नैवेद्याची परंपरा

एरवी आपल्या सण परंपरेला न मानणारी मंडळी,’आखाडी’ so called ‘गटारी’ अगदी न चुकता साजरी करतात. असा थोडासा ‘broad minded’ विचार आपल्या सर्व सणांच्या बाबतीत झाला तर,किती छान होईल ना..!!आता हेच बघा ना,श्रावण सुरु होतोय,पाठोपाठ गणपती,नवरात्र,दिवाळी अशी सणांची रांगच लागते. या सगळ्यात महत्वाचा असतो तो ‘नैवेद्य’.. फक्त देवाला दाखवायला लागतो म्हणून असतो का हा ‘नैवेद्य?’.. नाही,खरतरं या ‘नैवेद्य’ करण्यामागे अनेक गोष्टींची योजना आपल्या परंपरेत आहे.

माझ्या मैत्रीणी यावर म्हणतील “काहीही हं, तो नैवेद्य करायचा म्हणजे एक event च असतो बाई!!,सरळ ऑर्डर देऊन करुन आणतो”..

पण,मैत्रीणिंनो,आपल्या संस्कृतीत नैवेद्याला अनन्यसाधारण महत्व आहे. देवाला अन्नस्वरुपात अर्पण केलेला ‘नैवेद्य’ आपण प्रसाद म्हणून खातो. ऋतू नुसार सण व त्या सणांचे व देवांचे विशिष्ठ नैवेद्य हे ठरलेले असतात. ह्याचा संबंध नैवेद्य-आरोग्य असा १००% आहेच. पण माझ्यामते घरात ‘स्वतः नैवेद्य बनवणे’ ही एक आपल्या संस्कृतीने आपल्यातील चांगल्या Qualities निर्माण करण्यासाठी दिलेली activity वाटते मला. कशी काय?..बघा

१. नैवेद्य करताना अगदी सोवळ्यांत नसलं तरी शुचिर्भूत होऊन नैवेद्य करावा लागतो.इथे Hygiene आलं.

२. नैवेद्याला काय काय लागेल ते पक्क माहिती असावं लागतं,पदार्थांचे प्रमाण काटेकोर ठेवावे लागते,कारण चव पहायची मुभा नसते. नैवेद्य हा ठराविक वेळेतच तयार करावा लागतो..Accuracy and Time management

३. नैवेद्य करताना करणाऱ्यांना खायची मुभा नसतेच,पण घरातल्या इतर मंडळींनाही स्वतः च्या मनावर प्रचंड ताबा ठेवावा लागतो. फोडणीचे खमंग वास,पुरणपोळीचा खरपूस वास रसनेंद्रियास उत्तेजित करत असताना हा control खूप काही शिकवून जातो..कारण नैवेद्य दाखविल्याशिवाय खायचे नाही हा दंडक आहे ना! बघा ‘संयम'(Patience,self restraint) हा अत्यंत महत्वाचा गुण नैवेद्याने develop होतो. जो आजकाल खूप कमी होत चाललाय.

४. नैवेद्य हा नेहमी सात्विक,सुंदर च होतो. कारण करणाऱ्याने अत्यंत मनापासून,एकाग्रतेने,‌श्रध्देने तो बनवलेला असतो. Concentration,devotion झालं ना develop..

५. नैवेद्याचे ताट वाढताना ते सुध्दा एक ठराविक पध्दतीने वाढले जाते.डावी-उजवी बाजू नीटनेटकेपणाने वाढणे हे कोणत्या कलेपेक्षा कमी नाही. ताटाच्या बाजूला रांगोळी साक्षात कलाविष्कार!!

६. नैवेद्यातून आरोग्य जपल्या जातंच कारणं तो सर्व रसात्मक,भक्ष्य,भोज्य,चूष्य,लेह्य या स्वरुपातील ही असतो. नैवेद्य दाखवताना आपण जे “ॐ प्राणाय स्वाहा,ॐअपानाय स्वाहा…’ हे म्हणतो,ते काय आहे? तर प्राण,अपान,उदान,व्यान,समान हे शरीरातील कार्यकारी वायू आहेत,ते त्या अन्नाचे ग्रहण,पचन,अभिसारण,उत्सर्जन करण्यास आपल्याला सहाय्यभूत ठरतात. त्यांचे स्मरण करुन देवाला नैवेद्य दाखवल्या जातो.

अर्थात,मैत्रीणींनो विकत,आयता आणून दाखवलेला नैवेद्य हे सगळे skills,qualities आपल्यात कसे बरे develop करेल?? but,i know नैवेद्य करायला वेळ कुठाय?? हो,ना?मग,सगळं ताट नको निदान त्यांतील एकतरी पदार्थ ‘नैवेद्य’ म्हणून करायला काय हरकत आहे? साधी खिर करा पण स्वतः करा. आपल्या छोट्यांना शाळेत Activities देऊन वेगवेगळी skills develop केली जातात. पण आपली संस्कृती ही आपल्याला असे task देत असते. तिचा आपण आपल्यातील qualities improve करण्यासाठी नक्कीच उपयोग केला पाहिजे..

— डॉ.सौ.सुमेधा आपटे-रानडे 

(आरोग्यूत या WhatsApp ग्रुपमधून साभार) 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 116 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…