स्मार्ट चिप्स, टाटा स्काय अशा उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये झळकतो. आमीरची ब्रँड व्हॅल्यू मोठी आहे. त्याला एका जाहिरातीसाठी १२ ते १४ कोटी रूपये मिळतात. त्यानंतर क्रमांक लागतो बॉलीवूडचा किंग खान शाहरुखचा. शाहरुखला एका जाहिरातीसाठी आठ ते दहा कोटी रूपये मिळतात.

दोन वर्षांपूर्वी खिजगणतीतही नसलेला रणबीर कपूर ‘अजब प्रेम की गजब कहानी’ मुळे प्रकाशझोतात आला आणि आता ब्रँड एन्डोर्समेंटमध्ये त्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या लोकप्रियतेकडे उत्पादन कंपन्यांचे लक्ष वेधले गेले आणि जाहिरातींसाठी त्याची मागणी वाढली. आता रणबीरला साईन करण्यासाठी कंपन्यांची रांग लागत आहे. पॅनासोनिक, पेप्सी, निस्सान अशा उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये रणबीरने हजेरी लावली आहे. रणबीरने चक्क बॉलीवूडच्या अॅक्शन हिरो अक्षयकुमारलाही मागे टाकले आहे. रणबीरला एका जाहिरातीसाठी आठ ते नऊ कोटी तर अक्षयला साडेसहा ते सात कोटी रूपये मिळतात. त्यांच्यापाठोपाठ हृतिकने बाजी मारली आहे. हृतिकचे नृत्य, व्यक्तिमत्त्व सर्वांना भुरळ घालणारे आहे. त्यामुळे हृतिकने अमिताभवर सरशी केली आहे. तो जाहिरातींसाठी पाच कोटी तर अमिताभ तीन ते चार कोटी रूपये घेतो. अभिनेत्यांच्या यादीत शाहिद आणि सैफ अली खानचा क्रमांक शेवटी लागतो. करिनामुळे सैफचं नाव चर्चेत राहत असलं तरी त्याची प्रेक्षकांवरची जादू आता कमी झाली आहे याचंच तर हे प्रत्यंतर नसेल ?
ब्रँड एंडॉर्समेंटमध्ये अभिनेत्रींची स्पर्धा अगदी अटीतटीची आहे. झिरो फिगरची संकल्पना लोकप्रिय करणार्‍या करीनाने इतर अभिनेत्रींना मागे टाकत बाजी मारली आहे. सोनी लॅपटॉपची ती ब्रँड अम्बेसिडर आहे. ‘महागड्या’ करिनाचं बजेटही घसघशीत आहे. कंपन्यांकडून ती एकेका जाहिरातीसाठी मजबूत रक्कम घेते. दुसरीकडे ‘कानामागून आली…’ असं म्हटलं जाणारी कतरिनाही करिनाइतकीच ‘मौल्यवान’ आहे. उंचपुरी नाजूक कतरिना पॅनासोनिक, नक्षत्र, लक्स, व्हीट, स्पाईस, ओले, स्लाईसची ब्रँड एंडोर्समेंट करते. ऐश्वर्याला मागे टाकत कतरिनाने ‘नक्षत्र’ची जाहिरात पटकावली होती. विश्वसुंदरी म्हणवल्या जाणार्‍या ऐश्वर्याकडे सध्या ली ओरिअल, लक्स असे ब्रँड आहेत.

करिना आणि कतरिनाला स्पर्धा आहे ती प्रियांका चोप्रा, बिपाशा बासू आणि दीपिका पदुकोणची. या अभिनेत्री एकेका जाहिरातीमागे दोन ते तीन कोटी रूपये घेतात. प्रियांका चोप्रा लिव्हाईस, नोकिया, अस्मि ज्वेलरी, हिरो होंडा या उत्पादनांच्या जाहिराती करत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आय हेट लव्ह स्टोरीज’, ‘आयेशा’ यांसारख्या चित्रपटांमधून चांगले यश मिळवलेल्या सोनम कपूरची सध्या कोला ब्रँडसाठी निवड झाली आहे. त्यासाठी तिने कंपनीशी तीन कोटी रूपयांचा करार केला आहे. सध्या मोठमोठे ब्रँड्स उगवत्या कलाकारांना प्राधान्य देत आहेत. ऐश्वर्या बॉलीवूडमध्ये आली तेव्हा हा ब्रँड तिच्याकडे होता. इमरान खान, कल्की कोचलीनबद्दलही असेच घडत आहे. जाहिरातविश्वातील त्यांची मागणी वाढली आहे.

