नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

समस्या रोहिंग्या शरणार्थिंची

भारतामध्ये 40 हजार रोहिंग्या शरणार्थिं मुसलमान नागरिक रहात असावे अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कमिशनने दिली आहे. यामध्ये 16 हजार 500 रोहिंग्या शरणार्थिंना संयुक्त राष्ट्रांकडून ओळखपत्रही मिळाली आहेत. त्यातील ६ हजार ६८४ हे केवळ जम्मू आणि कश्मीर राज्यातील हिंदूबहुल जम्मू भागात राहतात. परंतु ही आकडेवारी दोन वर्षांपूर्वीची आहे. त्यात भर नक्कीच पडलेली असणार. केंद्रीय गृहमंत्री किरण रज्जू यांनी […]

गणेश.. तिनच अक्षरांचं वैशिष्ट्य

‘गणेश’ हे नांव तयार करणारी मराठी वर्णमालेतील ‘ग’, ‘ण’ आणि ‘श’ ही तीन अक्षरं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या तिनही अक्षरांमध्ये त्यांचा काना स्वतंत्र, म्हणजे मुख्य अक्षरापासून किंचित अंतर राखून अदबीने उभा आहे. ह्या तिनच अक्षरांचं हे वैशिष्ट्य. ह्या तीन अक्षरांव्यतिरिक्त बाकीची अक्षरं कान्याचा आधार घेऊन किंवा कान्यात गुरफटून किंवा ‘ळ’सारखी काना(कणा)हीन होऊन उभी आहेत.. गणेश नांव […]

चीनबरोबर व्यापार युध्द जिंकण्यासाठी बहुआयामी उपाययोजना जरुरी

गेल्या वीस वर्षांपासून चीनचे आपल्या बाजारपेठेवर सुरू असलेले धोरणात्मक आक्रमण थांबविण्याकरिता एखाद्या वर्षाचे प्रयत्न पुरेसे होणार नाहीत. देशभक्त नागरिकांना किमान काही वर्षे ही लढाई निर्धाराने करावी लागणार आहे. मिळणाऱ्या संकेतांप्रमाणे या लढाईत विजय निश्चित मिळू शकतो. आपल्या निर्धाराची कसोटी मात्र येणारा काळ निश्चित बघणार आहे. […]

कलम ३५(ए) काश्मिर – लक्षावधी लोकांचे जीवन असह्य

काश्मीरमध्ये राजकीय पक्षांना आणि तथाकथित विचारवंतांना देशाच्या विरोधात बोलण्यासाठी कुठलेही कारण पुरेसे ठरते. आता नवे कारण म्हणजे राज्यघटनेतील 35 अ हे कलम. यावरून आता वादविवाद सुरू झाला आहे. इतर वेळी एकमेकांशी भांडणारे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि इतर अपक्ष सदस्य याबाबत एकत्र आले आहेत. […]

‘खुलासा’ गोंधळ आणि गैरसमज वाढवणार्‍या गोष्टींचा

पुर्वीची काठी घेऊन साप मारण्याची “पोज” आणि आजची “स्टीक” घेऊन सेल्फी काढण्याची पोज, दोघही सारख्याच वाटतात… फक्त सापाची जागा आपल्या मुखचंद्राने घेतलीये… पुर्णविरामांनी संपणारी आमची वाक्य् आता प्रश्नार्थक चिन्हांनी संपायला लागलीयेत, आयुष्यात पुढे सरकताना विराम कमी होत् असावेत् अन् प्रश्न वाढत् असावेत्… […]

कर्त्यापेक्षा कला श्रेष्ठ

ईश्वर, चिंतन सानिध्य ईश्वराची महानता, सर्व व्यापीपणा असे अनेक दिव्य भव्य गुणांनी परिपूर्ण असलेले वर्णन, बालपणापासून समजावले गेले, अंगीकारले गेले. सतत त्याचा भडीमार मन- विचारांवर होत होता.पौराणीक कथा, श्लोक, काव्य, रचना, सुत्रे अशा अनेक माध्यमातून ईश्वरी श्रेष्ठत्व गायले गेले. […]

मध्य रेल्वे माझं नाव

मध्य रेल्वे माझं नाव वय माझं शंभरवर, काय सांगू बाबांनो आता कशी लागली मला घरघर… इंग्रजांच्या काळात खूप होती माझी बडदास्त फेऱ्याही होत्या कमी अन् माणसंही नव्हती जास्त… रुळावरून धडधडत आले की लोक मला घाबरायचे एक भोंगा वाजवताच दूर दूर पळायचे… पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळंच तंत्र बदललं शहरांचा झाला विस्तार माझं महत्त्व वाढलं… मी खूप खुशीत […]

फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात…

फार इन्व्हॉल्व्ह होतो आपण ज्यात त्यात….- …अनेक दिवस रोजंदारीवर कामाला आलेला, गप्पिष्ट गडीमाणुस “चाललो हो शेट मी आता…” असं म्हणुन निघाला की कसंतरीच होतं. ….जुना ब्लॅक ऍन्ड व्हाईट टिव्ही विकला की त्यासोबत आपण आठवणीही विकतोय असं वाटतं ….आपली पोरं महिनाभर त्यांच्या आजोळी निघाली की आपल्यासकट घरही कासावीस होतं.. ….गणपती विसर्जनाचे वेळी “पुढच्या वर्षी लवकर या” म्हणताना […]

बोरिवली शिवनेरी, सद्भावना आणि मी…!

हातावर पोट असणारा तो ऑटोचालक, जो माझ्यासाठी तासभर सवारी सोडून थांबला…मला चहा आणून देणारा हा कंडक्टर आणि मी नवऱ्यासोबत कारमध्ये बसली आहे याची खात्री केल्यावर शिवनेरी काढणारा ड्रायव्हर हे माझे कोण होते… […]

नामस्मरणाच्या खोलांत

जीवनांच्या चक्रांत, आयुष्याच्या मार्गांत कोणतीही एखादी गोष्ट, संकल्पना परिपूर्ण असूच शकत नाही. कोणतीही घटना घडते त्याला तीन गोष्टी कारणीभूत असतात. एक वातावरण जे निसर्ग निर्मीत असते. दुसरे परिस्थिती जी मानवनिर्मीत असते. आणि तीसरे कारण  मानवी वैयक्तीक स्वभाव. याचाच परिपाक म्हणजे घटनांची निर्मिती. त्यामुळे त्यांत भिन्नता आणि मर्यादा असेलच. भले ते केवढे महान व जीवनाला यशस्वी करणारे […]

1 76 77 78 79 80 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..