नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

मन कि बात – ओळख

नुकतेच दहावी-बारावीचे रिझल्ट लागले. दरवर्षी याच महिन्यात थोडेसे पुढं-मागे होऊन लागतात. निकाल पास अथवा नापास असाच लागणार असला, तरी उत्सुकता, हुरहूर, टेन्शन असं सारं काही होतंच. अर्थात मी सांगतोय ते पूर्वीचं, तेंव्हा पास-नापास येवढ्या दोनच कॅटेगरी असायच्या. बाळंत होणाऱ्या बाईला कशा मुलगी किंवा मुलगा होणार या दोनच शक्यता असतात, तरी काय ती उत्सुकता असते सर्वांना, तसंच […]

ती बाई

येता जाता रस्त्यावरच्या कुठल्याही कुत्र्या-मांजराच्या डोक्यावर हात फिरवून, त्याला एखादं बिस्कीट भरवणारा मी, एका जीवंत माणसाशी बोलायला का बिचकतो, हे माझं मलाच कळत नाही. कदाचित महसत्ता होऊ घातलेल्या देशाचा, पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्याच्या विवंचनेत असलेला प्रतिष्ठीत नागरीक असणं, हे मला तसं करू देत नसावं, कुणास ठावूक? […]

माय – लेक

मुली कशा खूप बडबड करतात, हक्काने राग, लोभ, प्रेम व्यक्त करतात. पण मुलांना हे जमत नाही तर आपण त्यांना गृहितच धरू लागतो ……म्हणून मुलग्यांचं कौतुक करण्यासाठी ही खास पोस्ट. […]

मॅडम

मॅडम , तुम्ही फार छान दिसता जितक्या छान दिसता त्यापेक्षाही छान तुम्ही हसता मॅडम , तुमचंही एक घर असेल नवरा असेल , सासू असेल , सासरा असेल , दीर असेल घरात सारखी पीरपीर असेल जाऊ बाई जोरात असतील नणंद बाई तोऱ्यात असतील तुम्हाला छोटी छोटी मुलं असतील तुमच्या बागेत फुलं असतील सर्वांसाठी तुम्ही अहोरात्र झिजता आणि […]

आजचे अवघडातले शिक्षण

हल्ली आपल्याकडे खाजगी शाळा शाळांची संख्या झपाटयाने वाढत आहे. पालक वर्ग मुलांना खाजगी शाळेमधेच प्रवेश देत आहेत .पालक आपल्या पाल्याचे भविष्य चांगले  घडावे या साठी नेहमीच प्रयत्नात असतो. तांच्या अपेक्षांना नेहमीच ह्या शाळा खऱ्या उतरतील ह्याची शाश्वती वाटत नाही. दुसरीकडे सरकारी शाळाची अवस्था अतिशय बिकट आहे. अशी एकंदरीत परिस्थिती असताना भारताचे भविष्य घडत आहे का बिघडत […]

अधांतरी व तकलादू मनोभूमिका असणारी मने

मनाच्या खेळात त्याचा आवडता भाग असतो कोणतीही गोष्ट अधांतरी ठेवण्याचा. अधांतरी असतात विचारांची आंदोलने आणि निर्णय प्रक्रिया. एखाद्या अगदी क्षुल्लक विचारला विनाकारण खूप मोठे बनवायचे आणि खूप मोठ्या विचारला अगदी सामान्य पातळीवर आणायचे हे मनाला खूप आवडते. […]

शिक्षणाचं असं करता येईल काय?

मित्रांनो, खालचा लेख काहीसा मोठा आहे, पण शिक्षणाबद्दल आस्था असणारांनी जरूर वाचावा ही विनंती. लाईक्स, कमेंट नाही दिल्यात तरी चालेल, पण एकदा वाचावा ही नम्र विनंती.. शिक्षणाचं असं करता येईल काय? विषय अर्थातच शिक्षणाचा. माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि म्हणूनच काळजीचा. जी व्यक्ती किंवा वस्तू किंवा गोष्ट अत्यंत जिव्हाळ्याची असते, तिचीच काळजी आपल्याला जास्त असते, तसं काहीतरी […]

शिक्षणाचा पोरखेळ

सावध, ऐका पुढल्या हाका..!! विषय अर्थातच नुकत्याच लागलेल्या इयत्ता १० वी किंवा एसएससीच्या निकालाचा आहे. या विषयावर गेल्या पाच-सहा दिवसांत इतकं उलट-सुलट लिहीलं, बोललं गेलंय, की आता त्याचा कंटाळा येऊ लागलाय. खरी मेख इथंच आहे, आपल्याला कंटाळा किंवा आनंद अगदी तत्परतेने वाटतो पण अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर ‘असं का व्हावं’ असा शांतपणे विचार करावासा वाटत नाही. […]

मानसिक तणाव (क्रमशः पुढे ४ वर चालू )

मी एका बँकेमध्ये गेलो होतो. पैसे काढायचे होते. इतर बरेच जण रांगेत होते. मी कॅशरकडे बघत होतो. पैसे घेणे, पैसे देणे, नोटा भराभर मोजणे, त्या एकत्र बांधणे,  बांधलेल्या गड्यामधून नोटा घेणे, मोजता मोजता गिऱ्हाईकांशी मध्येच बोलणे, फोन मोबाईल घेणे, बोलणे, कुणीतरी कर्मचारी मागून आला तर त्याच्याशी बोलणे. अशी अनेक छोटी छोटी व त्याच्या प्रमुख कामाना व्यत्यय […]

मानसिक तणाव

जीवनाचे एक महान सत्य असते. जे भगवत् गीतेमध्ये देखील सांगितलेले आहे. जे होत आहे ते चांगल्या साठीच. जे होणार आहे ते देखील चांगल्यासाठीच. जीवनातील प्रत्येक घटनेमध्ये कोणत्या ना कोणत्या रीतीने तुम्हास फायदा होतो. पण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या होणाऱ्या फायद्याबाबत नेहमी विचार करु नका. आपण सर्व ज्येष्ठ व श्रेष्ठ आहात. ६०-७० वा अधिक वर्षे आपण जीवनाची खर्च […]

1 78 79 80 81 82 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..