नवीन लेखन...

नियमितपणे प्रसिद्ध होणार्‍या मजकूरासाठी खास सदरे

कोण्या एकीचे मनोगत

केसांच्या काळ्या भोर लटांमध्ये अचानक चांदीच्या तारा दिसायला लागतात आणि हळूच लक्षात येते….. “देवाने काय मस्त सोय केली आहे नैसर्गिक हायलाईट्सची …..” कालपरवा पर्यंत “ताई” म्हणणारे अचानक काकू, मावशी, किंवा आजी वगैरे म्हणायला लागतात आणि हळूच लक्षात येते….. “किती छान आता आपण अल्लड न रहाता प्रगल्भ झालोय …” टी व्ही वर छान कार्यक्रम बघत निवांत भाजी […]

बोलघेवडे काका

पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीने पद्माकरकाकांचं पार्थिव आपल्या कवेत घेतलं आणि तिच्या दरवाज्यासमोर डोळे मिटून हात जोडताच माझ्या मनाच्या पाखराने नागपुरातील धरमपेठेत झेप घेतली. खूप वर्षांपूर्वी आमची पहिली भेट झाली तेव्हा त्यांच्या नॉनस्टॉप बोलण्याच्या सवयीमुळे मला प्रश्न पडला ‘हा शब्दांचा नायगारा फॉल्स, की तोटी चोरीला गेल्यामुळे पाण्याचा अखंड वर्षाव करणारा नगरपालिकेचा सार्वजनिक नळ?’ त्या भेटीत काकांच्या संवादाच्या […]

मानसिक तणाव (क्रमशः ७ वर पुढे चालू )

यातना देणारास क्षमादान द्या आणि त्यास विसरुन जा. जीवन व्यवहारांत अनेकांशी संपर्क येत असतो. काहींचा सहवास सुखकर असतो तर कांहीमुळे यातना होतात. तो तुमच्या आवडी निवडीवर, स्वभावावर ठेच पोहोंचवतो. कित्तेकदा तुम्हाला अपमानीत झाल्याचा अनुभव येतो. तुमचा अहंकार डिवचला जातो. येथेच तुमच्या शांत स्वभावाची परिक्षा होत असते. मला माहीत आहे की आपण कोणी संत महात्मे वा साधूपुरुष […]

मानसिक तणाव (भाग ६)

आपण वैशिष्ट्यपूर्ण आहात. तुलना करुन चिंता नका आपण आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्य़ाबरोबर करुन चिंतीत होऊ नका. कारण, या विश्वांत आपण एक वैशिष्ट्यपूर्ण आहात. या जगात आपल्या सारखा अन्य कोणी नाही. दुर्दैवाने आपण स्वतःला ओळखत नसतो. जगाला मात्र समजण्याचा प्रयत्न करतो. सतत तुलनात्मक विचार चालले असतात. त्याचमुळे निराशेच्या वातावरणांत राहतो. इतरांच्या तुलनेमुळे स्वतःमधले वेगळेपण विसरतो. नुकतीच क्रिकेटची […]

जातीला लाथ? शक्य आहे, गरज आहे थोड्याश्या हिंमतीची

कालचा माझ्या “मन कि बात” मधला ‘जात’ या लेखावर आलेल्या विविध प्रतिक्रीया पाहता, हा लेख लिहीण्यामागची माझी भुमिका काय होती हे स्पष्ट करणं मला आवश्यक वाटतं. मी कसा वागलो याची मला कोणतीही जाहिरात करायची नव्हती. मी असं का केलं हे समजण्यासाठी मी हा लेख लिहीतोय. आपण भारतीय, आपली इच्छा असो वा नसो, कुठल्या ना कुठल्या जातीशी संबंधीत […]

मन कि बात – जात

कालचा माझ्या घरातला प्रसंगं. वेळ रात्री ११.३० ची. माझा मुलगा शौनक या वर्षी इयत्ता १२वी/सीईटी पास झाला, त्याचा आॅनलाईन रजिस्ट्रेशम फाॅर्म भरायचा माय-लेकराचा समरप्रसंग सुरू होता. आॅनलाईन फाॅर्म भरणं आणि तो तसा भरत अस्ताना ती ती पात्र पाहाणं, हा एक युद्धापेक्षा कमी प्रसंग नसतो आणि म्हटलं तर मनोरंजनाचा सोहळाही असतो. मी या बाबतीत ‘आऊट आॅफ डेट’ […]

मन कि बात – माणसं; मोठी आणि छोटी..

माणसं सर्व सारखीच असली, तरी आपण त्यांचं अगदी सहजपणे आणि नकळतपणे वर्गीकरण करत असतो. ही आपल्या मनाला लागलेली एक वाईट सवयचं असते. मोठा माणूस, छोटा माणूस, फालतू माणूस असं वर्गीकरण करायचे काही निकष आपण, म्हणजे आपण व समाजाने ठरवलेले असतात. हे निकष म्हणजे पद, पैसा, पत आणि प्रतिष्ठा. या लेखात मी फक्त छोट्या आणि फालतू समजल्या […]

मन कि बात – जाकिट

पुढे जाण्यापूर्वीच पहिला खुलासा करतो, ‘जाकिट’ म्हणजे दिल्लीच्या मोदींपासून एखाद्या फुटकळ गल्लीतला राजकारणात असलेला कुणीही वापरतो ते. आणि अर्थातच पुरुषांचेच..! अंगात, स्वत:ला शोभो अथवा न शोभो, जाकिट हा राजकारणाचा ‘युनिफाॅर्म’ झालाय हल्ली. नाक्यावर नेहेमी उभा चकाट्या पिटत उभा असलेला एखादा रिकामटेकडा, अचानक जाकिटधारी झालेला दिसला, की मी समजतो, की हा आता ‘मार्गा’ला लागला आणि त्या परिसरातल्यांची […]

RAM, अर्थात ‘रॅम्डम अक्सेस मेमरी’..

काल दहावीचा निकाल लागला. जवळपास २०० च्या आसपास मुलांना १०० टक्के मार्क्स मिळाले हे वाचून खुप छान वाटलं. त्या सर्व हुशार मुलांचं अभिनंदन. या मुलांबद्दल कौतुक असलं तरीही माझ्या दुसऱ्या मनात कुठेतरी काळजीची पालही चुकचुकली. पैकीच्या पैकी मार्क्स म्हणजे कसा आणि केवढा अभ्यास केला असेल या मुलांनी, वर्षभर बाकी सर्व बाजूला ठेवून फक्त अभ्यासच केला असेल […]

हे शेतकरीच आहेत ना?

हा नक्की संप आहे का?… ही नक्की क्रांती आहे का?… हे नक्की आंदोलनच आहे ना? ४८ हजार लीटर दूध रस्त्यावर ओतणारा शेतकरी आहे का? शेकडो किलो भाजीपाला, धान्याची नासधूस करणारा हा खरोखर शेतकरीच आहे का? हे सर्व मेहनतीनं पिकविणारे, हेच का ते शेतकरी, गाड्या जाळणारे, टायर फोडणारे हे शेतकरीच आहेत का? एवढी करोडो रूपयांची नासधूस करणाऱ्यांना […]

1 79 80 81 82 83 141
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..