नवीन लेखन...

मराठी संस्कृती विषयक लेख

हिंन्दू संस्कृतीतील देवाचा उगम आणि शंकर-पार्वती-गणपती

विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..! […]

ऋषिपंचमी

ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे,त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी,अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने,तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. […]

गणेश.. तिनच अक्षरांचं वैशिष्ट्य

‘गणेश’ हे नांव तयार करणारी मराठी वर्णमालेतील ‘ग’, ‘ण’ आणि ‘श’ ही तीन अक्षरं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या तिनही अक्षरांमध्ये त्यांचा काना स्वतंत्र, म्हणजे मुख्य अक्षरापासून किंचित अंतर राखून अदबीने उभा आहे. ह्या तिनच अक्षरांचं हे वैशिष्ट्य. ह्या तीन अक्षरांव्यतिरिक्त बाकीची अक्षरं कान्याचा आधार घेऊन किंवा कान्यात गुरफटून किंवा ‘ळ’सारखी काना(कणा)हीन होऊन उभी आहेत.. गणेश नांव […]

नाग पंचमी : एक चिंतन

श्रावणाच्या महिन्यात आपण नाग पंचमीचा सण साजरा करतो. हल्लीच्या काळीं त्या उत्सवासाठी सर्प-नाग यांना कसें वागविलें जातें, हा एक सामाजिक तसेंच animal-rights चा विषय आहे. तो महत्वाचा आहेच, पण प्रस्तुत लेखात आपण तिकडे वळणार नाहीं आहोत. या लेखाचा focus आहे, या सणामागच्या पार्श्वभूमीसंबंधीची चर्चा करणे, हा. […]

नैवेद्याची परंपरा

श्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे. […]

आज आहे माझी एकादशी

सुनबाई, आज आहे माझी एकादशी काहीबाही खायला देशिल नाहीतर फटदिशी. तुमच्या भाषेत सांगायचं तर आज माझा आहे फास्ट, लंच डिनर घेणार नाही, नाही करणार ब्रेकफास्ट. मसाल्याचं दूध कर केशर वेलची घालून, बदाम काजू थोडे लाव त्यावर वाटून. वर घाल त्याच्या जाडसर मलई, साधं दूध मला बिल्कूल आवडत नाही. फराळासाठी काही साधंसच कर, फळं चार कापून दे […]

केळीच्या पानावर जेवण का करावे ? 

नैवेद्य दाखवायचा असो , सवाष्ण बोलवायची असो व ब्राम्हणांना जेवायला बोलावले असो. याप्रसंगी भोजन केळीच्या पानवर वाढण्याची प्रथा आपल्याकडे आहे. या प्रथेमागे धार्मिक अधिष्ठान तर आहेच शिवाय वैद्यकीय कारणेही आहेत. जाणून घेऊया त्याविषयी …. […]

नमस्कार का करावा ?

लहान मुलांना मोठ्यांच्या पाया पडण्याचे नियम आणि संस्कार दिले जातात. पण इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की त्या व्यक्तींचेच चरणस्पर्श केले पाहिजे ज्यांचे आचरण योग्य असेल. […]

सत्कार, शाल आणि श्रीफळ

कोणत्याही मोठ्या व्यक्तीचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रात तरी नक्की आहे. कदाचित देशात इतरत्रही असावी असं टिव्हीवरील इतर प्रांतात विविध व्यक्तींच्या केल्या जाणाऱ्या सत्कारांच्या क्लिप्स पाहून जाणवतं. मोठी व्यक्ती म्हणजे, ज्या व्यक्तींनी समाजात समाजासाठी काही भरीव कार्य केलंय अशा व्यक्ती. मग त्या व्यक्तीचं ते कार्य समाजसेवेचं असो वा शिक्षण […]

पावने-रावळे

आपल्याकडे अतिथीला देव माणून पुजण्याची पद्धत होतीच, ग्रामिण भागात अजुनही शिल्लक असेल. पावने म्हणजे रावळे, हेच ‘अतिथि देवो भव’ […]

1 40 41 42 43 44 70
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..