असा प्रश्न विचारला तर लोक पटकन सांगतील, अहो त्यात काय एवढे कठीण? मोरयाचा एकदा तुटलेला असतो म्हणून त्यांना एकदंत म्हणतात. पण हे बरोबर आहे का? इतका वरपांगी अर्थ त्यात असेल का? जर वर्णन केल्याप्रमाणे मोरयाचा एक दात तुटला, अर्धा आहे तर मग त्याला दीडदंत म्हणायला नको का? एकदंत कसा? […]
कुणास ठाऊक कधी , कुठे व कसे : पण सगळे सीता निवास—राम निवास—लक्ष्मण निवास , प्रगति निवास , लक्ष्मी निवास , दत्त निवास वाले सगळे शेजारी ….. मला भेटतील , गेला बाजार हा माझा लेख वाचतील आणि माझ्यासारखीच त्यांनाही टिळक नगर आणि आसपास चा गणेशोत्सव आठवेल आणि हा वेडाविंद्रा उदय पण आठवेल ! […]
देशातील अनेक व्यापारी संघटनांनी चीनवर चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे, मात्र ते पुरेसे नाही ही चळवळ देशव्यापी झाली पाहिजे. ज्यावेळेस चीनला लक्षात आले कि भारतीय जनता त्यांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांचा व्यापार कमी होत आहे, त्या वेळेला त्यांनी डोकलाम मधून माघार घेण्याचे ठरवले. म्हणजेच डोकलाम मधून माघारीचे एक महत्वाचे कारण होते चीनी मालावर बहिष्कार. हे अस्त्र आपण पुन्हा एकदा वापरले पाहिजे. […]
देशाच्या सुरक्षेचा दर्जा वाढवण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण केले जाईल. स्वतंत्र भारताच्या सुरक्षेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे पाऊल आहे. देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल, हवाईदल ही तीन कटिबद्ध आहेत. ही तीनही दले आपापल्या पद्धतीने काम करतात. परंतू बाह्य सुरक्षेची आव्हाने इतक्या प्रचंड वेगाने वाढत आहेत त्यामुळे संरक्षण दलाच्या तीनही दलांनी एकत्र काम करण्याशिवाय कोणताच पर्याय नाही. […]
लेखक : शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : मानवाने, आपल्या कमाईचा काही ठराविक एक भाग. ईश्र्वराच्या साक्षीने म्हणजेच परमेश्वराच्या समोर देवाला नैवेद्य म्हणून अर्पण करून, इदम् न मम . या उक्तप्रमाणे इतरांना वाटून टाकणे. यालाच खाऱ्या अर्थाने प्रसाद म्हणतात. […]
लेखक : शैलेश सो. महाजन (आम्ही साहित्यिक ग्रुप) : दर वर्षी भाद्रपद चतुर्थीला आपण गणपती आणतो. आणि म्हणतो “घरोघरी गणपती आले.” किंवा “आमच्या घरी गणपती आला.” किंवा “आमच्या घरी गणपती असतो.” नक्की काय आहे हे? […]
हेच ज्यांचे आनन ते गजानन. आनन म्हणजे तो़ड अर्थात ओळख. म्हणजे निर्गुण निराकार अनादि-अनंत परब्रम्ह हीच ज्यांची ओळख आहे त्यांना गजानन असे म्हणतात. “गजमस्तक” चा हाच अर्थ असतो. […]
भाद्रपद चतुर्थी चा अवतार शिवपार्वती यांच्या घरी झाला असल्याने त्या चतुर्थीला स्वर्गाची चतुर्थी तर विनायक अवतार महर्षी कश्यपने आणि अदितीच्या घरी झाला असल्याने या चतुर्थीला पृथ्वीवरची चतुर्थी म्हणतात. अशा या विनायक अवताराची जन्मतिथी आहे माघ शुद्ध चतुर्थी. […]
श्रावण शुद्ध चतुर्थी ते भाद्रपद शुद्ध चतुर्थी असा एक महिना तिने पार्थिव गणेश पूजन केले. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला मध्याह्न समयी या पार्थिव गणेशमूर्ती तूनच प्रकटलेला भगवान गणेशांचा अवतार म्हणजे श्रीमयुरेश्वर. या अवतारात भगवान सहा हातांचे होते. मोरावर बसलेले असल्याने त्यांना मयुरेश्वर असे म्हणतात. […]
श्री गणेशांबद्दल आपल्या मनात जे प्रश्न येतात त्यापैकी हा एक महत्त्वाचा प्रश्न. खरेच आहे एखाद्या महानगरातल्या सगळ्या माता- भगिनींच्या अंगावर मिळून सुद्धा इतका मळ असूच शकत नाही. मग जगज्जननी त्रिपुरसुंदरी पार्वती इतकी अस्वच्छ कशी असेल? […]