जाहिरात उत्पादनांच्या बाबतीत बॉलीवूड कलाकारांना टक्कर आहे क्रिकेटपटुंची. त्यातही धोनीने कडी केली आहे. त्याने दोन वर्षांसाठी दोनशे कोटी रूपयांचा करार केला आहे. याबाबतीत त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत तो सेलिब्रिटींच्या यादीत सहाव्या क्रमांकावर असला तरी प्रत्येक जाहिरातीसाठी त्याला पाच ते सहा कोटी रूपये मिळतात. २००९ मध्ये टीव्हीवर सर्वात जास्त वेळा टीव्हीवर झळकलेल्या सेलिब्रिटींमध्ये माहीचा पहिला क्रमांक लागतो. माहीच्या एंडोर्समेंटचं सर्व व्यवस्थापन हृती स्पोर्टस ही अरुण पांडेची कंपनी पाहते. अरूण पांडे हा धोनीचा जुना मित्र आणि ब्रँड मॅनेजर आहे. तो म्हणतो, ‘माही दिल से बात करता है’ आणि म्हणूनच माहीचं म्हणणं चाहत्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतं. सध्या धोनीकडे एअरसेल, बिग बझार, सेलो, व्हिडिओकॉन, दैनिक भास्कर, रिबॉक, एक्साईड बॅटरीज, टीव्हीएस मोटर, पार्ले, मॅक्स मोबाईल, डाबर च्यवनप्राश, टायटन सोनाटा असे मोठे ब्रँड आहेत. सचिनकडेही अव्हिवा लाईफ इन्श्युरन्स, पेप्सी, एमआरएफ, फिलिप्स असे लोकप्रिय ब्रँड आहेत. त्याला प्रत्येक जाहिरातीसाठी साडेचार ते पाच कोटी रूपये मिळतात. सचिनच्या पाठोपाठ युवराजने बाजी मारली आहे. थोडक्यात काय तर, आजच्या सेलिब्रिटीजची ‘स्टार व्हॅल्यू’ केवळ अभिनय किंवा क्रिकेटमधील परफॉर्मन्सप्रमाणेच त्यांच्याकडे असणार्‍या ब्रँड्समधूनही कळते.


सेलिब्रिटी – आमीर खान
ब्रँड्स – टायटन, कोकाकोला, सॅमसंग, स्मार्ट चिप्स, टाटा स्काय
प्रति ब्रँड व्हॅल्यू – १२ ते १४ कोटी रू.


सेलिब्रिटी – शाहरूख खान
ब्रँड्स – डिश टीव्ही
प्रति ब्रँड व्हॅल्यू –८ ते १० कोटी रू.


सेलिब्रिटी – रणबीर कपूर
ब्रँड्स – पॅनासोनिक, पेप्सी, निस्सान
प्रति ब्रँड व्हॅल्यू – ७ ते ८ कोटी


सेलिब्रिटी – अक्षयकुमार
ब्रँड्स – एलजी, मायक्रोमॅक्स , ग्रासिम, डॉलर बनियन
प्रति ब्रँड व्हॅल्यू – साडेसहा ते ७ कोटी


सेलिब्रिटी – हृतिक रोशन
ब्रँड्स – रिलायन्स, प्रोव्होग, सोनी एरिक्सन, हाईड अँड सिक
पाच कोटी


सेलिब्रिटी – अमिताभ बच्चन
ब्रँड्स – डाबर च्यवनप्राश, एअरटेल चॅम्पियन लीग, हाजमोला
प्रति ब्रँड व्हॅल्यू – चार कोटी


सेलिब्रिटी – करीना कपूर
ब्रँड्स – गीतांजली, एअरटेल, कुरकुरे, सोनी
प्रति ब्रँड व्हॅल्यू – चार कोटी


सेलिब्रिटी – कतरिना कैफ
ब्रँड्स – पॅनासोनिक, नक्षत्र, लक्स, व्हीट, स्पाईस, ओले, स्लाईस
प्रति ब्रँड व्हॅल्यू – साडेतीन कोटी


सेलिब्रिटी – ऐश्वर्या राय
ब्रँड्स – ली ओरिअल, लक्स
प्रति ब्रँड व्हॅल्यू – तीन कोटी


सेलिब्रिटी – प्रियांका चोप्रा
ब्रँड्स – लिव्हाईस, नोकिया, अस्मि ज्वेलरी, हिरो होंडा
प्रति ब्रँड व्हॅल्यू – दोन-तीन कोटी


सेलिब्रिटी – महेंद्रसिग धोनी
ब्रँड्स – एअरसेल, बिग बझार, दैनिक भास्कर, रिबॉक
प्रति ब्रँड व्हॅल्यू – चार-पाच कोटी


सेलिब्रिटी – सचिन तेंडुलकर
ब्रँड्स – पेप्सी, एमआरएफ, फिलिप्स
प्रति ब्रँड व्हॅल्यू – चार-पाच कोटी


— ऋजुता जोशी

(अद्वैत फीचर्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..