नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

‘कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर

साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला… […]

स्मिता पाटील – भारतीय चित्रपटांची अनभिषिक्त महाराणी

वयाच्या विसाव्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या स्मिता पाटील जवळजवळ ७५ चित्रपटांच्या अनभिषिक्त महाराणी ठरल्या होत्या. १९८४ मध्ये त्या आंतरराष्ट्रीय नायिका बनल्या. १९८२ साली आला जब्बार पटेलांचा ‘उंबरठा’ त्यात तिने ‘सुलभा महाजन’ ची साकारलेली भूमिका अजूनही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये बिनतोड आहे. सार्वजनिक जीवनातही ती महिलांविषयक काम करणाऱ्या अनेक संस्थांशी प्रत्यक्ष पण जोडली गेली होती. त्यामुळे उंबरठा मधल्या तिने साकारलेली भूमिका अधिकच वास्तवदर्शी वाटते. […]

ऑस्ट्रेलियातील अनोखे सिडनी ऑपेरा हाऊस

ऑस्ट्रेलिया! हे नाव घेताच या देशात जाणार्‍यांची इच्छाशक्ति पुन्हा जागृत झाली नाही तर आश्चर्य. असेही तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की एका क्लिकवर आपण सहज जगाची सफर करु शकतो पण अशातही ज्या गोष्टींची प्रत्यक्षात मजा लुटायची असते ती त्या ठिकाणी जाऊनच. मग ती खाद्यसंस्कृती असो किंवा एखादी वैशिष्ट्यपूर्ण जागा. ऑस्ट्रेलिया देशातल्या सिडनी शहरात असलेले “सिडनी ऑपेरा हाऊस” हेे त्यापैकीच एक. […]

शिक्षणाचे मानसशास्त्र: SMART Objectives = सामोसा विका!

माझी गाडी SMART Objectives वर कशी आली? वेळ चांगला जावा म्हणून नवीन शैक्षणिक धोरण चक्क पूर्ण वाचले (कोरोना काळात …!). त्यातल्या एका परिच्छेदाने लक्ष वेधले. The purpose of the education system is to develop good human beings capable of rational thought and action, possessing compassion and empathy, courage and resilience, scientific temper and creative imagination, with […]

शिक्षणाचे मानसशास्त्र – प्रश्नोपचाराचा उपद्व्याप = प्रश्नोपद्व्याप

To लिही, or not to लिही! That is the प्रश्न! ‘प्रश्न’ या विषयावर लिहिण्यासारखे काही आहे का – प्रश्नांवरचा हा प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. आणि म्हणूनच हा प्रश्नोपद्व्याप! सुरवात प्रश्नोत्तरानेच करू. प्रश्न विचारणारा मी डॉ. जेकिल आणि उत्तर देणार मीच मिस्टर हाईड. […]

निर्वाणषटक (आत्मषटक) मराठी अर्थासह

श्रीमद् आदिशंकराचार्यांना एकदा त्यांच्या गुरूंनी विचारले, “तू कोण आहेस?” त्यावर त्यांनी दिलेले उत्तर म्हणजे हे अर्थगर्भ षटक होय. सहा श्लोकांचे हे काव्य अद्वैत वादाचा गाभाच म्हणावयास प्रत्यवाय नसावा. त्याला ‘निर्वाणषटकम्’ किंवा ‘आत्मषटकम्’ असेही म्हणतात. या स्तोत्रात आचार्यांनी सामान्य माणसाच्या मनातील अहंभाव व स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रथम मी (म्हणजे आत्मा) काय नाही हे सांगून शेबटी थोडक्यात मी कोण आहे ते मांडले आहे. […]

प्रिंस एडवर्ड थिएटर, लंडन

लंडन! सगळ्यांच्या मनात घर करुन राहिलेलं शहर. जेवढी इथे आर्थिक सुबत्ता आहे तेवढीच कलाप्रेमींची संख्या मोठी आहे. युनायटेड किंगडमच्या या भव्य आर्थिक राजधानीत जर थिएटर नसेल तर तो या राजबिंड्या राजधानीचा फार मोठा अपमान ठरेल. “प्रिंस एडवर्ड थिएटर”! नावातच प्रिंस आहे तर मग थिएटर किती भव्य आणि देखणं असेल हे तुमच्या ध्यानात आलेच असेल. […]

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे

यशवंतराव चव्हाण हे नाट्यगृह पुण्यातील सध्या सगळ्यात जोमाने विकसित होण्यार्‍या कोथरुड विभागात आहे. नाट्यगृहाचा वापर हा नाटकांपुरता मर्यादित नसून येथे अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक, चर्चासत्रांचे कार्यक्रमदेखील आयोजित केले जातात. नाट्यगृहाची आसन क्षमता ८३९ आसनांची असून त्यातील ४३६ प्रेक्षागृहाच्या खालील भागात तर उर्वरित १५७ आसनं बाल्कनीत आहेत. मुख्य रंगमंचाचा आकार ६०’ * ४०’ असून त्यातील ३०’ * २०’ इतकाच भाग वास्तविकपणे वापरण्यास मिळतो. […]

मुंबईतला १४० वर्षे जुना कॅपिटॉल सिनेमा

आजही अशा वास्तू आहेत ज्या शेकडो वर्षं जुन्या आहेत. त्या सध्या जरी बंद स्थितीत असल्या तरी त्या मुंबईकरांच्या मनात कायम राज्य करुन आहेत. थोडीथोडकी नाही पूर्ण १४० वर्षं जुनी असलेली वास्तू म्हणजेच “कॅपिटॉल सिनेमा” या वास्तूचं एक विशेष स्थान मुंबईकरांच्या मनात होतं, आजही आहे आणि भविष्यातही ते कायमच राहिल. […]

मुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा

मुंबईत आज अशा अनेक वास्तू आहेत ज्यांनी मुंबईला उभी रहाताना पाहिलेलं आहे त्यापैकीच एक वास्तू म्हणजे “मेट्रो सिनेमा”. आज जी वास्तू मेट्रो आयनॉक्स म्हणून ओळखली जाते तिच वास्तू  जुन्या काळात मेट्रो सिनेमा म्हणून प्रसिद्ध होती. […]

1 142 143 144 145 146 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..